Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“चंद्रहार पाटील पैलवान असले तरी कच्चे मडके…; खासदार संजय राऊतांचा जोरदार घणाघात

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करणाऱ्या चंद्रहार पाटलांवर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 10, 2025 | 03:44 PM
mp sanjay raut target devendra fadnvais and nitesh rane on aaditya thackeray clean chit

mp sanjay raut target devendra fadnvais and nitesh rane on aaditya thackeray clean chit

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मागील वाद विसरुन एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. चंद्रहार पाटील यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार राऊत म्हणाले की, चंद्रहार पाटील पहलवान असले तरी ते कच्चे मडके आहेत, त्यांना काय कमी केलं? आम्ही त्याच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मला वाईट वाटलं कीं त्याच्यासाठी आम्ही एवढं केलं प्रतिष्ठेची निवडणूक केली  आता हे सगळं आर्थिक नावासाठी सुरू आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा  

त्याचबरोबर राज-उद्धव हे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर खासदार राऊत यांनी सूचक विधान केले आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी आम्ही स्पष्ट भूमिका घेतली ती भूमिका अशी आहे कोणाला काही वाटते कोणी काही म्हणू दे शिवसेना महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या कल्याणासाठी ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे या मुंबईवर फक्त मराठी माणसाचा हक्क राहावा यासाठी आपल्याला जे जे करता येईल ते शक्य आहे ते करायला लढायला आणि एक पाऊल पुढे किंवा मागे जायला आम्ही तयार आहोत,” असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा देखील समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी कधी बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले मला माहिती नाही. ते कोणत्या काळात बाळासाहेबांबरोबर होते पहावं लागेल. त्यांनी बाळासाहेबांबरोबर नक्की कधी काम केलं? स्वतः विषयी काही भ्रम निर्माण करत आहेत, तो एक भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत, काय विचार तुम्ही मोदी, शहा, फडणवीस यांचे बूट चाटणं करता. जे महाराष्ट्राच्या मुळावर आले आहेत हा बाळासाहेबांचा विचार आहे का? महाराष्ट्र मुंबई संकटात असताना लुटली जात असताना मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्हीही जे बूट चाटेगिरी करत आहात महाराष्ट्रद्रोही… यांची हा बाळासाहेब यांचा विचार आहे असा जर या लोकांना वाटत असेल तर धन्य आहे,” असे परखड मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mp sanjay raut target chandrahar patil for joining shinde group political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • chandrahar patil
  • Eknath Shinde
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
2

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
3

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.