Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2 डिसेंबर 2025ला होणार

Marathi breaking live marathi- 9 वर्षांपूर्वी भारत सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या काळ्या पैशाविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 04, 2025 | 06:42 PM
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates:  देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागे काळा पैसा समोर आणणे हा होता. मात्र, नोटाबंदीनंतर 9 वर्षे झाली असली तरी काळा पैसा पुन्हा चलनात आला असल्याचे म्हटले जात आहे. हा काळा पैसा अजूनही रिअल इस्टेट क्षेत्रात पसरलेला असल्याचे सांगण्यात आले आहे. जमीन/मालमत्तेसाठी केंद्रीकृत डेटाबेस तयार करण्याच्या सरकारी प्रयत्नांना अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. कारण ६२ टक्के मालमत्ता मालकांनी अद्याप त्यांच्या मालमत्ता आधारशी जोडलेल्या नाहीत.

सविस्तर वृत्त-  नोटाबंदीच्या 9 वर्षांनंतरही देशात काळा पैसा अजूनही काळाच?

 

 

The liveblog has ended.
  • 04 Nov 2025 06:42 PM (IST)

    04 Nov 2025 06:42 PM (IST)

    मोठी बातमी! Supreme Court मध्ये भीषण स्फोट; 12 जण जखमी तर…; सोशल मिडियावर Video Viral

    Blast In Supreme Court: पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात एक भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे सुप्रीम कोर्टाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

  • 04 Nov 2025 06:24 PM (IST)

    04 Nov 2025 06:24 PM (IST)

    Mumbai Metro 7: गोरेगाव पूर्व स्टेशनला आता ‘झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व’ नाव

    मुंबईतील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी! झ्युरिक कोटक जनरल इन्शुरन्स कंपनीने मुंबई मेट्रो लाईन ७ वरील गोरेगाव पूर्व स्टेशनला आता ‘झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व’ असे नाव दिले आहे. उद्योग, नवप्रवर्तन आणि श्रमजीवी व्यावसायिकांचे लक्ष वेधून घेणारे प्रसिद्ध व्यावसायिक केंद्र नेस्को (NESCO) च्या अगदी जवळ असलेले हे मेट्रो स्टेशन भारताच्या आर्थिक राजधानीतील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावते. हे स्थानक जिथे व्यवसाय, नावीन्यता आणि गतीशीलता एकत्र येतात, त्या मुंबईची खरी लाइफलाइन बनले आहे.

  • 04 Nov 2025 06:19 PM (IST)

    04 Nov 2025 06:19 PM (IST)

    बिलासपूरमध्ये मोठा रेल्वे अपघात! प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली

    Train Accident News in Marathi : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील लालखदनजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. हावडा मार्गावर जाणारी एक प्रवासी ट्रेन मालगाडीला धडकली. या अपघातामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला असून अनेक डबे रेल्वे रुळावरून घसरले. ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची भीती आहे.

  • 04 Nov 2025 06:03 PM (IST)

    04 Nov 2025 06:03 PM (IST)

    ट्रेनमधून फुस्स करून फुत्कारला अजगर, पाहताच लोकांची हवा झाली टाईट; Rescue Video Viral

    आजकाल सोशल मिडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल देखील होतात. दरम्यान सध्या सोशल मिडियावर एका अजगराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ भारतीय रेल्वेमधील आहे. रेल्वेच्या एका डब्यात अजगर फिरतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

  • 04 Nov 2025 04:55 PM (IST)

    04 Nov 2025 04:55 PM (IST)

    रायगड मधील भिरा-पाटणूस भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

    भिरा-पाटणूस परिसरातील भिरा टाटा विद्यालयाने अचानक नववी आणि दहावीचे वर्ग बंद केल्यामुळे स्थानिक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे सुमारे ४० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याच्या स्थितीत आले आहेत.

  • 04 Nov 2025 04:50 PM (IST)

    04 Nov 2025 04:50 PM (IST)

    गोरक्षकांच्या कारवाई दरम्यान भीषण प्रसंग, महिलेला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न

    महाराष्ट्रात गो-हत्या कायद्याने बंद असतानाही सोलापूर शहरात गाईंची तस्करी आणि कत्तल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी पहाटे सोलापूरच्या लक्ष्मी मार्केट परिसरात गोरक्षकांनी गाईंनी भरलेली पिकअप चारचाकी पकडण्याचा प्रयत्न केला असता, तस्करांनी थरारक पद्धतीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. गोरक्षकांना चुकवण्याच्या नादात त्या पिकअपने विद्युत खांबाला जबर धडक दिली, त्यामुळे खांब रस्त्यावर कोसळला. यावेळी एका महिलेने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिचा गळा आणि तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्या महिलेनं सांगितलं की, विद्युत तारा आमच्या घरावर पडल्या असत्या तर मी आणि माझा मुलगा जिवंत जळून गेलो असतो.

