Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“संजय राऊत माझा प्युअर माल…”; उबाठा-मनसे युतीवरून गुलाबराव पाटलांच्या ‘फटक्यां’नी गाजली सभा

राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. ठाकरे बंधू यांनी एकत्रित यावे यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मागणी करत आहेत. जनतेच्या मनात तेच होईल असे पक्षाचे नेते म्हणत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2025 | 09:27 PM
“संजय राऊत माझा प्युअर माल…”; उबाठा-मनसे युतीवरून गुलाबराव पाटलांच्या ‘फटक्यां’नी गाजली सभा
Follow Us
Follow Us:

मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. ठाकरे बंधू यांनी एकत्रित यावे यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मागणी करत आहेत. जनतेच्या मनात तेच होईल असे पक्षाचे नेते म्हणत आहेत. दरम्यान आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटी यांनी तूफान फटकेबाजी केली. त्यांनी ठाकरे गट आणि मनसे युतीवर देखील भाष्य केले आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. त्यामुळे आता सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार याची वाट पाहत आहेत. आज इकडे आणि तिकडे वर्धापन दिन साजरा होत आहे.”

Operation Sindoor: “गल्लीत बसून जे बरळत आहेत…”; श्रीकांत शिंदेंचे ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर

पुढे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “माझा जो प्यूअर माल आहे तो संजय राऊत.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणीतरी प्रस्ताव दिला होता की राज ठाकरेंच्या मनसे पक्षाशी युती करा. पण संजय राऊत नावाचे जे कार्ट होत ते म्हटलं, मनसे तर संपलेला पक्ष, याच्याशी काय युती करायची? अन् आता हे मनसेला जवळ या म्हणत आहेत. भावाने भावपाशी आले पाहिजे. विधानसभेत आम्ही यांच्या छाताडावर भगवा फडकवला त्याचप्रमाणे महालिकेवर युतीचा झेंडा फडकणार हे आता त्यांच्या लक्षात आले आहे.”

एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

खरी शिवसेना आज तुमच्यासमोर आहे. हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण आणि जनतेचा आशीर्वाद आपलयाकडे आहे. हिंदुत्वाचा अंगार म्हणजे शिवसेना, मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेना. शिवसेना म्हणजे शौर्य. शिवसेना म्हणजे स्वाभिमान आणि अभिमान आणि शिवसेना म्हणजे एकजूट होय. शिवसेना म्हणजे आपला प्राण 2024 मध्ये आपण 80 पैकी 60 जागा जिंकल्या. तर उबाठाने 85 पैकी अवघ्या 20 जागा जिंकल्या. आपल्या पक्षाच्या एक तृतीयांश मते त्यांना मिळाली नाही. त्यांनी त्यांच्या जागा कॉँग्रेसच्या व्होट बँकेवर, कॉँग्रेसच्या मेहेरबानीवर जिंकल्या. जनतेने या निवडणुकीमध्ये बिन पाण्याची हजामत करून टाकली. आपलयाकडे आत्मविश्वास तर त्यांच्याकडे अहंकार आहे. अहकांरी लोकांचा फणा 2024 मध्ये जनतेने ठेचला आहे.

Eknath Shinde ShivSena Melava: “इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतलं

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी कोणी केली हे जनतेला माहिती आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा घात केला. हिंदुत्वाचा विश्वासघात केला. सरडा रंग बदलतो. मात्र इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहीला.  मुख्यमंत्रिपदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार. हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी मतदानाचा अधिकार गमावला.”

Web Title: Minister gulabrao patil criticizes to sanjay raut ubt and mns alliance vardhapan din mumbai 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 09:27 PM

Topics:  

  • Gulabrao Patil
  • MNS
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धमकी? गुलाबराव पाटलांवर राऊतांचा गंभीर आरोप
1

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धमकी? गुलाबराव पाटलांवर राऊतांचा गंभीर आरोप

अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
2

अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रताप सरनाईकांसह तीन नेत्यांचं मोठं विधान; राजकारणात चर्चांना उधाण
3

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रताप सरनाईकांसह तीन नेत्यांचं मोठं विधान; राजकारणात चर्चांना उधाण

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार
4

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.