Photo Credit- Social Media शक्तीधाम रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू; गुटखामुळे मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा संशय
Marathi Breaking news live updates- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) अंतर्गत येणाऱ्या शक्तीधाम रुग्णालयात उपचारादरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शांती देवी मौर्या असे मृत महिलेचे नाव असून, तिच्यावर कुटुंब नियोजन व गर्भपातासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. उपचारादरम्यान अचानक तिची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेपूर्वी गुटखा खाल्ल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रकृती अधिक खालावल्याने तिला तत्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णवाहिकेतच तिचा मृत्यू झाला.
08 Apr 2025 05:53 PM (IST)
सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन तरुणींना 'एक्सक्युज मी' म्हटल्यामुळे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सात जणांकडून मराठीमध्ये बोला म्हणत दोघींना मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
08 Apr 2025 05:31 PM (IST)
महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या हिंदी भाषिकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल दणका देखील दिला. यानंतर त्यांच्याविरोधात उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. यावर संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी .मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भैय्यांना मुंबईत ,महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल .
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 8, 2025
08 Apr 2025 04:53 PM (IST)
भारतीय लोकप्रिय माजी क्रिकेटर केदार जाधव हा आता राजकारणाचे मैदान गाजवणार आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये केदार जाधव याचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
#WATCH | Former Indian Cricketer Kedar Jadhav joins BJP in the presence of Maharashtra minister and state BJP chief Chandrashekhar Bawankule in Mumbai. pic.twitter.com/4reAKk7F1Y
— ANI (@ANI) April 8, 2025
08 Apr 2025 04:51 PM (IST)
नांदेडमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. नांदेडमधील मालटेकडी भागात फर्निचरच्या दुकानाला आग लागली. काका कुशन गोडाऊन असे त्याचे नाव असून आगीमध्ये व्यवसायिकाचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे.
NANDED | नांदेडच्या मालटेकडी भागात फर्निचरच्या काका कुशन गोडाऊनला आग#Nanded #FurnitureWarehouseFire #MarathiNews pic.twitter.com/bTx0t2SADP
— Navarashtra (@navarashtra) April 8, 2025
08 Apr 2025 04:21 PM (IST)
पंजाबमधील जालंधर येथे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोरंजन कालिया यांच्या निवासस्थानी झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी चौकशी वेगाने सुरू आहे. या हल्ल्यामागील मोठा कट उघडकीस आला असून, खलिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसाचा कमांडर हॅपी पसियाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.हॅपी पसियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हल्ल्याची कबुली दिली आहे. याआधी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) पसियावर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
08 Apr 2025 04:15 PM (IST)
राज्यात कृत्रिम वाळू (एम-सँड) संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात कृत्रिम वाळू (एम-सँड) संदर्भात स्वतंत्र धोरण आणण्यात येणार आहे. यासंदर्भात पुढील मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यासोबतच राज्यातील मोठ्या जलसिंचन प्रकल्पांमधील वाळू उपसण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यामुळे त्या प्रकल्पांची जलधारण क्षमता वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
08 Apr 2025 04:14 PM (IST)
यल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानावर असतो तेव्हा तो चर्चेत येतो. विराट कोहली वानखेडे मैदानावर खूप रागावला. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या १२ व्या षटकात यश दयालच्या दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने शॉट मारला. यशला सोपा झेल घेण्याची संधी होती पण नंतर यष्टीरक्षक जितेश शर्मा आला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये टक्कर झाली आणि चेंडू खाली पडला. चेंडू बराच उंच होता आणि यष्टीरक्षक जितेशला झेल घ्यायचा होता पण यशने त्याचा आवाज ऐकला नाही आणि त्यामुळे आरसीबीला पराभव पत्करावा लागला. या दोन्ही खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव पाहून विराट कोहलीला मैदानावर आपला राग आवरता आला नाही. रागाच्या भरात त्याने त्याची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली.
खेळाडूची चूक आणि Virat Kohli संतापला, रागात मैदानावर फेकली टोपी! तुम्ही पहिला का हा Video#ViratKohli #ViralVideo #SportsNewshttps://t.co/XHw2lNGBkF
— Navarashtra (@navarashtra) April 8, 2025
08 Apr 2025 04:00 PM (IST)
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेतली आहे.
