पुणे : नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पुन्हा (ED) ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसतर्फे आज पुन्हा आंदोलन करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशी होत आहे. पण काल (सोमवारी) एकीकडे राहुल गांधींची ईडी चौकशी सुरु असतानाच देशभरात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
[read_also content=”राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे पोस्टर फाडले, मुंब्य्रात तणाव https://www.navarashtra.com/maharashtra/tensions-in-mumbra-over-tearing-of-mns-leader-raj-thackerays-birthday-poster-nrgm-292530.html”]
नॅशनल हेराल्ड प्रकरणात एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी राहुल गांधी यांच्यासह शेकडो पक्ष कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. नागपुरात काँग्रेस कार्यकर्ते ईडी कार्यालयावर धडकल्याने वातावरण चांगलेच तापले. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.