Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता मनसेच्या निशाण्यावर ठाकरे गट; भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर थेट ‘ईडी’लाच पत्र, जाणून घ्या काय आहेत आरोप

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला पत्र लिहून युवासेनेच्या अधिकाऱ्यांवर कोरोनाच्या काळात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 31, 2023 | 08:30 PM
आता मनसेच्या निशाण्यावर ठाकरे गट; भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर थेट ‘ईडी’लाच पत्र, जाणून घ्या काय आहेत आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप (Allegations of Corruption) केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला पत्र लिहून युवासेनेच्या अधिकाऱ्यांवर कोरोनाच्या काळात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीला लिहिलेल्या पत्रात देशपांडे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात महापालिकेतील सत्ताधारी युवा सेनेच्या अधिकाऱ्यांकडून मध्यम ते मोठा घोटाळा करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात झालेल्या खर्चाची कॅगकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, कोरोनाच्या काळात देण्यात आलेल्या कंत्राटांची चौकशी करता येणार नसल्याचे महापालिकेने कॅगला दिलेल्या पत्रात म्हटले होते. या घोटाळ्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही देशपांडे यांनी केला आहे.

विविध प्रकारचे आरोप

मालाड आणि भायखळा येथील रिचर्डसन कुडास कॅम्पसमध्ये कोरोना सेंटर बांधण्यात आल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. या केंद्रांमध्ये विविध कंपन्यांना अन्नधान्य, कपडे धुण्यासाठी, सॅनिटायझर पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. युवासेना पदाधिकारी वैभव थोरात यांच्याशी संबंधित ठक्कर अँड पवार कंपनी, शिवनेरी एंटरप्रायझेस, शिवचिदंबरम फार्मा, रमेश अँड असोसिएट्स, अर्का कंपनी, देवराया एंटरप्रायझेस, जयभवानी एंटरप्रायझेस आणि ग्रीन स्पेस रियल्टी या कंपन्यांनी पुरवठ्यात अनियमितता केली आहे. या कंपन्यांनी पुरवठ्यापेक्षा जास्त बिल दिले, असे मनसे देशपांडे यांनी सांगितले.

तत्कालीन सहाय्यक आयुक्तांच्या सहभागाची शक्यता

तसेच 30 ते 40 टक्के मालाचा पुरवठा झाला असून, संपूर्ण बिल वसूल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घोटाळ्यात तत्कालीन सहाय्यक आयुक्त आणि लेखाधिकारी यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Mns may target thackeray group directly gives letter to ed after allegations of corruption nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2023 | 08:30 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Bribe Case
  • Mumbai
  • political news
  • sandip deshpande
  • shivsena

संबंधित बातम्या

Shinde Raut Meet : खासदार संजय राऊत अन् DCM एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
1

Shinde Raut Meet : खासदार संजय राऊत अन् DCM एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

प्रभाग क्रमांक ९ मधील पदयात्रेला म्हाळुंगेवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
2

प्रभाग क्रमांक ९ मधील पदयात्रेला म्हाळुंगेवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाचा राहणार वरचश्मा? भाजपा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुसंडी मारायचे प्लॅनिंग
3

दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाचा राहणार वरचश्मा? भाजपा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुसंडी मारायचे प्लॅनिंग

‘…म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून काढावा लागला दुसरा पक्ष’; शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान
4

‘…म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून काढावा लागला दुसरा पक्ष’; शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.