
Top Marathi News Today Live:
15 Nov 2025 01:30 PM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीत(Bihar Assembly Election Result) एनडीए युतीला 202 जागांवर विजय मिळाला, तर विरोधी महाआघाडीला फक्त 34 जागांवर विजय मिळवता आला. एनडीएत भाजपला 89 जागा, जेडीयूलाला 85 जागा आणि एलजेपीला (रामविलास पासवान) 19 जागा मिळाल्या. दुसरीकडे महाआघाडीत राजदला 25, तर काँग्रेसला केवळ 5 जागा मिळाल्या आहेत. याचदरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव चर्चेत आले. बिहार सरकारने भागलपूर जिल्ह्यातील पीरपैंती येथील जमीन अदानी समूहाच्या कंपनी अदानी पॉवर लिमिटेडला औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यासाठी दिली. काँग्रेस, राजद आणि सीपीआय (एमएल) यांनी बिहार सरकार आणि भाजपवर अदानींना अनुकूलता दाखवल्याचा आरोप केला. भाजपने हे आरोप फेटाळून लावले, तर बिहार सरकारने सांगितले की अदानींना हा प्रकल्प प्रक्रियेचा एक भाग म्हणून मिळाला.
15 Nov 2025 01:20 PM (IST)
भारताच्या(India) हवाई सुरक्षेच्या इतिहासात प्रथमच मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही महत्त्वाच्या फ्लाइट इन्फॉर्मेशन रीजन—FIR मध्ये—GPS सिग्नल हस्तक्षेपासंबंधी NOTAM जारी करण्यात आला. हा हस्तक्षेप साधा तांत्रिक बिघाड नसून, इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाचे (Electromagnetic Warfare) एक संभाव्य संकेत असल्याची गंभीर चर्चा सुरू झाली आहे. भारताच्या L639 आणि P574 सारख्या आंतरराष्ट्रीय उड्डाण मार्गांवर GPS-आधारित नेव्हिगेशन हा कणा मानला जातो. हे मार्ग लांब पल्ल्याची विमाने ETOPS मानकांनुसार उडवतात. मात्र GPS सिग्नल जॅम झाल्यास, वैमानिकांना जुन्या जमिनीवर आधारित नेव्हिगेशनवर परतणे भाग पडते—आधुनिक तंत्रज्ञानातील एक मोठा मागासपणा.
15 Nov 2025 01:10 PM (IST)
पुणे : मद्यप्राशन करून नागरिकांशी गैरवर्तन तसेच धमकावण्याचे गंभीर प्रकार समोर आल्यानंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘कॉप्स २४ बीट मार्शल’मधील चार पोलिस शिपायांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. योगेश सुरेश माळी, मुकेश श्रीधर वाळले, शंकर दत्ता धोत्रे आणि कैलास शेषराव फुपाटे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. चारही कर्मचारी गुन्हे शाखेअंतर्गत कॉप्स २४ बीट मार्शल पथकात नेमणुकीवर होते.
15 Nov 2025 01:04 PM (IST)
कोपरगावाजवळ नगर- मनमाड महामार्गावर रात्री भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. खाजगी बस आणि कारची भीषण धडक झाली. या धडकेत कारणे पेट घेतला आणि यात कारचालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहे. या अपघातानंतर हायवेवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, वाहतूक कोंडी झाली होती. मुजाहिद शेख (वय 31) असे मृत चालकाचे नाव असून त्याच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
15 Nov 2025 01:00 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश टेमकर (30) यांचा मृतदेह नळकांडी पुलाजवळ आढळला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून कोणतेही जखमेचे किंवा अपघाताचे ठसे नसल्याने संशय वाढला आहे.
15 Nov 2025 12:55 PM (IST)
कल्याण मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय मुलीने थेट १९ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव रिद्धी खराडे असे आहे. ही घटना हाय प्रोफाइल सोसायटीत घडली आहे. धक्कदायक म्हणजे हा सर्व प्रकार तिच्या मोठ्या बहिणी समोर घडला.
15 Nov 2025 12:50 PM (IST)
कोपरगावाजवळ नगर–मनमाड महामार्गावर बस-कारची भीषण धडक होऊन कारने पेट घेतला व कारचालक मुजाहिद शेख यांचा होरपळून मृत्यू झाला. काही प्रवासी जखमी झाले. अग्निशमन दलाने एका तासाच्या प्रयत्नांनंतर आग विझवली; पोलीस तपास सुरू आहे.
