Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोती चौकातील दुभाजक वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला

सातारा शहरातील मध्यवर्ती मोती चौकातील दुभाजक वाहनाच्या धडकेने तुटला असून वर्षभरापासून त्याची दुरुस्ती झालेली नाही. यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन अपघाताचा धोका वाढला आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 09, 2026 | 10:02 PM
मोती चौकातील दुभाजक वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला
Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा शहराच्या मध्यवर्ती भागातील राजपथावरील मोती चौक येथील दुभाजकाची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली असून, संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनाच्या धडकेने दुभाजकाचा काही भाग तुटला असून, अद्याप त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.

मोती चौक हा शहरातील वर्दळीचा परिसर असल्याने दिवसभर या मार्गावर वाहनांची मोठी ये-जा असते. त्यामुळे तुटलेला दुभाजक वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. त्यातच परिसरात होणारी वाहतूक कोंडी, फेरीवाले आणि व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे.

तुटलेल्या दुभाजकामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर

देवी चौकाकडून राधिका चौकाच्या दिशेने जाणारी वाहने आणि जवाहरलाल बागेकडून येणाऱ्या वाहनांची या परिसरात मोठी वर्दळ असते. तुटलेल्या दुभाजकामुळे काही वाहनचालक त्याचा वापर अनधिकृत मार्गाप्रमाणे करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांची धडक होण्याच्या घटना घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

मल्हारपेठच्या विकासकामांची घोडदौड; पालकमंत्र्यांच्या पाठबळातून सरपंचांच्या कार्याचा जलवा,रस्त्यांसह मूलभूत सुविधांना प्राधान्य

सुरक्षित वाहतुकीसाठी प्रायोजक तत्त्वावर उभारण्यात आलेल्या दुभाजकामुळे यापूर्वी वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत झाली होती. मात्र, दुभाजक तुटल्यानंतर त्याचा उद्देशच बाधित झाला आहे.

‘दुभाजकांची स्थिती सुधारण्याची गरज’

सातारा शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजक सुस्थितीत असणे आवश्यक आहे. दुभाजकामुळे वाहनांची दिशा नियंत्रित होण्यासोबतच वाहतूक व्यवस्थेलाही शिस्त लागते. त्यामुळे त्यांची देखभाल आणि वेळेवर दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

“सातारकरांच्या मूलभूत प्रश्नांपैकी सुरक्षित वाहतूक हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शहरातील दुभाजक उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. मोती चौकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी दुभाजकाची अशी अवस्था असणे निश्चितच भूषणावह नाही. तुटलेल्या दुभाजकाची तातडीने दुरुस्ती करून ‘सुंदर सातारा, विकासात्मक सातारा’ हे ब्रीदवाक्य कृतीत आणावे,” अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे; बिनविरोध निवड, सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार

चौकातील बंद सिग्नलकडेही लक्ष देण्याची मागणी

मोती चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या असतानाच शहरातील विविध चौकांमधील सिग्नल यंत्रणाही बंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.

सातारा नगरपालिकेला मोठी ऐतिहासिक परंपरा असून, नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मोती चौकातील तुटलेल्या दुभाजकाची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करण्यासोबतच बंद सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Web Title: Moti chowk satara divider repair accident risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Mudhaidevi Navratri Ashtami: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देऊरची मुधाई देवी!; अष्टमीच्या मुख्य दिनी राज्यभरातून भाविकांची गर्दी
1

Mudhaidevi Navratri Ashtami: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देऊरची मुधाई देवी!; अष्टमीच्या मुख्य दिनी राज्यभरातून भाविकांची गर्दी

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
2

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
3

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध
4

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.