Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mukhyamantri Sahayata Nidhi : गरिब आणि गरजू रूग्णांना मिळणार महागडे वैद्यकीय उपचार; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे महत्त्वाचे पाऊल

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा लाभ देता यावा यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून त्रिपक्षीय करार लवकरच करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 22, 2025 | 12:40 PM
गरिब आणि गरजू रूग्णांना मिळणार महागडे वैद्यकीय उपचार; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे महत्त्वाचे पाऊल

गरिब आणि गरजू रूग्णांना मिळणार महागडे वैद्यकीय उपचार; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे महत्त्वाचे पाऊल

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून क्राउड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरिब आणि गरजू रूग्णांना उपचार देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ‘त्रिपक्षीय सामंजस्य करार आणि क्राउड फंडिंग’ या दोन आर्थिक मदतीच्या संकल्पनांवर आधारित ही मदत देण्यात येणार आहे. त्यात कॉर्पोरेट कंपन्या, दाते आणि रुग्णालये यांचे सहकार्य रूग्णांना मिळणार असून, त्यातून हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या मनोमिलनावर मंत्री शिवेंद्रराजेंचं मोठं विधान; म्हणाले, ‘याबाबतचा निर्णय…’

त्रिपक्षीय सामंजस्य करार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा लाभ देता यावा यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून त्रिपक्षीय करार लवकरच करण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, कार्पोरेट कंपनी, रूग्णालय आणि त्यासोबत काही प्रमाणात रूग्णांचेही योगदान अपेक्षित आहेत.

या माध्यमातून मिळणार मदत

राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रूग्णांसाठी क्राउड फंडिंग सुरू करण्यात येत आहे. ज्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च १० लाखांपेक्षा अधिक असेल, असे दुर्धर व गंभीर आजाराचे रूग्ण क्राउड फंडिंगसाठी पात्र ठरणार आहेत. या अशा रूग्णांना कक्षा तर्फे बनविण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टल मार्फत अर्ज सादर करावा लागणार आहे. तीन महिन्याच्या कालावधीत हे पोर्टल कार्यरत होणार आहे. ज्यावेळी रूग्णांच्या उपचाराचा खर्च कोट्यावधीमध्ये असतो, त्यावेळी सर्व योजनांचा फायदा घेवूनही निधीची कमतरता भासते, त्यावेळी क्राउड फंडिंग महत्त्वाचे ठरणार आहे. रूग्णांच्या पात्रतेची तपासणी आणि पारदर्शक प्रक्रियेसाठी नियामक यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे. ही सुविधा ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू रुग्णांसाठी वरदान ठरेल.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कॉर्पोरेट कंपन्या, दाते, ‘एनजीओ’ आणि रुग्णालय मिळून रुग्णांच्या उपचाराकरिता मदत करणार आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत क्राउड फंडिंग सुरू केले जाणार आहे. रूग्णांनी फक्त आमच्याकडे अर्ज करावा, उर्वरित जबाबदारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून पार पाडण्यात येणार आहे. रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारातून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात आहे. असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

आता परदेशातून निधी स्वीकारता येणार

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला परदेशातून निधी स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेली एफसीआरए (फॉरेन काँट्रीब्युशन रेग्यूलेशन अँक्ट) मान्यता नुकतीच प्राप्त झाली आहे. यामुळे परदेशातील दानशूर व्यक्ती, संस्था, सीएसआर कंपन्यांकडून थेट आर्थिक मदत स्वीकारता येणार आहे. उल्लेखनिय बाब अशी की, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महाराष्ट्र हे एफसीआरए प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. या परदेशी निधीचा वापर गरजू रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात येणार आहे.

धर्मादाय रुग्णालयांची भूमिका

या योजनेमध्ये धर्मादाय रुग्णालयांचा सहभाग महत्वाचा आहे. शासनाकडून मिळणाऱ्या करसवलतींच्या बदल्यात, या रुग्णालयांना त्यांच्या एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा वार्षिक उत्पन्न १.८० लाखांपर्यंत असलेल्या कुटुंबांसाठी मोफत राखीव ठेवाव्या लागतात. तर, १० टक्के खाटा ३.६० लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सवलतीच्या दरात उपचाराकरिता राखीव ठेवाव्या लागतात. या व्यवस्थेमुळे गरीब रुग्णांना मोठ्या रुग्णालयांतून उपचार मिळतात. अर्ज प्रक्रिया किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या माहिती व मार्गदर्शनाकरिता टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क करू शकता.

सहा महिन्याच्या काळातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत

१ जानेवारी ते ३० जून २०२५ पर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून १४ हजार ६५१ रूग्णांना १२८ कोटी ६६ लाख ६८ हजार रूपयांची मदत करण्यात आली. तर, धर्मादाय रूग्णालय मदत कक्षातून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान २ लाख ३२ हजार २६५ रूग्णांना १६५ कोटी ४ लाख २४ हजार ८५७ रूपयांची मदत करण्यात आली.

सत्ता यांच्या डोक्यात गेली आहे, पण…; विजय घाडगे मारहाणीवरुन काँग्रेस आक्रमक

Web Title: More funds will be available for medical treatment of poor and needy from cms relief fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, 15 शस्त्र परवाने रद्द; तब्बल 68 जणांचे अर्ज फेटाळले
1

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, 15 शस्त्र परवाने रद्द; तब्बल 68 जणांचे अर्ज फेटाळले

नवीन अभ्यासक्रमासाठी ‘सेतू’ची अमलबजावणी; राष्ट्रीय धोरणानुसार होणार टप्प्याटप्प्याने सुरुवात
2

नवीन अभ्यासक्रमासाठी ‘सेतू’ची अमलबजावणी; राष्ट्रीय धोरणानुसार होणार टप्प्याटप्प्याने सुरुवात

Sanjay Raut News: मोदींसारखा क्रूर आणि अघोरी नेता देशात होऊच शकत नाही; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला
3

Sanjay Raut News: मोदींसारखा क्रूर आणि अघोरी नेता देशात होऊच शकत नाही; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला

‘रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, त्यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे…’; गोपीचंद पडळकर यांची टीका
4

‘रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, त्यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे…’; गोपीचंद पडळकर यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.