• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Why Does The Cost Of Ivf Vary What Is The Reason

IVF साठी होणाऱ्या खर्चात फरक का होतो? काय आहे कारण

IVF चा दर हा विविध ठिकाणी वेगवेगळा असतो अशावेळी इतकी तफावत का असा प्रश्न पडणं साहजिक आहे. मात्र त्यामागे काही कारणं आहेत आणि त्याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 27, 2025 | 04:20 PM
वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये IVF चा खर्च वेगळा का (फोटो सौजन्य - iStock)

वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये IVF चा खर्च वेगळा का (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • IVF करणे किती महाग आहे
  • विविध ठिकाणी वेगवेगळा खर्च का येतो
  • आयव्हीएफसाठी काय महत्त्वाचे आहे 

जोडप्यांना विशेषत: विविध क्लिनिक्‍स आयव्‍हीएफसाठी वेगवेगळे शुल्‍क आकारत असल्‍याचे पाहिल्‍यानंतर त्‍यांना आयव्‍हीएफ रहस्‍यमय वाटू शकते. शहराबद्दल किंवा क्लिनिकच्‍या प्रतिष्‍ठेबद्दल असा विचार करणे स्‍वाभाविक आहे. पण खरेतर, हा फरक मार्केटिंगमधून नाही तर सायन्स व सरावामुळे होतो. या फरकासाठी तीन मुख्‍य गोष्‍टी कारणीभूत आहेत: प्रयोगशाळेची गुणवत्ता, वापरलेला प्रोटोकॉल आणि औषधोपचार. पण नक्की याचा कशा प्रकारे परिणाम होतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. 

नागपूरमधील बिर्ला फर्टिलिटी अँड आयव्‍हीएफचे फर्टिलिटी स्‍पेशालिस्‍ट डॉ. प्रमोद मधुकर येरने सांगतात, आयव्‍हीएफसाठी प्रयोगशाळा अत्‍यंत महत्त्वाची आहे. प्रयोगशाळेमध्ये गर्भधारणा (फर्टिलायझेशन) होते, गर्भ वाढतात आणि कधी-कधी अनुवांशिक चाचणी केली जाते. लहान फरक महत्त्वाचे असतात, जसे हवेची गुणवत्ता, इनक्यूबेटर, कल्चर मीडिया, एम्‍ब्रायोलॉजिस्‍ट किती अनुभवी आहेत हे देखील महत्त्वाचे असते. उच्‍च दर्जाची उपकरणे आणि काटेकोर मानकांचा अवलंब करणारे आयव्‍हीएफ केंद्र अधिक महाग असू शकते. हे लक्झरीबद्दल नाही. प्रयोगशाळेमधील लहान त्रुटी गर्भाच्या विकासावर आणि शेवटी यशस्‍वी दरावर परिणाम करू शकतात.

प्रोटोकॉल कसा महत्त्वाचा

यानंतर प्रोटोकॉल महत्त्वाचा आहे. IVF हा सर्वांसाठी एकच पर्याय नाही. काही महिला मानक स्टीम्युलेशनला उत्तम प्रतिसाद देतात, तर काही महिलांना सौम्य किंवा विरोधी प्रोटोकॉलची आवश्यकता असते. कमी गर्भाशय क्षमता असलेल्या महिलांसाठी दुहेरी स्टीम्युलेशनसारखे अधिक गुंतागूंतीचे दृष्टिकोन आवश्यक असू शकतात. वेगवेगळे प्रोटोकॉल म्‍हणजे स्कॅन, इंजेक्शन आणि प्रक्रियांची संख्या वेगवेगळी असते. स्वाभाविकपणे, त्यामुळे एकूण खर्च बदलतो.

एक IVF अयशस्वी झाल्यास पुन्हा द्यावे लागतात पैसे? तज्ज्ञांचे योग्य उत्तर, तुम्हीही करताय का विचार

औषधोपचारामुळेही खर्च बदलतो 

औषधोपचार आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. गर्भाशय स्टीम्युलेशन औषधे स्वस्त नसतात आणि रुग्णानुसार डोस वेगवेगळा असतो. उत्तम गर्भाशय क्षमता असलेल्‍या तरुण महिलेला कमी औषधांची आवश्यकता असू शकते. कमी गर्भाशय क्षमता असलेल्‍या महिलेला अधिक किंवा जास्त परिणामकारक औषधांची आवश्यकता असू शकते. ब्रँड, फॉर्म्युलेशन आणि वापराचा कालावधी यांचा किमतीवर परिणाम होतो. 

