राज ठाकरे मीरा-भाईंदरला जाणार (फोटो- ani)
मुंबई: सध्या राज्यात मराठी भाषेचा वाद सुरु आहे. ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू तब्बल २० वर्षांनी मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्रित आले होते. राज्य सरकारने हिंदी भाषेचा जीआर मागे घेतला. त्यानंतर मीरा भाईंदर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यास नकार दिल्याने अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर त्या भागातील अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर मनसेने देखील मोर्चा काढला होता. आता मनसेने काढलेला मोर्चा यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.
मीरा-भाईंदरमध्ये मनसेने मोर्चा काढला. त्याला यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आता राज ठाकरे स्वतः मीरा भाईंदर येथे जाणार असल्याचे समजते ते. माणसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मीरा भाईंदरमध्ये जाऊन मराठी बांधवांशी संवाद साधणार आहेतमी असे समजते आहे. राज ठाकरे त्या ठिकाणी सभा देखील घेणार असल्याचे समजते आहे. राज ठाकरे तिथे गेल्यास सभेत ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना दम देत स्पष्ट आदेश
मीरा भाईंदर रस्त्यावर मागील दोन ते तीन तासांपासून जोरदार राडा सुरु होता. मीरा भाईंदरमधील व्यावसायिकांनी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध हिंदी असा वाद चिघळला आहे. मोर्चाला परवानगी न मिळाल्याने मनसे आक्रमक झाली होती. पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांबरोबर धक्काबुक्की देखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट करत आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत.
एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 8, 2025
माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.
सध्या राज्यात मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. निशिकांत दुबे, संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानांमुळे हा वाद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठी भाषेसाठी मनसे आक्रमक झाली आहे. दरम्यान आपल्या पक्षकडून चुकीची विधाने किंवा आपल्या पक्षांची चुकीची भूमिका जाऊ नये म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्याना हा स्पष्ट आदेश दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.