Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : अतिक्रमण झालेल्या झोपड्यांना भीषण आग; निष्काळजीपणामुळे महानगरपालिकेवर टीकेची झोड

भाईंदर पूर्वेकडील भाजप कार्यालयाच्या पाठीमागील रामदेव पार्क परिसरात मोकळ्या जागेवर उभारलेल्या अनधिकृत झोपड्यांना शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 04, 2026 | 03:38 PM
mira bhayander fire

mira bhayander fire

Follow Us
Follow Us:
  • अतिक्रमण झालेल्या झोपड्यांना भीषण आग
  • निष्काळजीपणामुळे महानगरपालिकेवर टीकेची झोड
मीरा-भाईंदर/ विजय काते : महानगरपालिका हद्दीतील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाईंदर पूर्वेकडील भाजप कार्यालयाच्या पाठीमागील रामदेव पार्क परिसरात मोकळ्या जागेवर उभारलेल्या अनधिकृत झोपड्यांना शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मीरा-भाईंदर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी स्थानिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आग विझविण्याचे काम काही तास सुरू होते. सुदैवाने जीवितहानी टळल्याची माहिती समोर येत असली, तरी काहींना किरकोळ दुखापती झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत परिसर बंदोबस्तात ठेवला.

वारंवार लागणाऱ्या आगींमुळे चिंता वाढली
गेल्या काही महिन्यांपासून मीरा-भाईंदर शहरात अतिक्रमण करून उभारलेल्या झोपड्या, तात्पुरत्या शेड्स व अनधिकृत बांधकामांमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. प्रत्येक घटनेनंतर महापालिका प्रशासनाकडून तात्पुरती कारवाई केली जाते; मात्र काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण उभे राहत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mira Bhayander : घराच्या समोरचं भरधाव वाहनाने तरुणाला चिरडलं; अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरार

पूर्वीच दिलेल्या लेखी तक्रारींकडे दुर्लक्ष
रामदेव पार्क परिसरातील परिस्थितीबाबत मेडतिया रविराज ‘ए’ को-ऑप. हाऊसिंग सोसायटी (भाईंदर पूर्व) यांनी दिनांक 9 मार्च 2026  रोजी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत गंभीर तक्रारी केल्या होत्या. या निवेदनात अतिक्रमण करून राहणाऱ्या काही लोकांकडून परिसरात असामाजिक कृत्ये सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते.

सोसायटीच्या निवेदनानुसार, झोपडपट्टीत राहणाऱ्या काही व्यक्तींकडून दारू पिणे, भांडणे, शिवीगाळ असे प्रकार नियमित सुरू होते.दिनांक 4 मार्च 2026  रोजी एका तरुणावर 8 ते 10  जणांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची नोंद नवघर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.अरुंद रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केल्याने नागरिकांना, विशेषतः महिला व ज्येष्ठांना ये-जा करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आपत्कालीन परिस्थितीत मोठा धोका संभवतो, असा स्पष्ट इशारा देत अतिक्रमण हटवून संबंधितांचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीनंतरही महापालिकेकडून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

नागरिकांचा संताप; निष्काळजीपणाचा आरोप
आज घडलेली आग ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. “घटना घडल्यावरच प्रशासन जागे होते. दोन दिवस कारवाई करून पुन्हा सर्व काही पूर्ववत होते,” असा संतप्त सूर स्थानिकांनी व्यक्त केला. अतिक्रमण माफियांना रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

अतिक्रमण माफियांचे जाळे सक्रिय?
कारवाईनंतर काही दिवसांतच त्याच ठिकाणी पुन्हा झोपड्या उभ्या राहत असल्याने शहरात अतिक्रमण माफियांचे संघटित जाळे कार्यरत असल्याची चर्चा रंगली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडू शकतात, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.

प्रशासनाकडे नागरिकांच्या ठोस मागण्या

  • या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत.
  • रामदेव पार्क परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवून संबंधितांचे नियोजित पुनर्वसन करावे.
  • अतिक्रमण रोखण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा व कडक देखरेख ठेवावी.
  • अतिक्रमण उभारणाऱ्यांवर व त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा.
Bhayander News : कोस्टल रोड बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना; गॅन्ट्री क्रेनचा प्लॅटफॉर्म कोसळल्याने कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट 

यादरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्टसर्किट, गॅस गळती किंवा अन्य कारणांचा तपास सुरू आहे. अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा याबाबत अधिक चौकशी करत आहेत. या घटनेमुळे मीरा-भाईंदरमधील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, आता तरी महापालिका प्रशासन ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mira bhayander massive fire breaks out in encroached slums municipal corporation criticized for negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
1

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.