Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसे महायुतीत सामील होणार? ‘हा’ बडा नेता फडणवीसांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील देखील सांगर बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 14, 2024 | 03:49 PM
मनसे महायुतीत सामील होणार? 'हा' बडा नेता फडणवीसांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?

मनसे महायुतीत सामील होणार? 'हा' बडा नेता फडणवीसांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?

Follow Us
Follow Us:

मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळपासून अनेक नेते गेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील देखील सांगर बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून सुरु होतंय. त्याआधी म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा दिवस आहे. 15 डिसेंबरला नागपूरच्या राजभवनात संध्याकाळी 4 वाजता मंत्री मंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. दरम्यान, या मंत्र्यांच्या शपथविधीआधीच इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुकांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जात भेट घेतली आहे. तर शुक्रवारी रात्री उशिरा 1.30 वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतली.

हे सुद्धा वाचा : पराभवानंतर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर; ‘या’ तारखेला बोलावली नागपूरमध्ये बैठक

मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील देखील सांगर बंगल्यावर दाखल झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर सातारा येथील शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूरचे आमदार राहुल आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकाश सोळंके, भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिंदे गटाचे संजय शिरसाठ, माजी मंत्री संजय राठोड, आमदार कुमार आयलानी, मनसे नेते राजू पाटील, आमदार संतोष दानवे, आमदार नमिता मुंदडा यांनी धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात महायुतीला यश

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल पाहिले तर महायुतीला मोठं यश मिळाले आहे. महाराष्ट्र निकालाचा अंतिम आकडा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रात 288 पैकी 132 जागांवर भाजपला यश आलं आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. शिंदे गटाला 57 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश मिळालं आहे. यावरुन आता काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 2 आणि अपक्षांना 10 ठिकाणी यश आलेलं आहे. पण मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांना खातंदेखील उघडता आलेलं नाही.

Web Title: Mns leader raju patil has gone to meet devendra fadnavis at sagar bungalow nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 03:49 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • raj thackeray
  • raju patil

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.