  • 04 Nov 2025 04:40 PM (IST)

    04 Nov 2025 04:40 PM (IST)

    शेवगाव न्यायालयात वकिलावर प्राणघातक हल्ला

    शेवगाव येथे न्यायालय परिसरात ऍडव्होकेट रविंद्र सकट यांच्यावर विरोधी पक्षकाराने प्राणघातक हल्ला केला. या घटनेचा उल्हासनगर बार असोसिएशनने तीव्र निषेध नोंदवला असून वकिलांनी लाल फीत बांधून शांततापूर्ण आंदोलन करून न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

  • 04 Nov 2025 04:35 PM (IST)

    04 Nov 2025 04:35 PM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिले महिला एकदिवसीय विश्वचषक जेतेपद जिंकले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारकडून भारतीय महिला संघाचे अभिनंदन करण्यात येईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल सांगितले की “आज मंत्रिमंडळाने आयसीसी महिला विश्वचषकामध्ये विश्वचषक जिंकून भारतीय महिला चमूने जी देदीप्यमान कामगिरी केली आहे. त्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या महराष्ट्रातल्या तीन खेळाडू, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव यांच्या सत्कार राज्य सरकारच्या  वतीने करण्यात येईल. तसेच आपल्या धोरणानुसार रोख रक्कम देखील देण्यात येईल.”

  • 04 Nov 2025 04:30 PM (IST)

    04 Nov 2025 04:30 PM (IST)

    CJIभूषण गवईंनी थेट केंद्र सरकारला फटकारले

    सर्वोच्च न्यायालयात एका महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारच्या एका अर्जावर स्वतः सरन्यायाधीश बी.आर. गवई चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या संतापामुळे काही वेळासाठी वातारण चांगलंच तापलं होतं. न्यायाधिकरण सुधारणा कायद्याच्या वैधतेवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारने अचानक हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्याची मागणी केली. याचिकाकर्त्यांनी त्यांचे युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर ही विनंती करण्यात आल्याने सी.जे.आय. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

  • 04 Nov 2025 04:25 PM (IST)

    04 Nov 2025 04:25 PM (IST)

    नगर विकास खात्याच्या कार्यालयावर आंदोलन करणार

    पनवेलमध्ये  विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष तसेच इतर संघटनांच्या वतीने पनवेल मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा प्रहारच्या नेत्यांनी दिलाय.

  • 04 Nov 2025 04:21 PM (IST)

    04 Nov 2025 04:21 PM (IST)

    ऊस दर निश्चित होत नाही, तोपर्यंत….वाहतूक अडवून भर रसत्यात ‘स्वाभिमानी’ संघटनेचं आंदोलन

    बळीराजाच्या शेतातल्या ऊसाला योग्य तो दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघ आक्रमक झालेला आहे. जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेवून निघालेला ट्रॅक्टर ट्रॉली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी हालोंडी येथे रोखली.दरम्यान घटनास्थळी कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांनी दर निश्चित होत नाही. तोपर्यंत ऊसतोडणी थांबवू असे आश्वासन दिले. हालोंडी (ता. हातकणंगले) येथे रविवारी सकाळी हेरले गावातील ऊसाची वाहतूक होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांना समजले. त्यांनी ते वाहन अडवून चालकाकडे ऊस तोडणीबाबत माहिती विचारली असता त्याने हा ऊस हेरले येथून भरून हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याला घेऊन जात असल्याचे सांगितले. याप्रसंगी शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व अकिवाट गावचे सरपंच विशाल चौगुले, सुधाकर पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, प्रकाश पाटील, विजय पाटील, अनिल पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 04 Nov 2025 04:19 PM (IST)

    04 Nov 2025 04:19 PM (IST)

    नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2 डिसेंबर 2025ला होणार

    राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Maharashtra Local body Election) अखेर आज (4 नोव्हेंबर) बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2  डिसेंबरला मतदान होणार आहे तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि एकूण 42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

  • 04 Nov 2025 03:56 PM (IST)

