सुशील कुमार(फोटो-सोशल मीडिया)
Wrestler Sushil Kumar’s bail cancelled : दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज, १३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून कुस्तीगीर सुशील कुमारचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. ज्युनियर कुस्ती चॅम्पियन सागर धनखरच्या हत्ये प्रकरणातील सुशील कुमार हा मुख्य आरोपी आहे. ४ मार्च रोजी न्यायमूर्ती संजय करोल आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द केला आहे. न्यायालयाने सुशील कुमारला एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.
सागर धनखरचे वडील अशोक धनखर यांच्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांनी उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाला आव्हान दिले होते. या दरम्यान, अशोक धनखर यांच्या वतीने वरिष्ठ वकील सिद्धार्थ मृदुल सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. तर दुसरीकडे, अधिवक्ता महेश जेठमलानी यांनी सुशील कुमारकडून युक्तिवाद केला.
४ मे २०२१ च्या रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंग क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली होती. हरियाणातील रोहतक येथील रहिवासी कुस्तीगीर सागर धनखड त्याच्या दोन साथीदार सोनू आणि अमित कुमारसह उपस्थित असताना या तिघांवरही ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. हे भांडण मालमत्तेच्या वादाशी संबंधित असल्याची माहिती आहे.हल्ल्यात सागरला गंभीर दुखापत झाली होती नंतर त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, त्याच्या डोक्यात ब्लंट फोर्स ट्रॉमामुळे मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच या हल्ल्यात त्याचे दोन्ही मित्र देखील जखमी झाले होते.
घटनेनंतर सुशील कुमार सुमारे अडीच आठवडे फरार होता. या दरम्यान तो पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणाच्या अनेक भागात फिरत राहिला होता. अखेर २३ मे २०२१ रोजी दिल्ली पोलिसांनी त्याला मुंडका परिसरातून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेच्या वेळी तो राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूकडून घेतलेल्या स्कूटीवर पैसे घेण्यासाठी आला होता.
हेही वाचा : PAK vs WI: कॅरिबियन कर्णधाराने केली पाकिस्तानची धुलाई! शाई होपने एकदिवसीय सामन्यात रचला इतिहास..
या घटनेनंतर कुस्तीगीर सुशील कुमारची प्रतिमेला धक्का बसला. अटकेनंतर त्याला रेल्वेच्या नोकरीतूनही निलंबित करण्यात आले होते. अटकेनंतर सुशील कुमारला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. तर ऑक्टोबर २०२२ मध्ये, त्याला आयपीसीच्या अनेक कलमांखाली दोषी ठरवण्यात आले आहे.