Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Mahamarg : प्रसंगी रक्त सांडू, पण…; शक्तीपीठ महामार्गाबाबत खासदार विशाल पाटलांचा इशारा

शक्तिपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे, त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटलांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 01, 2025 | 05:04 PM
शक्तीपीठ महामार्गाबाबत खासदार विशाल पाटलांचा इशारा

शक्तीपीठ महामार्गाबाबत खासदार विशाल पाटलांचा इशारा

Follow Us
Follow Us:

सांगली : शेतकऱ्यांना उध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. तो रद्दच झाला पाहिजे असा इशारा देत मंगळवारी नागपूर रत्नागिरी महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन कारण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्दच झाला पाहिजे त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील आणि स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

या आंदोलनाचे नेतृत्व खासदार विशाल पाटील, स्वाभिमीनीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केले. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. भर पावसात महिलासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

पावसातही शेतकरी तसुभ ही जागचे हलले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्याइतकाच जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रास्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला. रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली येथील जैन वडा चौकात रस्त्यावरचं ठिय्या मारला, यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती.

यावेळी प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश एडके, शुभगिनी शिंदे, लता कांबळे, बाळासाहेब पाटील आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यशवंत हारूगडे, रघुनाथ पाटील, अधिक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबेकाई, सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवठेकर, संतोष आंबी, आदी उपस्थित होते.

कृषी दिनी शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागते ही शोकांतिका

महेश खराडे म्हणाले, कृषी दिना दिवशीच शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागते ही शोकांतिका आहे. वर्धा-गोवा अर्थात शक्तिपीठ महामार्गची कुणाचीही मागणी नाही, ना शेतकऱ्यांची, ना भाविकांची, मग कुणाचीही मागणी नसताना कुणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी का उध्वस्त व्हायचे, शेतकऱ्यांनी का भूमिहीन व्हायचे, शेतकऱ्यांनी का कवडीमोल किमतीने जमिनी द्यायच्या हा खरा सवाल आहे. महामार्गसाठी शासन 20 हजार कोटीचे कर्ज काढणार आहे. त्यामुळे राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग करू नये असा अभिप्राय दिला आहे म्हणजेच अर्थ खात्याचा विरोध, शेतकऱ्यांचा विरोध असतानाही तो डावलून पोलिसी बळाचा वापर करून मोजणी प्रक्रिया सुरु आहे. हा अट्टाहास कशासाठी सुरु आहे.

महेश खराडेंसह सहा जणांना अटक व सुटका

आंदोलना दरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले शांतीनाथ लिंबेकाई आदींना अटक करण्यात आली, नंतर त्यांची सुटका झाली.

आम्ही विकासाच्या विरोधात नाही

खासदार विशाल पाटील म्हणाले, आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र या महामार्गांवर अनेक ठिकाणी अवाढव्य पूल होत आहेत. त्यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. किती भराव टाकला जाणार आहे, त्यामुळे महापूर काळात किती पाणी येईल त्याचा किती शहरे आणि किती गावांना फटका बसणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे. या सर्व बाबींचा विचार सरकारने करण्याची गरज आहे.

हिसका दाखवून पण महामार्ग होवू देणार नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वत:चे स्वप्न पुर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालु देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला शक्तिपीठमुळे सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. ही लढाई जशी रस्त्यावर राहील तशी आमच्या गावात आणि शेतात राहील. त्याचा पहिला हिसका गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवला आहे. पुढेही दाखवु पण महामार्ग होउ देणार नाही. आमची शेती वाचवु. त्यासाठी रक्त सांडायची देखिल तयारी आमची आहे. असेही यावेळी शेतकरी म्हणाले.

Web Title: Mp vishal patil has warned the government regarding the shakti peeth highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • farmer
  • Shaktipeeth Mahamarg
  • Vishal Patil

संबंधित बातम्या

Sangli District Bank Election: आमदार सुरेश खाडेंसह सात अर्ज अवैध, विशाल पाटील-पडळकरांना दिलासा
1

Sangli District Bank Election: आमदार सुरेश खाडेंसह सात अर्ज अवैध, विशाल पाटील-पडळकरांना दिलासा

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
2

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

Amravati News:दुष्काळात वाचविलेले सोयाबीन मजूरटंचाईने अडले! काढणी लांबल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता
3

Amravati News:दुष्काळात वाचविलेले सोयाबीन मजूरटंचाईने अडले! काढणी लांबल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
4

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.