    04 Nov 2025 03:56 PM (IST)

    शेतकऱ्यांना झुलवत ठेवू नका, दिलासा मिळेल की नाही? ते सांगा

    खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. आधी पावसाने दिलेला दगा, नंतर अतिवृष्टी आणि आता अवकाळी पाऊस या तिहेरी आघाताने शेती पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. कपाशी, मका, ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन या सर्व पिकांचे नुकसान अपरिमित आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 04 Nov 2025 03:41 PM (IST)

    04 Nov 2025 03:41 PM (IST)

    वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रकाश सुर्वेंचा जाहीर माफीनामा

    गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी विरूद्ध हिंदी अशी वादाची ठिणगी पडली होती. त्यावळी काही नेत्यांनी मराठी विरूद्ध उत्तर भारतीय असेही चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचं एक वादग्रस्त विधानाने नव्या वादाची ठिगणी पडली.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा....

  • 04 Nov 2025 03:31 PM (IST)

    04 Nov 2025 03:31 PM (IST)

    ‘मस्ती ४’ चा ट्रेलर प्रदर्शित; जुन्या कलाकारांसह नवे सादरीकरण

    रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या अ‍ॅडल्ट कॉमेडी फ्रँचायझी ‘मस्ती’ चा चौथा भाग असलेल्या ‘मस्ती ४’ चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. हे तिघेही कलाकार पुन्हा एकदा मजा करताना दिसणार आहेत.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा....

  • 04 Nov 2025 03:23 PM (IST)

    04 Nov 2025 03:23 PM (IST)

    पुण्यात रिक्षाचालकांचा मनमानी कारभार; ‘नियमांचे पालन न केल्यास…’,

    शहरात मोठ्या प्रमाणावर ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ओला-उबेरसारख्या ॲपवर कमी भाडे दिसल्यास अनेक चालक प्रवाशांना प्रवास नाकारतात आणि मीटर वापरण्याऐवजी मनासारखे भाडे मागतात.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 04 Nov 2025 03:09 PM (IST)

    04 Nov 2025 03:09 PM (IST)

    भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत

    विवारी, २ नोव्हेंबर रोजी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ५२ धावांनी पराभव केला आणि आपले पहिले जेतेपद पटकावले.

    सविस्तर बातमीसाठी येेथे क्लिक करा

  • 04 Nov 2025 02:50 PM (IST)

    04 Nov 2025 02:50 PM (IST)

    गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! भारतीयांसाठी ग्‍लोबल फंड्सची घोषणा

    मुंबई: वेस्‍टेड फायनान्‍स या भारतीयांसाठी जागतिक गुंतवणूक विशेषज्ञ कंपनीने आज (4 नोव्हेंबर) ग्‍लोबल फंड्सच्‍या लाँचची घोषणा केली. हा भारतीय गुंतवणूकदारांसाठी डीएसपी, ब्‍लॅकरॉक, वॅनगार्ड, पीआयएमसीओ, फ्रँकलिन टेम्‍प्‍लटन आणि मॉर्गन स्‍टॅण्‍ली यांसारख्‍या प्रसिद्ध कंपन्‍यांद्वारे व्‍यवस्‍थापित ५० हून अधिक आंतरराष्‍ट्रीय फंड्समध्‍ये प्रत्‍यक्ष गुंतवणूक करण्‍याचा नवीन मार्ग आहे.

  • 04 Nov 2025 02:45 PM (IST)

    04 Nov 2025 02:45 PM (IST)

    Realme C85 मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! 7000mAh बॅटरी आणि AMOLED डिस्प्लेने सुसज्ज…

    Realme ने त्यांच्या C-सीरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन आता लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन्स Realme C85 5G आणि Realme C85 Pro 4G या नावाने लाँच करण्यात आले आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची अधिकृत विक्री वियतनाममध्ये सुरु झाली आहे. तर भारतात या स्मार्टफोन्सची प्री-बुकिंग सुरु करण्यात आली आहे. Realme ने त्यांच्या C-सीरीजमधील दोन्ही स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर केले आहेत. हे डिव्हाईस “रग्ड आणि पावर-पॅक्ड” कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहे.

