Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरमधील 432 विहिरी बेपत्ता! प्रशासकीय आकडेवारीतून खुलासा; बिल्डरांच्या हितावर गंभीर सवाल

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदर शहरात विकासाच्या नावाखाली झालेल्या बेसुमार बांधकामांमुळे पारंपरिक जलस्रोत वेगाने नामशेष होत आहेत. नगरपरिषदेच्या जुन्या दप्तरी नोंद असलेल्या ५०८ विहिरींपैकी आता शहरात केवळ ७६ विहिरी शिल्लक राहिल्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 03, 2026 | 12:43 PM
मिरा-भाईंदरमधील 432 विहिरी बेपत्ता! ( सौजन्य - सोशल मीडिया )

मिरा-भाईंदरमधील 432 विहिरी बेपत्ता! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • मिरा-भाईंदरमधील 432 विहिरी बेपत्ता!
  • प्रशासकीय आकडेवारीतून खुलासा
  • बिल्डरांच्या हितावर गंभीर सवाल
Mira Bhayandar News : मीरा-भाईंदर शहरात विकासाच्या नावाखाली झालेल्या बेसुमार बांधकामांमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे पारंपरिक जलस्रोत अक्षरशः नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी नगरपरिषदेच्या अधिकृत दप्तरी नोंद असलेल्या ५०८ विहिरींपैकी आता महापालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार शहरात अवघ्या ७६ विहिरी शिल्लक राहिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उर्वरित तब्बल ४३२ विहिरींचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने हे नैसर्गिक जलस्रोत नेमके गेले कुठे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. ( Mira Bhayandar News ) 

Agricultural News: शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार!; विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री केल्यास थेट फौजदारी कारवाई

सिमेंटच्या जंगलात नैसर्गिक पाण्याचे साठे दुर्लक्षित

मिरा-भाईंदर शहराच्या जडणघडणीपूर्वी भाईंदर, गोडदेव, नवघर, खारी, घोडबंदर, मिरे, काशी, वरसावे, मुर्धा, राई, मोरवा आणि डोंगरी यांसारख्या गावांमध्ये विहिरींचे पाणी पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी व शेती-बागायतीसाठी मुख्य आधार होते. मुंबईलगतचा परिसर असल्याने येथे वेगाने नागरीकरण झाले आणि नगरपरिषदेचे रूपांतर पुढे महानगरपालिकेत झाले. मात्र, या सिमेंटच्या जंगलात नैसर्गिक पाण्याचे साठे दुर्लक्षित राहिले. माहिती अधिकारात नगररचना विभागाने दिलेल्या पूर्वीच्या विकास आराखड्‌यानुसार शहरात ११५ सार्वजनिक आणि ३९३ खासगी अशा एकूण ५०८ विहिरींची नोंद होती. मात्र, महापालिकेच्या सद्यस्थितीतील नोंदीनुसार शहरात केवळ ५४ सार्वजनिक आणि २२ खाजगी अशा एकूण ७६ विहिरीच अस्तित्वात आहेत.

शहरात प्रशासकीय नियोजनाचा बोजवारा

भूजल पातळी टिकवून ठेवण्यात विहिरींचे योगदान अत्यंत मोलाचे असते. एकीकडे पाणीटंचाई निवारणासाठी व शिल्लक विहिरींच्या संवर्धनासाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते, तर दुसरीकडे मूळ विहिरीच नष्ट होत असल्याने प्रशासकीय नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे.

प्रत्यक्ष जागेवर पडताळणी करुन शोध घेणे गरजेचे

शहरावरील पाणीटंचाईचे सकट दिवसेंदिवस गडद होत असताना, प्रशासनाने जुन्या ५०८ विहिरींच्या नोंदीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी करावी, बेपत्ता विहिरीचा शोध घेऊन त्या बुजवणा-यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमधून केली जात आहे.

बिल्डरांचे हितसंबंध

या दोन्ही अधिकृत आकडेवारींची तुलना केल्यास सार्वजनिक वापरातील ६१, तर खासगी ३७१ अशा मिळून तब्बल ४३२ विहिरी कागदोपत्री आणि प्रत्यक्ष पटलावरून गायब झाल्याचे स्पष्ट होते. जमिनींचे गगनाला भिडलेले भाव आणि बिल्डरांचे हितसंबंध यामुळे या विहिरी बुजवून त्यावर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या की प्रशासनाने हेतुपुरस्सर या नोंदी गाळल्या, याबाबत संशयाचे वातावरण आहे.

MSEDCL Scam : वादग्रस्त जागा महावितरणच्या गळ्यात! बिल्डरांवर गुन्हा; नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करुन फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: मीरा-भाईंदरमधील विहिरींच्या संख्येत नेमकी किती घट झाली आहे?

    Ans: पूर्वीच्या विकास आराखड्यानुसार शहरात ५०८ विहिरींची नोंद होती, जी आता घसरून केवळ ७६ वर आली असून तब्बल ४३२ विहिरी बेपत्ता झाल्या आहेत.

  • Que: पारंपरिक जलस्रोतांच्या या ऱ्हासामोरील मुख्य कारण काय मानले जात आहे?

    Ans: शहरात झालेले बेसुमार नागरीकरण, सिमेंटची जंगले आणि जमिनींचे वाढते भाव यांमुळे विहिरी बुजवून त्यावर इमारती उभ्या राहिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • Que: पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून प्रशासनाकडे कोणती प्रमुख मागणी केली जात आहे?

    Ans: प्रशासनाने जुन्या ५०८ विहिरींच्या नोंदींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी करावी आणि बेपत्ता विहिरी बुजवणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Mira bhayandar 432 wells disappeared traditional water sources ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये नियम धाब्यावर; निवासी आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल
1

Mira-Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये नियम धाब्यावर; निवासी आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल

Nagpur News : नागपूरकरांना दिलासा; तूर्तास पाणी कपात नाही; पाण्याची बचत आणि गळती रोखण्यावर मनपाचा भर
2

Nagpur News : नागपूरकरांना दिलासा; तूर्तास पाणी कपात नाही; पाण्याची बचत आणि गळती रोखण्यावर मनपाचा भर

Nagpur News : पाणीटंचाईचे संकट गडद; लवकरच कपात ;तोतलाडोह आणि कन्हानमधील जलसाठा निम्म्यावर
3

Nagpur News : पाणीटंचाईचे संकट गडद; लवकरच कपात ;तोतलाडोह आणि कन्हानमधील जलसाठा निम्म्यावर

सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
4

सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.