कुडाळ : कुडाळ तालुक्यातील डिगस येथे रस्ते भूमिपूजनासाठी आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखले. यावेळी भाजप कार्यकर्ते तसेच आमदार वैभव नाईक यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली.
मठ – कुडाळ-घोडगे या मार्गाचे संपूर्ण काम हे महायुती सरकारच्या प्रयत्नातून होत असताना मात्र उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी याचे भूमिपूजन करण्याचा घाट घातला. यावेळी येथे उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांना भूमिपूजन करण्यापासून रोखले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यापुढे आमदार वैभव नाईक हे महायुतीच्या प्रयत्नातून झालेल्या कामांचे जाऊन भूमिपूजन करून श्रेय घेत असतील तर त्यांना संपूर्ण जिल्ह्यात विरोध होईल, असा इशारा भाजप ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी दिला आहे.