Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

MPSC Protest: ‘ग्रुप बी’ परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी एसआयटीला दिलेले काही पुरावे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 09, 2026 | 09:19 PM
MPSC Students Protest

MPSC Students Protest

Follow Us
Follow Us:
  • ‘एमपीएससी’ आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच
  • विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम 
  • आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू
पुणे/MPSC: पेपरफुटी, वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षा, रखडलेली भरती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक व आर्थिक नुकसान, या मुद्द्यांवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, तसेच रखडलेली ७० हजार पदांची भरती प्रक्रिया मार्गी लावावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

पुण्यातील एस. एम. जोशी पुलाजवळील गरवारे महाविद्यालय परिसरात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून, शास्त्री रस्त्यावरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी दि. ९ ऑक्टोबर रोजी या आंदोलनाचा नववा दिवस असून, विविध मागण्यांसाठी विद्यार्थी ठामपणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्त्या काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे ज्येष्ठ मंडळींनी केलेल्या आवाहनाचा मान राखत सोमनाथ चव्हाण, ऋषिकेश गांगुर्डे आणि गजानन शेळके या विद्यार्थ्यांनी आपले उपोषण स्थगित केले. या सर्वांना दूध पाजून त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली.

Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा

आमचा लढा अद्याप थांबलेला नाही नसून उलट तो आणखी तीव्र झाला आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही, हा आमच्या आंदोलनाचा निर्धार कायम आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरूच राहील असे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले. ऋषिकेश गांगर्डे यांनी गुन्हा दाखल झाला यावरती सांगितले की, १ ऑक्टोबर रोजी इंदूलाल कॉम्प्लेक्स येथे झालेल्या आंदोलनावेळी ते पुणे शहरात किंवा जिल्ह्यातही उपस्थित नव्हते. त्यामुळे आंदोलनाशी संबंधित गुन्ह्यात त्यांचे नाव कसे आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘ग्रुप बी’ परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी एसआयटीला दिलेले काही पुरावे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचे आपण मूळ तक्रारदार असून, पुराव्यांमुळेच प्रकरण समोर आले. मात्र, मूळ आरोपींवर कारवाई करण्याऐवजी आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे ते म्हणाले. अशा दबावाला विद्यार्थी घाबरणार नसून, अन्यायाविरोधात एकजुटीने लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

Web Title: Mpsc students protest continue for 9 days rohit pawar bhimanwar resign tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Paper Leak
  • pune news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा
1

Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
2

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
3

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण;  ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
4

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.