15 Nov 2025 12:45 PM (IST)
मद्यप्राशन करून नागरिकांशी गैरवर्तन तसेच धमकावण्याचे गंभीर प्रकार समोर आल्यानंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘कॉप्स २४ बीट मार्शल’मधील चार पोलिस शिपायांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.योगेश सुरेश माळी, मुकेश श्रीधर वाळले, शंकर दत्ता धोत्रे आणि कैलास शेषराव फुपाटे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
15 Nov 2025 12:40 PM (IST)
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी एक नवा आणि धोकादायक सापळा रचला आहे. मित्र-नातेवाईकांकडून सोशल मीडियावर येणाऱ्या डिजिटल निमंत्रणांचा फायदा घेत ‘Come to wedding with family’ असा मेसेज मोबाईलवर पाठवला जात आहे. पाठवलेली APK फाईलवर क्लिक करताच फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.
15 Nov 2025 12:00 PM (IST)
अलीकडेच एका समोर आलेल्या अहवालानुसार, सॅटेलाइट लिंकमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे सरकारी आणि वैयक्तिक डेटा देखीलअ अगदी सहजपणे लीक होत आहे. व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध असलेल्या उपकरणांचा वापर करून तज्ज्ञ हजारो वैयक्तिक आणि सेंसिटिव मेसेज इंटरसेप्ट करण्यात यशस्वी झाले, हे असे मेसेज आहेत जे स्पेसमधून ट्रांसमिट होत आहेत. या अहवालानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नक्की प्रकरण काय आहे आणि सॅटेलाइट लिंकमध्ये वैयक्तिक आणि सेंसिटिव मेसेज लीक होण्यामागील नेमकं कारण काय आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
15 Nov 2025 11:50 AM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू चा ऐतिहासिक विजय झाला. या निवडणुकीत भाजपला ८९ जागा मिळाल्या तर जेडीयूने ८५ जागांवर विजयाची मोहोर उमटवली. तर महाआघाडीतील इतर पक्षांना २८ जागा मिळाल्या. भाजप प्रणित महाआघाडीचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. पण सन २००५ ते २०२५ या वीस वर्षांच्या कालखंडात पाटणा जिल्ह्यातील १४ विधानसभा मतदारसंघांच्या निकालांचे विश्लेषण करता जिल्ह्याचे राजकारण मोठ्या बदलातून गेल्याचे स्पष्ट दिसून येते. या काळात नवीन राजकीय समीकरणांची उभारणी झाली असून मतदारांच्या पसंतीतही अनेकदा बदल झाले आहेत.
15 Nov 2025 11:40 AM (IST)
कल्याण मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय मुलीने थेट १९ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव रिद्धी खराडे असे आहे. ही घटना हाय प्रोफाइल सोसायटीत घडली आहे. धक्कदायक म्हणजे हा सर्व प्रकार तिच्या मोठ्या बहिणी समोर घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे असून इमारतीतील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
15 Nov 2025 11:30 AM (IST)
आयपीएल २०२६ च्या रिटेन्शनची घोषणा १५ नोव्हेंबर २०२५ च्या संध्याकाळपर्यंत केली जाईल. सीएसकेने आता त्यांच्या भविष्यासाठी एक मोठी योजना तयार केली आहे. लिलावापूर्वीच त्यांनी संजू सॅमसनला करारबद्ध केले आहे. अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल. रिटेन्शन यादी जाहीर होण्यापूर्वी, न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवेने सीएसकेला निरोप दिला. त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना वैयक्तिकरित्या माहिती दिली.
15 Nov 2025 11:20 AM (IST)
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) येत्या आठवड्यात सोमवारी (१७ नोव्हेंबर) मॉस्कोला पोहचोतली. यावेळी ते रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेणार आहेत. पुतिन यांच्या अगामी दौऱ्यापूर्वी त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे भारत आणि रशियाच्या संबंधाना अधिक बळकटी मिळणार आहेत.
15 Nov 2025 11:10 AM (IST)
कोकणात मोठा गाजावाजा करत शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवारांनी काल खेडमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र याला २४ तास उलटतात न उलटतात, तोच या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने खेड नगरपालिका निवडणुकीत भाजपला अवघ्या तीन जागा देत बोळवण केल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दापोली येथील कार्यालयात बैठक घेत आपल्या पदाचे राजीनामे दिले असून ही एकतर्फी केलेली युती मान्य नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठांना कळविले आहे. दरम्यान निवडणुकीआधी पक्षांतर्गत नाराजी रोखण्याचे आव्हान मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.
