(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी अगदी ओळखीचे आहे. “स्वराज्यरक्षक संभाजी” या ऐतिहासिक मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील तिच्या कामगिरीमुळे तिने अनेक चाहते मिळवले आहेत.
अलीकडेच, प्राजक्ताचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला, ज्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढवली आहे. आता तिच्या लग्नाच्या बातम्या जोरात पसरत आहेत.
प्राजक्ताने नुकताच सोशल मीडियावर तिच्या लग्नपत्रिकेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यातून तिच्या लग्नाची तारीखही जाहीर झाली आहे. या लग्नामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्साह दोन्ही पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करून तिने त्या पोस्टला लग्न पत्रिका पूजन असं कॅप्शन देखील दिले आहे.
प्राजक्ता आणि तिच्या लग्नाचा संपूर्ण सोहळा कधी आणि कुठे होणार आहे, याबाबत अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ने सोशल मीडियावर ‘कुंकवाचा कार्यक्रम’, ‘पाहुणे मंडळी’ अशा पोस्टद्वारे चाहत्यांना लग्नाची हिंट दिली होती. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी प्राजक्ताचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र, त्या वेळी तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता.
Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण
साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करत प्राजक्ताने चाहत्यांना सुखद धक्का दिला, ज्यामुळे लग्नाचा उत्साह आणि वाढला. या सोहळ्यापासून तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाच्या तारखेची उत्कंठा वाढली होती. अखेर, तिने सोशल मीडियावर आपल्या लग्नपत्रिकेचा फोटो शेअर करून लग्नाची तारीख जाहीर केली आहे.
कपूर फॅमिलीतील आणखी एका मेंबरचं लग्न… पहा लग्नाच्या जोड्यातील ‘तिचे’ सुंदर फोटो
प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, लग्नपत्रिकेसोबत अक्षता, हळद-कुंकू आणि मोराची पिसे तसेच गुलाबाच्या पाकळ्यांनी केलेली खास सजावट दिसतेय. पत्रिका अत्यंत साधी पण तितकीच सुरेख रीत्या डिझाइन केलेली आहे,
तसेच, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांचा लग्नसोहळा २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:२४ वाजता संपन्न होणार आहे, असे पत्रिकेत नमूद आहे.प्राजक्ताच्या या लग्नपत्रिकेला सोशल मीडियावर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांकडूनही प्रचंड प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.