Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान्सूनसाठी मुंबई मेट्रो प्रशासन सज्ज! सर्व मार्गांवर अतिरिक्त मेट्रो गाड्यांची व्यवस्था; उत्तम सेवा पुरवण्यासाठी व्यापक तयारी

मान्सूनमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांदरम्यानही शहराची गती कायम राखण्यासाठी महा मुंबई मेट्रोने केलेली ही तयारी मुंबईकरांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2026 | 11:30 AM
मान्सूनसाठी मुंबई मेट्रो प्रशासन सज्ज! सर्व मार्गांवर अतिरिक्त मेट्रो गाड्यांची व्यवस्था; उत्तम सेवा पुरवण्यासाठी व्यापक तयारी

मान्सूनसाठी मुंबई मेट्रो प्रशासन सज्ज! सर्व मार्गांवर अतिरिक्त मेट्रो गाड्यांची व्यवस्था; उत्तम सेवा पुरवण्यासाठी व्यापक तयारी

Follow Us
Follow Us:

महा मुंबई मेट्रोने प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देत सर्व मार्गांवर अतिरिक्त राखीव (स्टैंडबाय) मेट्रो गाड्या तैनात केले आहेत. स्थानकांवरील वाढती गर्दी किंवा कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत या गाड्या तात्काळ सेवेत दाखल करण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मान्सूनचा जोर दिवसेंदिवस वाढत असताना शहराची जीवनवाहिनी अखंड सुरू ठेवण्यासाठी महा मुंबई मेट्रोने व्यापक तयारी केली आहे. मुसळधार पाऊस, वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सुरक्षित, अखंड आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी सर्व मेट्रो मार्गांवर विशेष नियोजन केले आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य देशात दुसरे; खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली विधानसभेत कबुली

प्रवास अधिक सुलभ होणार

महा मुंबई मेट्रोने प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देत सर्व मार्गावर अतिरिक्त राखीव (स्टैंडबाय) मेट्रो गाड्या तैनात केले आहेत.स्थानकांवरील वाढती गर्दी किंवा कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत या गाड्या तात्काळ सेवेत दाखल करण्यात येणार आहेत.त्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभहोणार असून सेवा खंडित होण्याचा धोका कमी होणार आहे.

गर्दीच्या वेळेसह दिवसभर अतिरिक्त सेवा

मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केवळ सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेसाठी मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. हवामानातील बदल, प्रवासी संख्येतील अचानक वाढसह इतर कोणत्याही कारणामुळे आवश्यकता निर्माण झाल्यास दिवसभरात कोणत्याही वेळी या स्टैंडबाय सेवा सुरू करता येणार आहे.मान्सूनमध्ये अनेकदा रस्ते वाहतुकीवर परिणाम होतो. पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवांवर होणारा परिणाम लक्षात घेता मेट्रोकडे प्रवाशांचा कल वाढतो. हीच बाब लक्षात घेऊन महा मुंबई मेट्रोने अतिरिक्त नियोजन केले आहे.

मुंबईत पावसाळ्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येतो. अशा परिस्थितीत मेट्रो ही तुलनेने अधिक विश्वासार्ह आणि वेळेवर धावणारी वाहतूक व्यवस्था मानली जाते. त्यामुळे मान्सून काळात प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर सेवा उपलब्ध करून देणे हे महा मुंबई मेट्रोचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मान्सूनमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांदरम्यानही शहराची गती कायम राखण्यासाठी महा मुंबई मेट्रोने केलेली ही तयारी मुंबईकरांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे. अतिरिक्त स्टैंडबाय गाड्या, तांत्रिक सज्जता आणि सतत देखरेख यामुळे आगामी पावसाळी दिवसामध्ये मेट्रो सेवा अधिक सक्षम आणि प्रवासी-केंद्रित राहणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Mumbai Rain Updates: मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग! सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात; ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

मान्सून काळातही प्रवाशांना अखंड, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी महा मुंबई मेट्रो पूर्णपणे सज्ज असून, कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai metro administration geared up for the monsoon arrangements made for additional metro trains across all lines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Metro Station
  • Monsoon Alert
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार
1

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
2

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर
3

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
4

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.