15 Nov 2025 10:59 AM (IST)
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) येत्या आठवड्यात सोमवारी (१७ नोव्हेंबर) मॉस्कोला पोहचोतली. यावेळी ते रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेणार आहेत. पुतिन यांच्या अगामी दौऱ्यापूर्वी त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे भारत आणि रशियाच्या संबंधाना अधिक बळकटी मिळणार आहेत.
15 Nov 2025 10:52 AM (IST)
भारत (India) आता जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. या प्रगतीमुळे तेल, वायू आणि इतर ऊर्जा उत्पादनांच्या समुद्री वाहतुकीची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, भारताची ही मोठी गरज अद्याप परदेशी जहाजांवर अवलंबून आहे, कारण ऊर्जा वाहतुकीपैकी केवळ 20% माल भारतीय जहाजांमधून नेला जातो. या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी भारताने दक्षिण कोरियासोबत एक महत्त्वाकांक्षी जहाजबांधणी भागीदारीचा मार्ग स्वीकारला आहे. दक्षिण कोरिया (South Korea) हे जगातील सर्वात प्रगत आणि मोठ्या जहाजबांधणी क्षमतेचे केंद्र मानले जाते. कोरियन तंत्रज्ञान आणि भारताचा विशाल उत्पादन बेस या दोन सामर्थ्यांचा संगम भारतीय सागरी क्षेत्रात क्रांती घडवू शकतो.
15 Nov 2025 10:46 AM (IST)
रत्नागिरी जवळच्या खेडशी डफळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांची दहशत वाढली आहे. मागील काही महिन्यांपासून या परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर वाढला आहे. रत्नागिरीमधील खेडशीच्या माजी सरपंच जान्हवी घाणेकर यांचे घरी बसवलेल्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झाला असून रोज रात्री १२ ते ४ या वेळेत बिबट्या या परिसरात येत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.
15 Nov 2025 10:39 AM (IST)
बिग बॉस १९ च्या शेवटच्या भागात एक प्रायोजित टास्क होता. टास्क दरम्यान तान्या मित्तल आणि मालतीमध्ये थोडा वाद झाला. त्यानंतर तान्याने मालतीच्या कृतींबद्दल कुनिकाला तोंड दाखवले. कुनिकाच्या टिप्पण्या ऐकून ती तिच्याकडे गेली आणि मालती चहरच्या लैंगिकतेवर भाष्य केले.
15 Nov 2025 10:34 AM (IST)
(Technical Guruji) म्हणजेच गौरव चौधरी यांनी अलीकडेच असं एक गॅझेट लाँच केले आहे, जे पाहून अनेकजण चकित झाले आहेत. ही केवळ टेक्नोलॉजीची कमाल नाही तर या नवीन गॅझेटच्या माध्यमातून आपल्या संस्कृती आणि भक्तीला देखील सलाम करण्यात आला आहे. हे असं कोणतं गॅझेट आहे, याबाबत जाणून घ्या.
15 Nov 2025 10:29 AM (IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंढवा येथील जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहाराबाबतच्या तपासाचा महत्त्वपूर्ण टप्पा सोमवारपर्यंत पूर्ण होणार आहे. दस्त नोंदणी पातळीवर झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी प्रभारी नोंदणी महानिरीक्षकांनी नेमलेल्या चार सदस्यीय समिती नेमली होती. ही समिती येत्या सोमवारी ( १७ नोव्हेंबर) अहवाल सादर करणार असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.
15 Nov 2025 10:22 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता जालन्यात अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या थोरल्या भावाची धाकट्या भावाने कुऱ्हाडीने डोक्यात वार करत हत्या केली. जालन्यातील सोमठाणा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
15 Nov 2025 10:15 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर (वय 30) यांचा मृतदेह आढळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने संपूर्ण गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृतदेह शुक्रवारी (दि. 14) दुपारी गंगापूर तालुक्यातील हदियाबाद-नारवाडी रस्त्यालगत, नारवाडी शिवारातील नळकांडी पुलाजवळ आढळला. याघटनेची माहिती स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि समाजसेवक गौरव विधाटे यांनी पोलिसांना तात्काळ दिली.
15 Nov 2025 10:06 AM (IST)
बॉलिवूड अभिनेते राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी एका छोट्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे. राजकुमार राव यांनी मुलीच्या जन्माची घोषणा करणारी पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर झाल्यापासून चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या मुलीचा जन्म आज, १५ नोव्हेंबर रोजी झाला. हे लक्षात घेण्यासारखं आहे की राजकुमार आणि पत्रलेखा यांचे लग्न चार वर्षांपूर्वी याच दिवशी झाले होते.
