Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1000 ITI मध्ये कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

भारताच्या इतिहासात अनेक गौरवशाली क्षण आले, जे आठवूनच आपल्याला अभिमान वाटते. यातीलच गौरवशाली इतिहास म्हणजे कारगिल युद्धातील विजय. याच गौरवशाली इतिहासाबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 26, 2025 | 06:54 PM
१००० आयटीआयमध्ये कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

१००० आयटीआयमध्ये कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या शौर्याचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक असलेला कारगिल विजय दिवस हा आपल्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण पर्व आहे. पाकिस्तानी घुसखोरांवर मिळवलेला हा विजय भारतीय सैन्याच्या पराक्रमाची साक्ष आहे. या विजयाचा गौरव आणि त्यामागील त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष पुढाकार घेतला आहे.

भारताचा गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही महाराष्ट्रातील एक हजार शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये कारगिल विजय दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने क्रांतिकारक लहुजी साळवे ITI, लोणावळा येथे आयोजित कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी समाजसेविका श्रीमती मंजू लोढा उपस्थित होत्या.

Shrikant Shinde : कोल्हापूरमध्ये महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल, श्रीकांत शिंदे यांचा विश्वास

या उपक्रमामार्फत देशभक्तीचा संदेश पोहचवण्याचा प्रयत्न

या उपक्रमामार्फत देशभक्ती, शौर्य आणि कृतज्ञतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा हा आमचा उद्देश आहे. अनेक परकीय आक्रमणे आपल्या देशावर झाली पण त्याचा सामना करून आपण प्रगतीच्या वाटेवर पुढे जात आहोत. कारगिल विजय दिनाच्या माध्यमातून आपला गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केला आहे. आज विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिक सुद्धा येथे उपस्थित आहेत, याचा अतिशय आनंद आहे असे प्रसंगी बोलतांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

कार्यक्रमात मुलांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते, जिथे त्यांना देशसेवा, शिस्त आणि समर्पण यांची शिकवण देण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष देशसेवकांशी संवाद साधत सैनिकांच्या अनुभवांची माहिती घेतली.

MNS News : मनसेकडून खळखट्याक! मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल्सची तोडफोड,मेनू आणि साइनबोर्ड मराठीत बनवण्याची धमकी

यावेळी मंजू लोढा यांनीही उपस्थित सैनिकांचे आभार मानत, आपल्या भावना व्यक्त केल्या. “आज आपण मोकळ्या आकाशाखाली उभं राहू शकतो, यामागे तुमचं कर्तृत्व आहे. तुमच्याबद्दलचा आदर शब्दांत व्यक्त करता येत नाही,” असं त्यांनी सैनिकांना उद्देशून सांगितलं.

कार्यक्रमात माजी सैनिक, सैन्यातील कार्यरत जवान यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या सेवेसंबंधी आठवणी आणि अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले.

Web Title: Minister mangal prabhat lodha informed kargil vijay diwas program organized in 1000 iti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • Kargil Vijay Divas
  • Mangal Prabhat Lodha
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच
1

Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले
2

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले

Kolhapur : कोल्हापूरात कुणबी नोंदीतील चुका उघड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप
3

Kolhapur : कोल्हापूरात कुणबी नोंदीतील चुका उघड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप

Thane News : SRA योजनेत रहिवाशांची फसवणूक; तक्रारीनंतर अधिकाऱ्यांची खरडपट्टी
4

Thane News : SRA योजनेत रहिवाशांची फसवणूक; तक्रारीनंतर अधिकाऱ्यांची खरडपट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.