फोटो सौजन्य- chatgpt
नवी मुंबई शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन, धरणातील पाणीसाठा आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटींबाबत महानगरपालिकेत तहकूब महासभेत पाणी जियोजन विषयावर चर्चा करण्यात आली. राज्य शासनाने सर्व पालिकांना 10 टक्के पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. मात्र नवी मुंबई पालिकेत कोणतीही कपात होणार नाही अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. त्यानुसार शुक्रवारी महासभेत पाणी कपात न करण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील व सभागृह नेते सागर नाईक यांनी आयुक्तांना दिले. यावेळी आयुक्तांनी पाणी नियोजनावर भर देत पाणी वाचवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले.
आयुक्तांनी मोरबे धरणावर माहिती दिली. धरणाचा एकूण संकल्पित साठा १९० दशलक्ष घनमीटर इतका आहे. २३ ऑक्टोबर २०२६ च्या सकाळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, धरणात १६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. शहरात दरमहा सुमारे १४.४० दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होतो. धरणात ५.५२ दशलक्ष घनमीटर मृत साठा आहे.
अनधिकृत नळ जोडण्या शोधून त्या खंडित करणे, दंडात्मक कारवाई करणे आणि पाणी गळती रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात विशेष पथके तैनात केली जात आहेत. या पथकांचे नेतृत्व सहायक आयुक्त करणार आहेत.
बांधकाम क्षेत्र, सर्व्हिस सेंटर्स आणि कार वॉशिंग सेंटर्सना प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक केले जात आहे. सर्व विहिरींचे पुनरुज्जीवन करून ते पाणी स्वच्छता गृह, गार्डनिंग व धुण्याच्या कामासाठी वापरले जाणार आहे.
शहरातील उद्यानांना १०० टक्के एसटीपी प्रक्रिया केलेले पाणीच पुरवले जाणार आहे. वाशी आणि नेरूळ येथील उद्यानांचे राहिलेले प्रकल्पही पुढील दोन महिन्यांत पूर्ण केले जाणार आहेत. जुने १०७ जलकुंभ बदलून ३३ नवीन जलकुंभांची बांधकामे विविध टप्प्यांत सुरू आहेत.
पाणी वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी स्कॉडा प्रणालीमीळे बेलापूर येथे सुरू असलेल्या २४/७ पाणीपुरवठा योजनेमुळे १५ ते २० टक्के पाण्याची बचत अपेक्षित आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: नाही. वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत पाणीकपात केली जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.
Ans: नवी मुंबई शहरात दरमहा सुमारे १४.४० दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होतो.
Ans: अनधिकृत नळजोडण्या शोधणे, त्या खंडित करणे आणि पाणीगळती रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.






