Mns Aggressive As Electricity Distribution Officer Not Present In Solapur Mangalwedha
मनसेच्या वीज वितरण अधिकार्यांना दिली तंबी; आंदोलनाचा इशारा देताच दिली वितरणाची हमी
मंगळवेढामध्ये वादळी वार्याने रात्री 8 वाजता वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहरवासीयांचे उकाड्यामुळे प्रचंड हाल झाले. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
सोलापूर मंगळवेढामध्ये वीज वितरण अधिकारी उपस्थित नसल्याने मनसे आक्रमक (फोटो - टीम नवराष्ट्र)
Follow Us:
Follow Us:
मंगळवेढा : मंगळवेढा वीज वितरण कंपनीला मनसेने गेट बंद आंदोलनाचा इशारा देताच वीज वितरण अधिकारी नमले असून त्यांनी भविष्यात यापुढे वीज न गायब होण्याची लेखी हमी दिल्याने मनसेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांनी सोमवारी पुकारलेले गेट बंद आंदोलन तुर्त माघारी घेतले आहे.
शनिवार दि.26 एप्रिल रोजी मंगळवेढयात भयानक वादळ सुटल्याने रात्री 8 वाजता संपूर्ण शहरातील गेलेली वीज गेली. तब्बल 18 तासांनी सायंकाळी 4.15 वाजता संपूर्ण शहर सुरळीत झाले. अशी वस्तुस्थिती असताना वीज वितरणचे अधिकारी दुसर्या दिवशी सकाळी 7.12 मिनिटांनी शहराला वीज पुरवठा सुरु झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वीज गायब कालावधीत शहरवासीयांचे पुरे हाल झाले हे जीवनातही ते विसरु शकणार नाहीत अशी स्थिती होती. रात्रभर रुग्ण,लहान बालके,वृध्द यांनी अक्षरश: रात्र जागून काढली. वीजे अभावी सकाळी काही लोकांनी पाण्याअभावी अंघोळी करु शकले नाहीत अशी वस्तुस्थिती असलेबाबत नागरिकांनी प्रसार माध्यमाजवळ नाराजी व्यक्त केली होती.
या घटनेबाबत मनसेचे नारायाण गोवे यांनी प्रत्यक्ष वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर त्यांना उपस्थित कोणतेही अधिकारी असल्याचे निदर्शनास आले नव्हते. या सर्व घटनामुळे मनसेने सोमवार दि.5 रोजी वीज वितरण कार्यालयाचे गेट बंद आंदोलन करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. येथील उपकार्यकारी अभियंता व मनसेचे नारायण गोवे व अन्य कार्यकर्ते आंदोलनाबाबत चर्चा झाली. वीज वितरणच्या अधिकार्यांनी आंदोलकांचे मन परिवर्तन केले. या चर्चेत नैसर्गिक आपत्तीमुळे उच्चदाब व लघुदाब वाहिनी यावर पडझड झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत होता. दि.27 रोजी 11 के.व्ही. मंगळवेढा वाहिनी सकाळी 7.12 मिनीटांनी चालू झाली. त्यानंतर काही भागातील नादुरुस्त कामे पुर्ण करुन सायंकाळी 6 वाजता संपूर्ण शहराचा विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यात आला. ही सर्व कामे जनमित्र व अधिकारी यांच्या मदतीने करण्यात आली. अपात्कालीन कालावधीत अधिकारी व कर्मचार्यांचे मोबाईल बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
तसेच तेथील ऑपरेटरला व्यवस्थित बोलण्याच्या सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. अधिकारी तसेच जनमित्र यांना यापुढे मुख्यालयात राहणेस सुचना देण्यात आल्या आहेत. पुढील काळात विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची महावितरणने पुर्ण खबरदारी घेतली असून आपणास विनंती करण्यात येते की आपले आंदोलन करण्याच्या निर्णयापासून परावर्त व्हावे अशा आशयाच्या मजकूराचे लेखी पत्र उपकार्यकारी अभियंता मंगळवेढ्याचे महेश शिपूरे यांनी आंदोलनकर्ते मनसेचे नारायण गोवे यांना दिले आहे.
याबाबत मंगळवेढाचे मनसे जिल्हा समन्वयक नारायण गोवे म्हणाले की, “दि.26 एप्रिल रोजी मंगळवेढा शहरात वादळी वार्याने अनेक ठिकाणी झाडे पडली. रात्री 8 वाजता वीज पुरवठा खंडीत होवून दुसर्या दिवशी 4.15 वाजता आला. या दरम्यान शहरवासीयांचे उकाड्यामुळे प्रचंड हाल झाले. नैसर्गिक आपत्ती घटना घडल्यानंतर अधिकार्यांनी येथे उपस्थित राहणे गरजेचे होते. तसे न झाल्यामुळे नागरिकांना सेवा देण्यास विलंब झाला. या प्रकरणी गेट बंद आंदोलनाचा इशारा देताच अधिकार्यांनी भविष्यात वीज जाणार नाही व अधिकारी,कर्मचारी येथे निवासी राहतील अशी लेखी हमी दिल्याने आंदोलन तुर्त स्थगित केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
Web Title: Mns aggressive as electricity distribution officer not present in solapur mangalwedha