  • 04 Nov 2025 02:40 PM (IST)

    04 Nov 2025 02:40 PM (IST)

    नदीपात्रात रासायनिक पाणी सोडणे महागात पडणार

    खेड: खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक उद्योग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. बुधवारी रात्री कोसळलेल्या पावसाचा गैरफायदा घेत काही उद्योगांनी आपले विषारी रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याने सोनपात्रा नदी लालेलाल पाण्याने वाहू लागली! या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातील नागरिक, मच्छीमार आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने तब्बल आठ उद्योगांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे पाठवला असून, या प्रकरणी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

  • 04 Nov 2025 02:35 PM (IST)

    04 Nov 2025 02:35 PM (IST)

    Baai Tuzyapayi: परंपरांवर प्रश्न उपस्थित करणारा; समाजाला पुन्हा विचार करायला लावणारा प्रवास

    आजही अनेक गोष्टीत गावागावांमध्ये अगदी शहरांमध्येही जुनाट परंपरा जपल्या जातात आणि ZEE5 वर प्रदर्शित झालेली मराठी सिरीज ‘बाई तुझ्यापायी’ ही समाजातील जुनाट परंपरावर भाष्य करून त्यावर प्रश्न उपस्थित करणारी आहे.  सिक्स्टीन बाय सिक्स्टी-फोर प्रॉडक्शन निर्मित आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका एका किशोरवयीन मुलीच्या धैर्य, शिक्षण आणि संघर्षाची कथा सांगते.

  • 04 Nov 2025 02:30 PM (IST)

    04 Nov 2025 02:30 PM (IST)

    लग्नाआधीच घृणास्पद कृत्य! यूपीमध्ये तरुणीवर बलात्कार करून एक कोटींचा मागितला हुंडा

    लग्न जमल्यानंतर प्रत्येक जण आपल्या होणाऱ्या बायकोसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहत असतो. आपले विचार जुळवण्याचा प्रयत्न करतो. आयुष्य कस असेल याचा विचार करतो. मात्र यूपीत अशी घटना घडली आहे. ती वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आपल्या होणाऱ्या बायकोसोबत लग्ना आधीच त्याने बळजबरी केली आणि त्या नंतर लाखो रुपयांच्या हुंड्याची मागणी सुद्ध केल्याचे समोर आले आहे. होणाऱ्या बायकोला भेटायला बोलवलं आणि लग्नाला नकार दिला. मात्र हे करण्यापूर्वी त्याने तरुणीसोबत बळजबरी केल्याची घटना घडली आहे.

  • 04 Nov 2025 02:25 PM (IST)

    04 Nov 2025 02:25 PM (IST)

    16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी

    भारतीय महिला संघाचा विश्वचशकामध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना झाला होता तर टीम इंडियाचा पुरुष संघाचा आशिया कपमध्ये तीन वेळा दोन्ही संघ आमनेसामने आले होते. आता परत एकदा भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने खेळताना दिसणार आहेत. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने चांगली कामगिरी करत पाकिस्तानला पराभूत केले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी अद्याप टीम इंडियाला आशिया कप २०२५ विजेत्याचा ट्रॉफी सादर केलेला नाही, परंतु नवीन स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे.

  • 04 Nov 2025 02:17 PM (IST)

    04 Nov 2025 02:17 PM (IST)

    स्वानंदी–समरची लग्नपत्रिका ठेवली बाप्पाच्या चरणी, झी मराठीच्या नायिकांकडून केळवण सोहळा

    झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्ये महा लग्नसोहळा साजरा होत आहे. या मालिकेतील प्रिय जोडी स्वानंदी–समर आणि आधिरा–रोहन यांच्या महाविवाह सोहळ्याची सुरुवात झाली आहे. हा प्रसंग संपूर्ण सरपोतदार आणि राजवाडे कुटुंबाला एकत्र आणणार आहे. या विशेष प्रसंगी वधू–वरांनी प्रथम गणपती मंदिराला भेट देत बाप्पा समोर लग्नपत्रिका ठेऊन सर्व निर्विघ्न पार पडुदे अशी प्रार्थना करण्यात आली आहे. गुलाबपुष्पांच्या वर्षावात या जोडप्यांचे मंदिरात स्वागत करण्यात आले.

  • 04 Nov 2025 02:08 PM (IST)

    04 Nov 2025 02:08 PM (IST)

    पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट

    बिग बॉस मराठीचा स्पर्धक आणि मराठी अभिनेता पुष्कर जोग सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याचा नुकताच ‘ह्युमन कोकेन’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच घोषणा केली. सिनेमातील कलाकारांचे खतरनाक लूक देखील निर्मात्यांनी रिव्हिल केले. जे पाहून चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमधील उत्सुकता वाढली. पुष्करने आता सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने आता UAE मध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.