15 Nov 2025 09:59 AM (IST)
सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यासह दोघांना जवळपास 2 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे उघडकीस आले. पीडित 62 वर्षीय सेवानिवृत्त बँक अधिकारी प्रतापनगर ठाण्यांतर्गत राहतात. 6 नोव्हेंबरला विनिता शर्मा आणि प्रेमकुमार गौतम नावाच्या दोन गुन्हेगारांनी त्यांना दोनदा व्हॉट्सअॅप कॉल केले. दहशतवादी विरोधी पथकाचा (एटीएस) अधिकारी असल्याचे सांगून पीडिताचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आले असून, त्यांना अटक करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पीडिताने अटक न करण्याची विनंती केली.
15 Nov 2025 09:55 AM (IST)
वैभव सूर्यवंशी नवा रेकाॅर्ड केला नावावर : बिहारमध्ये निवडणुकीचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना, त्याच राज्यातील सुपुत्र वैभव सूर्यवंशीने दोहामध्ये असा फटाका दाखवला की गोलंदाज थरथर कापू लागले. वैभवचे वादळ इतके तीव्र होते की क्षेत्ररक्षकांना सीमा ओलांडून चेंडू परत मैदानावर आणण्यासाठी संघर्ष करावा लागला. वैभवने इमर्जिंग आशिया कपमध्ये भारत अ संघाकडून खेळताना, यूएई अ संघाविरुद्धच्या टी-२० सामन्यात ही कामगिरी केली.
15 Nov 2025 09:50 AM (IST)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला जात आहे. पहिल्याच दिनी भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या सर्व फलंदाजांना बाद केले आणि डाव संपूष्टात आणला. या सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला धुळ चारली. या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला बुटका म्हटले होते, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी प्रशिक्षकाची प्रतिक्रिया सोशल मीडियावर समोर आली आहे.
15 Nov 2025 09:45 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये Wall Royale ईव्हेंटची एंट्री झाली आहे. या जबरदस्त ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना एकाचवेळी चार वेपन स्किन मुख्य रिवॉर्ड म्हणून जिंकण्याची संधी मिळणार आहे. ईव्हेंटमध्ये मिळणाऱ्या रिवॉर्ड्समध्ये ब्रायनी शोर आणि ऑस्पिशस इयर स्किनचा देखील समावेश आहे. या एक्सक्लूसिव स्किनसोबतच हस्की फ्लफ, लॅब जाइंट आणि लाइटिंग स्ट्राइक वेपन लूट क्रेट सारखे रिवॉर्ड्स जिंकण्याची देखील प्लेअर्सना संधी मिळणार आहे. गेममध्ये सुरु करण्यात आलेला हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या गेममध्ये मिळणारे रिवॉर्ड्स पूर्णपणे प्लेअर्सच्या नशीबावर अवलंबून असणार आहेत.
15 Nov 2025 09:35 AM (IST)
आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने वाढणाऱ्या संघटित गुन्हेगारीमुळे जगातील जवळपास प्रत्येक देश अस्वस्थ आहे. मादक पदार्थांची तस्करी, मानव तस्करी, अवैध शस्त्रास्त्र व्यापार, आर्थिक गुन्हे, सायबर क्राइम आणि सीमा ओलांडून होणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे हे सर्व आज वैश्विक सुरक्षेसाठी गंभीर धोका बनले आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांनी 2000 मध्ये UNTOC (United Nations Convention Against Transnational Organized Crime) ही जागतिक स्तरावरची अत्यंत प्रभावी आणि कायदेशीर संधी स्वीकारली, जी आज गुन्हेगारीविरुद्ध जगातील सर्वात महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय साधन मानले जाते.
15 Nov 2025 09:25 AM (IST)
महापालिका निवडणुका जवळ आल्याने शहरातील राजकीय घडामोडींना गती मिळाली आहे. सर्वच प्रमुख पक्षांमध्ये बैठकांचा, रणनीतीचा आणि पक्षबळ वाढवण्याचा जोर वाढला असून, स्थानीक स्तरावर नेते आणि कार्यकर्त्यांच्या पक्षांतराची लाट दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बोरिवली–मागाठाणे विधानसभा परिसरात ठाकरे गटासह भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकांपूर्वी प्रभाग क्र. ५ मध्ये ठाकरे गटाचे शाखा समन्वयक भूषण माळदवे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या मोठ्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक संघटनेला मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे.
