Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Mahamandal : ‘एसटी स्थानके, बसेसची दर चार तासांनी स्वच्छता…’, महामंडळाची राज्यव्यापी स्वच्छता मोहीम सुरू

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते परळ बसस्थानक येथे या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 05, 2026 | 01:05 PM
'एसटी स्थानके, बसेसची दर चार तासांनी स्वच्छता...', महामंडळाची राज्यव्यापी स्वच्छता मोहीम सुरू

'एसटी स्थानके, बसेसची दर चार तासांनी स्वच्छता...', महामंडळाची राज्यव्यापी स्वच्छता मोहीम सुरू

Follow Us
Follow Us:

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे (World Environment Day) औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज (5 जून 2026) मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर व प्रवासी-अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचे सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

परळ बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात स्वच्छता मोहिमेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानके आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्याने नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे यांची दर चार तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Maharashtra Rain Update : केरळात मान्सूनची दमदार एन्ट्री; मुंबई-ठाण्यासाठी पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात कधी धडकणार?

यावेळी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी एसटीच्या सेवांचा लाभ घेतात. त्यामुळे त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेली ही राज्यव्यापी स्वच्छता मोहीम प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, आनंददायी आणि समाधानकारक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”

प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांचे पुनर्वापरासाठी संकलन

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छता मोहिमेदरम्यान आढळणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या व पिशव्या संकलित करून त्यांचे पुनर्वापर (रिसायकलिंग) करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून विविध टिकाऊ व उपयुक्त उत्पादने तयार करण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

सरनाईक पुढे म्हणाले की, स्वच्छता ही एकदिवसीय मोहीम नसून सातत्याने राबविण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे या मोहिमेच्या अंमलबजावणीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत नियमित देखरेख ठेवली जाणार असून स्वच्छतेच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक बसस्थानकावरील स्वच्छता व्यवस्थेचे नियोजनबद्ध निरीक्षण करण्यात येईल तसेच प्रवाशांकडून मिळणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांनाही प्राधान्य दिले जाईल.

विस्तारित चार्जिंग केंद्राचे भूमिपूजन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळाने आपल्या सर्व २५१ आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय नियंत्रक, कर्मचारी प्रतिनिधी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सरनाईक यांनी परळ बसस्थानक परिसर, प्रवासी प्रतीक्षागृह, प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. राज्यभर एकाच वेळी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे एसटी स्थानकांच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा होऊन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा, पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारला पदभार

Web Title: Msrtc statewide cleanliness drive launched on world environment day pratap sarnaik news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • pratap sarnaik
  • st bus
  • World Environment Day

संबंधित बातम्या

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा
1

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश
2

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

ST Bus Smart Card: आधी कार्ड काढा, मग पैसे भरा अन् सवलत मिळवा! STच्या स्मार्ट कार्ड नियमांमुळे ग्रामीण प्रवाशांची खरी कसोटी
3

ST Bus Smart Card: आधी कार्ड काढा, मग पैसे भरा अन् सवलत मिळवा! STच्या स्मार्ट कार्ड नियमांमुळे ग्रामीण प्रवाशांची खरी कसोटी

Pratap Sarnaik: ‘विना वाहक’ बससेवा वाढवणार? एसटीचा आर्थिक डोलारा मजबूत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा नवा मंत्र
4

Pratap Sarnaik: ‘विना वाहक’ बससेवा वाढवणार? एसटीचा आर्थिक डोलारा मजबूत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा नवा मंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.