Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार सुनील शेळकेंचा प्रशासनाला इशारा; काम वेळेत सुरू झाले नाही तर…

लोणावळा शहरातील प्रमुख प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय होऊनही नगरपरिषद प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईवर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 22, 2025 | 12:19 PM
आमदार सुनील शेळकेंचा प्रशासनाला इशारा; काम वेळेत सुरू झाले नाही तर...

आमदार सुनील शेळकेंचा प्रशासनाला इशारा; काम वेळेत सुरू झाले नाही तर...

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : लोणावळा शहरातील प्रमुख प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय होऊनही नगरपरिषद प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईवर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाचे काम १० मार्चपर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, जर काम वेळेत सुरू झाले नाही, तर लोणावळा नगरपरिषदेला टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी दिला.

खंडाळा येथील नगरपरिषद शाळेच्या विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जागेच्या उर्वरित पैशांची तात्काळ पूर्तता करून जागा ताब्यात घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. कोणतेही राजकारण अथवा विलंब खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी त्यांनी प्रशासनाला दिला. लोणावळा शहराच्या पर्यटनवाढीसाठी वळवण तलावाच्या विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पासाठी ८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यातील ५९ टक्के खर्च नगरपरिषद करेल, तर उर्वरित निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून दिला जाईल, असे शेळके यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उर्वरित कामासाठी २ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी लवकरच मंजूर केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शेळके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम दर्जेदार सुरू आहेत. शहरातील इतर विकास कामेही अशाच पद्धतीने व्हावीत, असे निर्देश त्यांनी दिले. शहर सौंदर्यीकरण व अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे आदेश त्यांनी दिले. शहराच्या सौंदर्याचा विचार करून १० वर्षांपेक्षा जुन्या टपऱ्यांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना हटवू नये, परंतु नव्याने बसवलेल्या अनधिकृत टपऱ्या १५ दिवसांत हटवाव्यात, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. लोणावळा जनसंवाद दौऱ्यात नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, भाजपा, मनसेसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलीस डोळे बंद करून बसलेत का? ‘त्या’ प्रकरणावरुन मुरलीधर मोहोळ संतापले

बैठकीतीम महत्वाच्या मुद्द्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश

खंडाळा येथील रहिवाशांना घरकुल, रस्ते आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, महात्मा फुले भाजी मंडईचा विकास करणे, रामनगर येथील गायरान जागा घरकुल योजनेसाठी वापरणे, शहरात CCTV बसवणे, अनुकंपा तत्वावरील वारसांना नोकरी देणे, इंदिरानगर पोलिस क्वार्टरजवळ रस्ता बांधणी करणे, खंडाळा येथील जिम साहित्य बसवणे, नवीन अंगणवाडी इमारती बांधणे, शहरातील स्वच्छता आणि अनधिकृत पाणीपुरवठा कनेक्शन हटवणे आदी सर्व मुद्द्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

Web Title: Mla sunil shelke has warned the administration about pending works nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.