  • 04 Nov 2025 02:00 PM (IST)

    04 Nov 2025 02:00 PM (IST)

    बारामतीत पडद्यामागे घडामोडींना वेग; पवार घराण्याचा नवा खेळाडू निवडणुकीच्या रिंगणात

    राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. राज्यातील राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारीही सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जय पवार हे बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात.

  • 04 Nov 2025 01:55 PM (IST)

    04 Nov 2025 01:55 PM (IST)

    ‘पुढच्या वर्षी तुझ्या भेटीला येण्याचे बळ दे…’; वारकऱ्यांनी घेतला पंढरीचा निरोप

    भारताची दक्षिण काशी असलेल्या पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो वैष्णवांनी एकादशीचा अनुपम्य सोहळा डोळे भरुन अनुभवत परंपरने घराण्यातून चालत आली. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल । श्रीज्ञानदेव तुकाराम ।। पंढरीनाथ भगवान की जय ।।। असा जयघोष करत येथील विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वारात तसेच महाव्दारात उभे राहून दोन्ही हातांनी स्वतःचे कान पकडून वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणून उड्या मारत सावळ्या परब्रम्हाकड क्षमा याचना करुन काही चुकले असेल तर माफी कर, पुढच्या वर्षी तुझ्या भेटीला येण्यासाठी बळ दे असे म्हणत त्याचा निरोप घेत होते.

  • 04 Nov 2025 01:46 PM (IST)

    04 Nov 2025 01:46 PM (IST)

    ICC ने Women’s Cricket World Cup संघाची केली घोषणा, कर्णधार हरमनप्रीत कौरला टीममधून वगळले

    भारताच्या संघाने 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन विश्वविजेता झाला आहे. आयसीसीने २०२५ च्या महिला विश्वचषकासाठी टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. या संघात जेतेपद जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातील तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. उपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघातील तीन खेळाडूंनीही टॉप ११ मध्ये स्थान मिळवले आहे. इंग्लंडच्या नॅट सायव्हर ब्रंटची आयसीसीच्या स्पर्धेतील १२ वी खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

  • 04 Nov 2025 01:35 PM (IST)

    04 Nov 2025 01:35 PM (IST)

    खुर्चीत बसायला गेले अन्…; बिहारमध्ये फडणवीसांसोबत नेमकं काय घडलं?

    बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील बिहारमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काल बिहारच्या खडगिया जिल्ह्यात निवडणूक प्रचार केला. पण याच दरम्यान एक मोठी घटना घडली. देवेंद्र फडणवीस आणि चिराग पासवान प्रचारसभेदरम्यान मंचारवर दाखल झाले. पण खूर्चीत बसताना देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची अचानक तुटली. यामुळे मंचावर थोडावेळ गोंधळ उडाला. पण नंतर फडणवीस आणि चिराग पासवान यांनी अभिवादन करत सुरक्षित असल्याचे सांगितले.

  • 04 Nov 2025 01:25 PM (IST)

    04 Nov 2025 01:25 PM (IST)

    दुचाकींना बसणार नवीन नियमानुसार दंड, नियमांचे उल्लंघन केल्यास खिसा होणार रिकामा

    विक्रमगड रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, रस्त्यांवरील सुरक्षितता वाढवणे आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे गांभीर्याने पालन करणे या प्रमुख उद्देशांनी केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८८ (Motor Vehicles Act, 1988) मध्ये मोठे बदल केले असून, मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम, २०१९ लागू केला आहे. या नवीन कायद्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पूर्वीपेक्षा अनेक पटींनी अधिक दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे वाहनचालकांमध्ये अधिक जबाबदारीची भावना निर्माण होणे अपेक्षित आहे.

  • 04 Nov 2025 01:15 PM (IST)

    04 Nov 2025 01:15 PM (IST)

    Hero Splendor Plus VS TVS Star City कोणती बाइक तुमच्या खिशाला परवडणारी?

    भारत सरकारने दुचाकी वाहनांवरील जीएसटी २८ % वरून १८ % पर्यंत कमी केला आहे. यामुळे बाईक आणि स्कूटर खरेदी करणे पूर्वीपेक्षा स्वस्त झाले आहे. हिरो स्प्लेंडर प्लसची सध्याची एक्स-शोरूम किंमत ८०,१६६ रुपये आहे. जी जीएसटी कपातीनंतर अंदाजे ७३,९०३ रुपयांपर्यंत कमी होणार आहे. टीव्हीएस स्टार सिटी प्लसची एक्स-शोरूम किंमत ७८,५८६ रुपये आहे. तर जीएसटी कपातीनंतर ही किंमत सुमारे ७०,७८६ रुपये असेल. या बाईकच्या इंजिन आणि वैशिष्ट्ये काय आहेत ? जाणून घेऊया…

