Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाईंदरमध्ये RTO ची धडक कारवाई! ५६५ रिक्षाचालक मराठीत नापास; ३,४४३ रिक्षांची केली तपासणी

मीरा-भाईंदरमध्ये रिक्षाचालकांवर करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2026 | 10:54 AM
भाईंदरमध्ये RTO ची धडक कारवाई! ५६५ रिक्षाचालक मराठीत नापास; ३,४४३ रिक्षांची केली तपासणी

भाईंदरमध्ये RTO ची धडक कारवाई! ५६५ रिक्षाचालक मराठीत नापास; ३,४४३ रिक्षांची केली तपासणी

Follow Us
Follow Us:
  • तपासणीत शेकडो चालकांना आवश्यक भाषेचे ज्ञान नसल्याचे आढळले
  • परवाने देताना प्रक्रियेत त्रुटी असल्याचा संशय व्यक्त
  • काही कागदपत्रांबाबत अनियमिततेचे आरोप समोर आले
मीरा-भाईंदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरातील रिक्षाचालकांविरोधात व्यापक तपासणी मोहीम राबवली असून, या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूण ३ हजार ४४३ रिक्षांच्या परमिट व लायसन्सची तपासणी करण्यात आली असता, तब्बल ५६५ रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलता येत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ही माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी प्रसाद नलवडे यांनी २८ एप्रिल रोजी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असताना एवढ्या मोठ्या संख्येने चालकांना मराठी येत नसल्याने प्रशासकीय प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राज्यातील 364 पोलिसांना मिळणार बढती; सहाय्यक पोलिस निरीक्षक आता होणार पोलिस निरीक्षक

बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने

दरम्यान, मराठी न येणाऱ्या चालकांना बॅज, परमिट व लायसन्स कशाच्या आधारे देण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परवाने मिळत असल्याची चर्चा असताना आरटीओ प्रशासनाने मात्र तपासणीत कोणतेही बोगस बैंज, परमिट किंवा लायसन्स आढळून आले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दोषीवर कठोर कारवाईची मागणी

या सर्व प्रकारामुळे रिक्षा बेंज, परमिट व लायसन्स बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळविण्यात आल्याची शक्यता बळावली आहे. माहिती अधिकारातून – मिळालेल्या कागदपत्रामध्ये खाडाखोड करून एकाच – नोंदणी क्रमांकाचे अनेक जन्मदाखले तयार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या – प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई – करावी तसेच संशयित बॅज, परमिट व लायसन्स – तातडीने रद्द करावेत, अशी मागणी समाजसेवक निलेश फापाळे यांनी केली आहे.

Maharashtra Weather: विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; राज्यावर दुहेरी संकट, पुढील काही तास धोक्याचे, काय आहे IMD चा अंदाज?

अनेकांकडे एकाच क्रमांकाचे जन्मदाखले

रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य असून, राज्यातील किमान १५ वर्षाच्या वास्तव्याचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड व वीजबिल सादर करणे आवश्यक असते. मात्र, अनेक चालकांनी एकाच नोंदणी क्रमांकाचे जन्मदाखले सादर करून बेकायदेशीररीत्या वास्तव्याचे दाखले मिळवल्याचे समोर आले आहे. हे दाखले भाईंदर येथील अप्पर तहसीलदार कार्यालयातून नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने देण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mira bhayandar auto drivers marathi language check rto inspection irregularities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • Marathi Language
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
1

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

राज्यातील पहिली ‘प्रीपेड रिक्षा सेवा’ ठाण्यात सुरू, रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस थांबणार!
2

राज्यातील पहिली ‘प्रीपेड रिक्षा सेवा’ ठाण्यात सुरू, रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस थांबणार!

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
3

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.