Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षांची संख्या कमी असल्याची चर्चा सुरू असतानाच रात्रीच्या वेळी एका तरुणीला ई-रिक्षा सेवा नाकारल्याचा आरोप समोर आला आहे. ८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता पुण्याहून माथेरानला आलेल्या प्रिया कळंबे यांनी प्रकृतीची माहिती देत दस्तुरी नाका येथून रिगल नाक्यापर्यंत सोडण्याची विनंती केली....

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 11, 2026 | 04:52 PM
माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी

माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:
  • माथेरान मध्ये ई रिक्षा चालकाची मनमानी
  • स्थानिक तरुणीला उद्धट उत्तरे
  • चालकाच्या मग्रुरीची तक्रार
माथेरान : माथेरानमध्ये पर्यावरण पूरक ई रिक्षा (Matheran E Rickshaw) या कमी पडत असल्याची बोंब मारली जात आहे. पण माथेरान शहरातील एका तरुणीला रात्री दहा वाजता इ रिक्षा सेवा देत नसल्याचे लेखी निवेदन पालकांनी केले आहे. संबंधित तरुणीला उद्धट उत्तरे देणाऱ्या रिक्षाचालक याच्याबद्दल शिवसेना पक्षाच्या महिला संपर्कप्रमुख यांनी तक्रार करण्याची भाषा करून देखील संबंधित रिक्षाचालक मग्रूरपणे वागत राहिला. दरम्यान, इ रिक्षा चालक यांच्या मग्रुरीची दखल रिक्षा संघटना घेणार काय? असा प्रश्न निर्माण झाला असून माथेरान मध्ये रात्रभर इ रिक्षा सुरू असतात हे कोणत्या नियमाखाली सुरू आहे,पर्यटकांकडून जास्त पैसे घेऊन इ रिक्षा मधून सेवा दिली जात असल्याचे दिसून आल्याने विभागीय परिवहन अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे देखील लक्ष लागून राहिले आहे.

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा

माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी

शिवसेना महिला आघाडी माथेरान शहर संपर्क संघटक प्रीती कळंबे यांची कन्या प्रिया या आठ ऑगस्ट 2026 शनिवार रोजी रात्री पुणे येथून माथेरान दस्तुरी नाका येथे पोहचल्या.दस्तुरी नाका येथील इ रिक्षा स्टँड येथे आल्यावर रात्री १० वाजता डायबेटिक रुग्ण असलेल्या प्रिया कळंबे यांनी आपल्याला असलेल्या आजाराची माहिती इ रिक्षा चालक यांना देत रिगल नाका येथे सोडण्याची सूचना केली. कळंबे कुटुंब रिगल नाका पासून पुढे इको पॉईंट भागात राहतात आणि रात्रीच्या वेळी एकटी मुलगी त्या भागातून जाणे जिकिरीचे होते.तिकडे प्रिया कळंबे यांनी आपल्या आईला रिगल नाका येथे घेण्यासाठी यायला सांगितले होते.पण रिक्षा चालक यांच्या मनात काहीतरी वेगळे होते.दस्तुरी नाका येथे असलेल्या पर्यटकांना रिक्षा मध्ये भरून प्रवास देण्याची तयारी केल्यावर प्रिया कळंबे यांनी मला रिगल नाक्यावर सोडा अशी विनवणी केली. रिगल हॉटेल पासून प्रबळ हाऊस बंगला इको पॉईंट रोड इथे राहत असलेल्या प्रिया कळंबे यांना संबंधित रिक्षा चालक यांना आपण एकटे असून रिगल नाका पर्यंत तरी सोडावे असे विनवणी करीत होती.

150 रुपये भाडे देण्याची तयारी

पर्यटक यांच्याकडून जास्त पैसे देणारे भाडे मिळणार असल्याने संबंधित रिक्षाचालक याने आपली गाडी बंद केली.त्यानंतर रिक्षा चालक याने रिक्षा बंद करून साईड ला उभा राहिला असता प्रिया कळंबे यांनी आपल्या घरी फोन करून रिक्षा चालक आणि रिक्षा यांचे फोटो पाठवून देत हा रिक्षा चालक रिक्षा घेऊन येत नसल्याची माहिती दिली. पोलिस तक्रार करण्याची भाषा केल्यानंतर संबंधित रिक्षा चालक याने शेवटी साडे दहा वाजता रिगल नाका येथे सोडले पण प्रवासात उद्धट बोलत असल्याची प्रिया कळंबे यांची तक्रार आहे.तर प्रिया कळंबे यांनी 150 रुपये भाडे देण्याची तयारी दाखवली होती,तरी देखील इ रिक्षा चालक ऐकत नव्हता.स्टँड ला पर्यटक होते त्यांना सोडायला तयार झाला. हे कितपत योग्य आहे असा प्रश्न कळंबे यांनी उपस्थित केला आहे.

त्या दिवशी त्या रिक्षा चालक बोलत होता माझ्या मुलीला ह्या आधी रिक्षा नव्हती तर काय करायची.ही कोणती पद्धत आहे आणि आता मध्ये फरक आहे हे माझ्या मुलीच उत्तर होता.आता रिक्षा असताना मी रात्री का चालत जाऊ असे बोलल्यावर पूर्वी कुठे इ रिक्षा होत्या त्यावेळीं चालतच जायचे ना?असा प्रश्न त्या रिक्षाचालकाने प्रिया कळंबे यांना विचारला.माथेरान च्या मुलीसोबत घडू नये त्या साठी तुम्ही योग्य ती काळजी घ्यावी आणि रिक्षा संघटनेसोबत बोलून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी प्रीती कळंबे यांनी दिली.

Raigad News: माथेरानला जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा! रविवारी पहाटे 5 ते 8.30 वाजेपर्यंत घाटरस्ता बंद, पर्यटकांना मोठा फटका

Web Title: Matheran e rickshaw service denied to woman at night complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Matheran
  • RTO

संबंधित बातम्या

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार
1

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार

कार मोडिफिकेशन आणि RTO नियम; महाराष्ट्रात नक्की काय लीगल आहे आणि काय नाही? जाणून घ्या सविस्तर माहिती
2

कार मोडिफिकेशन आणि RTO नियम; महाराष्ट्रात नक्की काय लीगल आहे आणि काय नाही? जाणून घ्या सविस्तर माहिती

Solapur News : RTOची खास संधी! ‘MH-13-FF’ मालिकेत मिळवा पसंतीचा फॅन्सी नंबर; १८० दिवसांत वाहन नोंदणी बंधनकारक
3

Solapur News : RTOची खास संधी! ‘MH-13-FF’ मालिकेत मिळवा पसंतीचा फॅन्सी नंबर; १८० दिवसांत वाहन नोंदणी बंधनकारक

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज
4

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.