  • 04 Nov 2025 01:05 PM (IST)

    04 Nov 2025 01:05 PM (IST)

    बोगस मतदारांविरोधात कारवाईसाठी 27 दिवसांचे आधी धरणे आंदोलन

    कापिल (ता. कराड) गावातील बोगस मतदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी गेल्या 27 दिवसांपासून सुरु आहे. याच मागणीवरून प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने कापिलचे ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी शुक्रवारी (दि.7) बेमुदत उपोषणास सुरुवात करण्याचा इशारा दिला.

  • 04 Nov 2025 01:00 PM (IST)

    04 Nov 2025 01:00 PM (IST)

    लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार अत्याचार; विविध लॉजमध्ये बोलवायचा अन्…

    लग्नाचे आमिष दाखवून एका 23 वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करुन लग्नास नकार देण्यात आला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात क्रांतीचौक पोलिसांनी आरोपी मनोहर लिंबाजी चव्हाण (वय २८, रा. गंगाखेड, जि. परभणी) याला सोमवारी सकाळी बेड्या ठोकल्या. तर त्याला 5 नोव्हेंबपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी आर.एस. जांबोटकर यांनी दिले. याप्रकरणात २३ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता ही अभियांत्रिकी शिक्षण घेत असून, ती गेल्या काही वर्षांपासून डेटा सायन्सच्या क्लाससाठी शहरात राहत होती.

  • 04 Nov 2025 12:50 PM (IST)

    04 Nov 2025 12:50 PM (IST)

    चिकन सेंटरच्या आडून गांजाची विक्री, पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

    पुणे ग्रामीण पोलीस दलाने दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. एक चिकन सेंटरच्या नावाखाली अवैधरित्या गांजाची विक्री सुरु होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सलीम आदम शेख असे आहे.

  • 04 Nov 2025 12:40 PM (IST)

    04 Nov 2025 12:40 PM (IST)

    चांदुररेल्वे कोठडी मृत्यू प्रकरणात आठ पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल

    अमरावती येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. चांदुररेल्वे पोलीस स्टेशनच्या कोठडीत रितेश मेश्राम यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ८ पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आता अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मोठी कारवाई केली आहे. न्यायालयीन चौकशी अहवालाच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या 8 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

  • 04 Nov 2025 12:26 PM (IST)

    04 Nov 2025 12:26 PM (IST)

    शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग

    शिक्षकानेच अलपवयीन विद्यार्थिनीचा विनभंग केल्याचे समोर आले आहे. पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या क्लासेसमध्ये हा प्रकार घडला आहे. एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली बोलावलं आणि मग मुलींचा विनयभंग करण्यात आला आल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर येताच शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चव्हाण असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचा नाव आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथे घडली.

  • 04 Nov 2025 12:00 PM (IST)

    04 Nov 2025 12:00 PM (IST)

    जुन्या चिरेखाणीतील साचलेल्या पाण्यात 5 जण बुडाले

    जुन्या चिरेखाणीतील साचलेल्या पाण्यात 5 जण बुडाले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. तसेच बघ्याची देखील मोठी गर्दी झाली आहे.

    Sindhudurg | जुन्या चिरेखाणीतील साचलेल्या पाण्यात 5 जण बुडाले#Sindhudurg #MaharashtraNews #DailyNewsUpdates pic.twitter.com/TJWuTrgorX

    — Navarashtra (@navarashtra) November 4, 2025

  • 04 Nov 2025 11:50 AM (IST)

    04 Nov 2025 11:50 AM (IST)

    गुवाहाटी कस्टम विभागाकडून 6 किलोचा गांजा जप्त

    02 नोव्हेंबर रोजी डीएमके (डॉन मुआंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, बँकॉक) ते जीएयू (गुवाहाटी, आसाम) येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या फ्लाईट एफडी-१२४ ने चेक-इन केलेल्या सामानाची तपासणी करताना, गुवाहाटी कस्टम विभागाच्या एलजीबीआयए युनिटच्या कस्टम अधिकाऱ्यांना ०३.११.२०२५ रोजी एक संशयास्पद वस्तू आढळली जी प्रतिबंधित असल्याचे मानले जात होते. प्राथमिक तपासणीनंतर, चेक-इन केलेल्या सामानातून अंदाजे ६.४६ किलोग्रॅम हिरव्या रंगाचा पदार्थ असलेले १२ पॅकेजेस जप्त करण्यात आले, जे हायड्रोपोनिक तण (गांजा/ड्रग्ज) असल्याचा संशय आहे. सामान बेवारस ठेवण्यात आले होते आणि जप्त केलेल्या मालाचे मालक सध्या फरार आहेत. ड्रग डिटेक्शन किट वापरून केलेल्या प्राथमिक चाचणीत गांजाची उपस्थिती दिसून आली. माल जप्त करण्यात आला आणि सदर मालाची एकूण किंमत ६.४६ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

