मुंबई : शिवसेना कोणाची (Whose Shivsena) हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेवरुन चाललेल्या वादात आता मनसेनेही (MNS) उडी घेतली आहे. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी तसे ट्वीट केले आहे.
आपल्या ट्वीटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात, ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!’ यासोबत संदीप देशपांडेंनी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक फोटोही शेअर केला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय वादात (Political Controversy) या फोटोमुळे चर्चा रंगली आहे.
अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा pic.twitter.com/2QxhYD8OeR — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 25, 2022
ट्वीटनंतर देशपांडे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यांचे जो पुढे घेऊन जाईल, त्यालाच जनता आता मान्य करेल. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहेत. राज्यातील जनतेची ही भावना आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार हे कोणाचीही प्रॉपर्टी नाही. व्यक्तीवर मालकी हक्क असू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फक्त प्रकाश आंबेडकर यांचाच हक्क आहे का?’ असे ते म्हणाले.