08 Apr 2025 03:32 PM (IST)
वडगाव मावळमध्ये प्रेमविवाहाच्या कारणावरुन तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील सांगवी येथील प्रेमविवाहातून झालेल्या हल्ला प्रकरणातील तिन्ही आरोपींना सोमवारी अखेर अटक करण्यात आली. वडगाव मावळ पोलिसांनी ही कारवाई केली.
08 Apr 2025 02:11 PM (IST)
कॉंग्रेस पक्षाचे नेते सहदेव बेटकर यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. गुहागरमधील महत्त्वपूर्ण नेते मानल्या जाणाऱ्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी देखील ते शिवसेनेमध्ये होते. आता कॉंग्रेसमधून त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश करुन घरवापसी केली आहे.
08 Apr 2025 02:04 PM (IST)
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गेल्या काही महिन्यात मोठे धक्के बसले आहेत. अनेक बडे नेते एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर आता ठाकरे गटात कोकणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण २०१९ मध्ये गुहागर विधानसभा निवडणूक लढवलेल्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे. ते ठाकरेंच्या साथीला येत असल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
08 Apr 2025 01:25 PM (IST)
जगभरात आता क्रिकेट या खेळाची आवड निर्माण होऊ लागली आहे. अनेक देश क्रिकेटमध्ये रस दाखवताना दिसून येत आहेत. जगभरात क्रिकेटच्या अनेक स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. परंतु, क्रिकेटच्या चांगल्या व्यवस्थेच्या अभावी काही देश इच्छा असून देखील त्यासाठी पात्र ठरू शकत नाहीत. ही एक शोकांतिका आहे. परंतु, ज्या देशाला क्रिकेट स्पर्धेत पात्रता मिळवण्याची संधी मिळते, त्यांच्यासाठी ते एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नसते. असेच एका देशाची स्वप्नपूर्ती झाली आहे. लहान आफ्रिकन देश टांझानियासाठी आनंदाची एक बातमी समोर आली आहे. खरंतर, टांझानियाने क्रिकेटसाठी एक नवा भीम पराक्रम केला आहे. या देशाचा क्रिकेट संघ पहिल्यांदाच २०२६ च्या आयसीसी अंडर १९ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. टांझानिया देशाने एक नवा इतिहास रचला आहे
08 Apr 2025 12:59 PM (IST)
राज्यातील वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी, दगडापासून वाळू तयार करण्यासाठी ʻएम-सँडʼ ही योजना राबवण्यात येत आहे. मात्र, उत्पादनवाढीसाठी या योजनेला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याची माहिती, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ʻनवराष्ट्रʼला दिली.
08 Apr 2025 12:57 PM (IST)
जगभरात वाढलेले वजन आणि लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. बदलेली जीवनशैली, सतत आहारात होणारे बदल आणि व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेला लठ्ठपणा अनेक आजारांचे कारण बनवतो. लठ्ठपणा वाढल्यानंतर मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागते. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी वेळा महिलांचा आत्मविश्वास कमी करून टाकते
08 Apr 2025 12:49 PM (IST)
सतीश भोसलेंची (खोक्या) पत्नी तेजूबाई भोसले त्यांच्या नातेवाईकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी अजितदादा यांची भेट घेत कुटुंबाच्या पुनर्वसनाची मागणी त्यांच्याकडे करणार आहेत.
08 Apr 2025 12:25 PM (IST)
देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना भीषण आग लागल्याची माहिती आहे. या आगीत अनेक प्राणी आणि वनस्पतींना धोका निर्माण झाला आहे, तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. देवगिरीच्या किल्ल्याला दौलताबाद किल्ला म्हणून सुद्धा ओळखले जाते. देवगिरी किल्ल्याला सर्व बाजूंनी आग का लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
08 Apr 2025 12:11 PM (IST)
आजवर अनेक खेळाडूंनी खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला आहे. यात काहींना यश मिळालं तर काहीना अपयश. अशातच आज पुण्यातील माजी क्रिकेटपटूने खेळाच्या मैदानातून थेट राजकीय आखाड्यात उडी मारली आहे. पुण्यातील माजी क्रिकेटपटू केदार जाधव Kedar Jadhav आज भारतीय जनता पक्षात प्रवेश कऱणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करेल.