  • 04 Nov 2025 11:40 AM (IST)

    04 Nov 2025 11:40 AM (IST)

    तटकरे हे कुटील नियतीने डाव खेळतात - महेंद्र थोरवे

    आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांच्यावर पलटवार केला आहे. थोरवे म्हणाले “सुनील तटकरे हे कुटील नियतीने डाव खेळत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत प्रत्यक्षात युती केली आहे.” तसेच “जर मला राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक तरी मतदान केल्याचे दाखवले, तर मी राजीनामा देईन,” असा ठाम दावा त्यांनी केला.

  • 04 Nov 2025 11:31 AM (IST)

    04 Nov 2025 11:31 AM (IST)

    राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, निवडणूका जाहीर होण्याची शक्यता

    राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. ज्यात या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आता लवकरच या निवडणुका होतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

  • 04 Nov 2025 11:15 AM (IST)

    04 Nov 2025 11:15 AM (IST)

    शेतकऱ्यांना केंद्र सरकारची 1400 कोटी मदत - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने 1400 कोटी मदत दिलेली आहे, राज्य सरकारने 31 हजार कोटी जाहीर केलेले आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी ताबडतोब ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी.  कॉर्पोरेट संस्थांनी ही मदत घ्यावी. कोकणातील भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

  • 04 Nov 2025 11:05 AM (IST)

    04 Nov 2025 11:05 AM (IST)

    सशस्त्र चळवळ उभी करणारे वासुदेव बळवंत फडके यांची जयंती

    भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सशस्त्र चळवळीमध्ये अग्रस्थानी असणारे वासुदेव बळवंत फडके यांचे नाव इतिहासामध्ये अजरामर झाले. त्यांचा जन्म: ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला तर मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३ रोजी झाला. हे एक भारतीय क्रांतिकारक होते, ज्यांना 'भारतीय सशस्त्र बंडाचे जनक' म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीमुळे ते खूप प्रभावित झाले होते आणि त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी धनिकांच्या घरातून लूट मिळवून क्रांतीसाठी वापरली आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध एक सशस्त्र चळवळ उभी केली.

  • 04 Nov 2025 10:59 AM (IST)

    04 Nov 2025 10:59 AM (IST)

    सोनाक्षीला लग्नानंतर सासू- सासऱ्यांसोबत राहण्याची नव्हती इच्छा?

    सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे बॉलीवूडमधील सर्वात गोंडस जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांनी लग्नापर्यंत त्यांचे नाते गुप्त ठेवले. आता लग्नानंतर ते त्यांचे वैवाहिक जीवन पूर्णपणे एन्जॉय करत आहेत. हे जोडपे अनेकदा सुट्टीवर जातात आणि तिथून अनेक फोटो शेअर करतात. सोनाक्षी आणि झहीर अनेकदा त्यांच्या पालकांसोबत ट्रिपवर असते. सोनाक्षी नेहमीच तिच्या सासरच्या लोकांचे कौतुक करताना दिसते. आता अशातच अभिनेत्रीने स्वतःच्या सासरच्या कुटुंबाचे अनेक रहस्य उघड केले आहे.

  • 04 Nov 2025 10:52 AM (IST)

    04 Nov 2025 10:52 AM (IST)

    केवळ 1 रुपयांत मिळवा JioHotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन!

    लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या JioHotstar चे करोडो युजर्स आहेत. JioHotstar प्लॅटफॉर्मवर सिरीअल्सपासून अगदी चित्रपट आणि सिरीजपर्यंत सर्व काही पाहायला मिळते. यासाठी सबस्क्रिप्शनची गरज असते. JioHotstar त्यांच्या युजर्ससाठी सतत नवीन ऑफर्स घेऊन येत असते. ज्यामुळे युजर्सना JioHotstar चे सबस्क्रिप्शन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. आता देखील JioHotstar च्या सबस्क्रिप्शनबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, युजर्सना केवळ 1 रुपयांत सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करता येणार आहे.

