दिल्लीतील हवा विषारी झाली असून, परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आजपासून GRAP-4 लागू करण्यात येत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
आंतरराज्यीय बस, इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहने, बीएस-6 डिझेल बस आणि इतर वाहने वगळता दिल्ली-एनसीआर राज्यातील सर्व वाहनांना दिल्लीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.