शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून 4.98 लाखांची फसवणूक; 'ती' लिंक पाठवली अन्... (संग्रहित फोटो)
याबाबत समीर कमरुद्दीन तांबोळी (वय ५८, लोहियानगर, गंज पेठ, खडक) यांनी तक्रार दिली आहे. २४ जून २०२५ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी व्हॉट्सअॅपवरून संपर्क करून शेअर ट्रेडिंगसाठी खाते तयार करण्यास सांगितले. लिंकवरून खाते उघडल्यानंतर फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाली. खडक पोलिस तपास करत आहेत. तसेच शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून ज्येष्ठ नागरिकाची ८ लाख ५७ हजार २७३ रुपयांची फसवणूक करण्यात आली. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेऊन पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल क्रमांकधारक आणि बँक खातेधारकांविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मारुती आत्माराम सरक (वय ३९, भिमनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. दि. १७ मे २०२५ ते दि. १९ जून २०२६ दरम्यान आरोपींनी संपर्क साधला. ‘जयराम ब्रोकिंग’च्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी केले आणि रक्कम गुंतवण्यास सांगितले. विश्रांतवाडी पोलिस तपास करीत आहेत.
इन्स्टाग्रामवरील बनावट अॅपद्वारे 3.90 लाखांची फसवणूक
इन्स्टाग्रामवरील रील पाहण्यासाठी अॅप डाऊनलोड करण्यास सांगून वाघोळीतील व्यक्तीची ३ लाख ९० हजार ५०८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. अॅपला मोबाईलचा प्रवेश मिळाल्यानंतर बँक खात्यातील रक्कम आणि क्रेडिट कार्डचा गैरवापर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक व अॅपधारकांवर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मजहरखान युसुफखान पठाण (वय ३५, रा. मॅगमन आयरिस सोसायटी, राधास्वामी आश्रमजवळ, केसनंद गाव, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे.
1. शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली किती रुपयांची फसवणूक झाली?
पहिल्या प्रकरणात ४ लाख ९८ हजार १८ रुपये, तर दुसऱ्या प्रकरणात ८ लाख ५७ हजार २७३ रुपयांची फसवणूक झाली.
2. पहिल्या फसवणुकीत आरोपींनी कसा संपर्क साधला?
आरोपींनी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधून शेअर ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी लिंक पाठवली.
3. पहिल्या प्रकरणात कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला?
या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांकधारक आणि बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