  • 04 Nov 2025 10:45 AM (IST)

    04 Nov 2025 10:45 AM (IST)

    Amanjot Kaur च्या आजीचे झाले निधन

    अमनजोत कौर (अमनजोत कौर आजी हृदयविकाराचा झटका) यांचे वडील भूपिंदर सिंग यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की,  माझी आई भगवंती ही अमनजोतची ताकद आहे. जेव्हा ती रस्त्यावर आणि उद्यानात क्रिकेट खेळायची तेव्हा मी माझ्या सुतारकामाच्या दुकानात असेन, पण माझी आई घराबाहेर बसून किंवा तिचा सराव पाहण्यासाठी उद्यानात जायची. गेल्या महिन्यात, माझ्या आजीला हृदयविकाराचा झटका आला, पण आम्ही अमनजोतला सांगितले नाही. गेल्या काही दिवसांपासून आम्ही सतत रुग्णालयात जात होतो. या विश्वचषक विजयामुळे आम्हाला तणावाच्या काळात खूप दिलासा मिळाला आहे.

  • 04 Nov 2025 10:33 AM (IST)

    04 Nov 2025 10:33 AM (IST)

    कॅप्टन हरमनप्रीत कौरने केले पाकिस्तानला ट्रोल!

    सोशल मिडियावर एक व्हिडिओ हरमनप्रीत कौरने शेअर केला आहे. यामध्ये ती कपमध्ये काहीतरी पिताना दिसत आहे. यावेळी व्हिडिओमध्ये ती काॅफी/चाय पिताना ती ट्राॅफी चेअर करताना दिसत आहे.

    HARMANPREET KAUR cooking entire Pakistan 🤣❤️🔥. pic.twitter.com/XB1Io0toKp

    — 𝐉𝐨𝐝 𝐈𝐧𝐬𝐚𝐧𝐞 (@jod_insane) November 3, 2025

  • 04 Nov 2025 10:24 AM (IST)

    04 Nov 2025 10:24 AM (IST)

    ‘या’ १२ राज्यांमध्ये सुरू होणार SIR ची प्रक्रिया

    बिहारनंतर, निवडणूक आयोग आता नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सघन सुधारणा (Special Intensive Revision (SIR) सुरू करत आहे. ती मंगळवार (४ नोव्हेंबर) पासून सुरू होईल. या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर प्रक्रिया ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनासह संपेल. या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५१ कोटी मतदार आहेत.

  • 04 Nov 2025 10:15 AM (IST)

    04 Nov 2025 10:15 AM (IST)

    लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार अत्याचार

    गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्याचाराची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 04 Nov 2025 10:11 AM (IST)

    04 Nov 2025 10:11 AM (IST)

    ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन; मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीत शोककळा

    मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.दया डोंगरे यांनी ‘मायबाप’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘उंबरठा’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

  • 04 Nov 2025 10:07 AM (IST)

    04 Nov 2025 10:07 AM (IST)

    Megapixel नक्की काय असतं?

    स्मार्टफोन खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते कॅमेरा. जर तुम्ही देखील स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने फोटोग्राफी करत असाल तर तुम्ही देखील मेगापिक्सेलचं नाव नक्कीच ऐकलं असेल. कारण फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन कॅमेऱ्याचा मेगापिक्सेल अत्यंत गरजेचा असतो. पण मेगापिक्सेल नक्की काय असतो आणि फोटोग्राफीसाठी मेगापिक्सेल किती गरजेचं आहे, याबाबत अनेकांना माहिती नाही. आता आम्ही तुम्हाला मेगापिक्सेल नक्की काय असतं, याबाबत सविस्तरपणे सांगणार आहोत.

Web Title: Marathi breaking news today live updates political national international entertainment business sports weather report breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: भारतीय संघाचा काॅल आला अन् ;  शेफाली वर्माची खास कहाणी
1

Top Marathi News Today: भारतीय संघाचा काॅल आला अन् ; शेफाली वर्माची खास कहाणी

MNS MVA Satyacha Morcha Update : राज ठाकरे सत्याच्या मोर्चासाठी लोकलने चर्चगेटला निघाले
2

MNS MVA Satyacha Morcha Update : राज ठाकरे सत्याच्या मोर्चासाठी लोकलने चर्चगेटला निघाले

Top Marathi News Today: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा
3

Top Marathi News Today: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा

Top Marathi News Today Live: भिवंडीत 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या
4

Top Marathi News Today Live: भिवंडीत 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.