15 Nov 2025 09:20 AM (IST)
मुंढवा येथील जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहाराबाबतच्या तपासाचा महत्त्वपूर्ण टप्पा सोमवारपर्यंत पूर्ण होणार आहे. दस्त नोंदणी पातळीवर घडलेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी प्रभारी नोंदणी महानिरीक्षकांनी नेमलेल्या चार सदस्यीय समितीचा अहवाल सोमवारी सादर होणार असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.
15 Nov 2025 09:15 AM (IST)
पाकिस्तानच्या राजकीय संरचनेत मोठा बदल घडवणाऱ्या 27 व्या घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. या दुरुस्तीमुळे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना आणखी व्यापक अधिकार मिळणार असून, देशातील सर्वात प्रभावशाली पदांमध्ये त्यांची शक्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याचबरोबर, न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात कपात होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 48 कलमांमध्ये बदल प्रस्तावित असलेल्या या विधेयकाबाबत पाकिस्तान ऑब्झर्व्हरने दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे स्वरूप अत्यंत व्यापक आहे आणि यामुळे नागरी-लष्करी सत्ता-संतुलनामध्ये मोठा बदल होऊ शकतो.
15 Nov 2025 09:02 AM (IST)
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाने आज मोठा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र भरण्याची मुभा दिली असून, सुट्टीचा दिवस असला तरी आज तसेच रविवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील आदेश राज्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना (R.O.) दिले असून, नामनिर्देशन स्वीकारण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या निवडणुकांमध्ये राज्यातील २४६ नगरपरिषदांमधील तसेच ४२ नगरपंचायतींमधील सदस्यपदांसाठी उमेदवार अर्ज भरू शकणार आहेत. यासोबतच थेट नगराध्यक्षपदासाठीचेही नामनिर्देशनपत्र ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
15 Nov 2025 08:58 AM (IST)
सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोनच दिवस बाकी असूनही अद्याप राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले नाहीत. यापूर्वी सर्व निर्णय एकहाती घेणाऱ्या राजकीय नेत्यांसमोर उमेदवारांची नावे जाहीर करताना प्रथमच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी भाजपचे उमेदवार जाहीर करताना माजी आमदार संजय जगताप यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे
15 Nov 2025 08:57 AM (IST)
उत्तरप्रदेश येथील श्रावस्ती जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद परिस्थिती मृत्यू झाला आहे. पतीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला तर पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह खाटेवर पडलेले आढळले. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक, फॉरेन्सिक टीम आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे.
15 Nov 2025 08:56 AM (IST)
फिरण्याची आवड असेल आणि त्यातही एडवेंचर ट्रिप तुमच्या मनाला भावत असतील, तर भारतातील फ्लोटिंग व्हिलेज म्हणजेच तरंगणारे गाव जरूर पाहायला हवे. येथे केवळ घरेच नाहीत, तर शाळा, बाजार आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्टीदेखील पाण्यावर तरंगत राहतात. या गावातील घरे वार्याच्या दिशेनुसार आणि पाण्याच्या प्रवाहानुसार जागा बदलत राहतात. अगदी जमिनीवर उभे राहिल्यानंतरही तुम्हाला पायाखालची धरती हलत असल्यासारखे वाटते. म्हणूनच हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असा जादुई आणि अद्भुत ठरतो. घरांच्या आत बसलात तरी हळूच हलणारी हालचाल जाणवते.
15 Nov 2025 08:54 AM (IST)
भारतातील सोन्याच्या किंमतीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. काही ठिकणी तर सोन्याच्या किंमतींनी लाखोंचा टप्पा पार केला आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवीन आव्हान निर्माण झालं आहे. केवळ सोन्याच्याच नाही तर चांदीच्या किंमतीत देखील सतत वाढ होत आहे. आजच्या सोनं आणि चांदीच्या दरांचा विचार केला तर आज सोन्याच्या किंमतीत किंचीत घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
Marathi Breaking news live updates- एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत भारत अ संघाने आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. संयुक्त अरब अमिराती (यूएई) विरुद्ध शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या ग्रुप बी सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
भारत अ संघाच्या डावात वैभव सूर्यवंशी आणि नमन धीर यांनी दुसऱ्या विकेटसाठी आक्रमक फलंदाजी करत ५६ चेंडूत १६३ धावांची भक्कम भागीदारी उभारली. नमन धीरने २२ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३४ धावांची लक्षणीय खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीने केवळ १७ चेंडूत अर्धशतक झळकावून संघाच्या धावगतीत भर टाकली. अखेरीस मोहम्मद फराजुद्दीनच्या गोलंदाजीवर अहमद तारिकने घेतलेल्या झेलमुळे वैभवची खेळी संपुष्टात आली.