08 Apr 2025 12:05 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुरेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात नुकताच प्रवेश केला होता. नगरसेवक ते महापौर, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. सांगली येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले.
08 Apr 2025 11:42 AM (IST)
वर्ध्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा भीषण अपघात झाला. यामध्ये पोलीसासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने हा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या तीन व पाच वर्षांच्या मुलांचा देखील मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
08 Apr 2025 11:28 AM (IST)
राज्यातील लाडक्या बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याचा मुहूर्त राज्य सरकारकडून ठरवण्यात आला आहे. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर अर्थात 30 एप्रिल रोजी लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार आहेत.
08 Apr 2025 11:26 AM (IST)
मनसे नेते राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा आग्रह करताना हिंदी भाषिकांवर द्वेषपूर्ण भाषण, लक्ष्यित हिंसाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
08 Apr 2025 11:09 AM (IST)
संभलच्या शाही जामा मशिदीच्या खटल्याची सुनावणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयात होणार आहे. जामा मशिदीच्या व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिकेवर अंतरिम आदेश देताना ८ जानेवारी २०२५ रोजी दिवाणी न्यायालयाच्या सर्वेक्षण आदेशाच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे..
08 Apr 2025 11:07 AM (IST)
कुणाल कामराच्या याचिकेवर मुंबई हाय कोर्टात पुढील सुनावणी 16 एप्रिलला. खार पोलीस ठाण्यातील गुन्हा रद्द करण्यासाठी कामराने केली होती याचिका
08 Apr 2025 10:59 AM (IST)
क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन् खेळाडू नेहमीच चर्चेत असतात. ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिकेटप्रती खूप एकनिष्ट असल्याचे बरेच उदाहरणं आहेत. अशाच एक क्रिकेटसाठी एकनिष्ट असणारा माजी कसोटी सलामीवीर विल पुकोव्स्कीने वयाच्या २७ व्या वर्षी सर्व स्वरूपाच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या अशा अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने असा निर्णय का घेतला? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे
08 Apr 2025 10:31 AM (IST)
आज आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई संघाचा सामना पंजाब किंग्ससोबत होणार आहे. आयपीएलच्या१८ व्या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदा समोरासमोर येणार आहे. या हंगामात चेन्नई संघाची कामगिरी आतापर्यंत खूपच निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत चेन्नई संघाने एकूण ४ सामने खेळले असून त्यांना केवळ एकच सामना जिंकता आला आहे तर तीन सामने गमवावे लागले आहे. गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली संघाने २५ धावांनी पराभूत केले होते.
08 Apr 2025 09:42 AM (IST)
सांगलीच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यांना रुग्णालायात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
08 Apr 2025 09:34 AM (IST)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल 2025 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. हप्ता अक्षय्य तृतीया या शुभ दिवशी देण्यात येणार असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या महिन्यात लाभार्थींच्या संख्येत वाढ होणार की घट, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील महिन्यात लाभार्थ्यांची संख्या वाढलेली होती.
08 Apr 2025 09:04 AM (IST)
गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील तापमान सातत्याने उच्चांक गाठत असून नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे वैदर्भीय जनतेची त्रेधा उडाली आहे. सध्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. नागपूर वेधशाळेने (IMD) पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तवली आहे.
08 Apr 2025 09:01 AM (IST)
बदलापूर येथील शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचे काही दिवसांपूर्वी कथित एन्काउंटर झाले होते. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदेचे पालक गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे, ते वकिलांच्या संपर्कातही नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुेल अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात असून, या घटनेने प्रकरण आणखी गूढ बनले आहे. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता त्याच्या पालकांच्या बेपत्ताच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात नव्याने तपासाची गरज निर्माण झाली आहे. पोलिस व तपास यंत्रणांसमोरही नवे आव्हान उभे ठाकले आहे.