महत्त्वाची माहिती 

जोडपे आयव्हीएफ खर्चाची तुलना करतात तेव्हा स्‍वस्‍त खर्चाचा नेहमी सर्वोत्तम परिणाम दिसून येत नाही. स्वस्त आयव्‍हीएफ प्रक्रिया प्रयोगशाळेत अडचणी निर्माण करू शकते किंवा कमी योग्य प्रोटोकॉल वापरू शकते. गुणवत्ता आणि परिणाम महत्त्वाचे आहेत. उत्तम फर्टिलिटी स्‍पेशालिस्‍ट प्रत्‍येक उपचार खर्चाचा किती परिणाम होतो आणि त्‍यामुळे उपचार यशस्‍वी होण्‍याची शक्‍यता कशाप्रकारे वाढते, याचे स्‍पष्‍टीकरण देईल. 

शेवटी, आयव्हीएफचा खर्च फक्‍त बिलामधील आकडा नाही. त्‍यामधून सायन्स, काळजी आणि काळजीपूर्वक नियोजन दिसून येते. प्रयोगशाळेची गुणवत्ता, प्रोटोकॉल निवड व औषधे समजून घेतल्याने आयव्‍हीएफसाठी होणारा खर्च समजतो आणि जोडप्यांना योग्‍य निर्णय घेण्यास मदत होते.

World IVF Day: आयव्हीएफ म्हणजे काय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Why does the cost of ivf vary what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health Tips
  • IVF

संबंधित बातम्या

पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? ‘या’ पानांचे नियमित करा सेवन, आजीबाईच्या बटव्यातील जादुई उपाय
1

पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? ‘या’ पानांचे नियमित करा सेवन, आजीबाईच्या बटव्यातील जादुई उपाय

IVF किमतीची विभागणी करून माहिती दिल्यास होते मदत, कपल्स करू शकतात आत्मविश्वासाने निवड
2

IVF किमतीची विभागणी करून माहिती दिल्यास होते मदत, कपल्स करू शकतात आत्मविश्वासाने निवड

डिजीटल स्क्रिनमुळे होतो डोळ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम, गंभीर परिणाम नक्की कसे होतात
3

डिजीटल स्क्रिनमुळे होतो डोळ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम, गंभीर परिणाम नक्की कसे होतात

त्वचा उजळवण्यापासून ते हाडांना मजबूत करण्यापर्यंत या 2 रुपयांच्या पानांचे सेवन शरीरासाठी जणू वरदान! रिकाम्यापोटी सेवन करा
4

त्वचा उजळवण्यापासून ते हाडांना मजबूत करण्यापर्यंत या 2 रुपयांच्या पानांचे सेवन शरीरासाठी जणू वरदान! रिकाम्यापोटी सेवन करा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
pradosh Vrat: धनत्रयोदशी आणि शनि प्रदोष व्रताचा दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, महत्त्व

pradosh Vrat: धनत्रयोदशी आणि शनि प्रदोष व्रताचा दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, महत्त्व

“आता वेळ आली आहे…” कतरिना कैफच्या प्रेग्नंसीबद्दल विकी कौशल उत्साहित, जोडपं लवकरच देणार गुडन्यूज

“आता वेळ आली आहे…” कतरिना कैफच्या प्रेग्नंसीबद्दल विकी कौशल उत्साहित, जोडपं लवकरच देणार गुडन्यूज

LG Electronics Share: बंपर लिस्टिंगनंतरही ब्रोकरेज बुलिश, विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना दिला ‘हा’ सल्ला

LG Electronics Share: बंपर लिस्टिंगनंतरही ब्रोकरेज बुलिश, विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना दिला ‘हा’ सल्ला

Recipe : चवदार, गरमा गरम, वजन कमी करण्यासही मदत करेल ‘ भोपळ्याचं सूप’; हिवाळ्यात आहारात जरूर करा समावेश

Recipe : चवदार, गरमा गरम, वजन कमी करण्यासही मदत करेल ‘ भोपळ्याचं सूप’; हिवाळ्यात आहारात जरूर करा समावेश

प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन, स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका

प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन, स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका

Ratnagiri News: आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अन्य मुलींच्या शोषणाची भीती; महाराजावर गंभीर आरोप

Ratnagiri News: आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अन्य मुलींच्या शोषणाची भीती; महाराजावर गंभीर आरोप

Moto G100: बजेट किंमतीत मोटोरोलाने लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Moto G100: बजेट किंमतीत मोटोरोलाने लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.