मुंबई मेट्रो लाईन ७ वरील गोरेगाव पूर्व स्टेशनला आता 'झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व' असे नाव. नेस्कोजवळ असलेले हे स्टेशन प्रगती आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक असून, मुंबईकरांसाठी सोयीस्कर लाइफलाइन ठरले आहे.
मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं जीवावर बेतलं आहे. डोहात दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. काल सोमवारी वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. त्यावेळी पोहत असतांना दोन्ही मुलं डोहात बुडाले.
खोलीतील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून तिने आत्महत्या केली. हा प्रकार समजताच पालकांनी तिला खाली काढले. मात्र, तोपर्यंत ती बेशुध्द झाली होती. तिला उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी उबेर टॅक्सी बाईक बुक करणे एका तरुणीला महागात पडले. बाईक चालकाने ड्रॉप केल्यानंतर त्याने तरुणीला अश्लील शिव्या देत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.