ठाण्यात प्रभागरचना गणेश नाईक- एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका; ठाकरे गटही आक्रमक
Navi Mumbai Politics: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यात सातत्याने खटके उडताना दिसत आहेत. गणेश नाईक यांच्या जनता दरबारमुळे एकनाथ शिंदेंची नाराजी कायम समोर आली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातही मतभेद समोर आले आहेत. या सगळ्यातच आता नव्या प्रभागरचनेवरूनही गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
शुक्रवारी (२२ ऑगस्ट) नवी मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या प्रभाग रचनेवर ठाण्याचा प्रभाव असल्याचा आरोप गणेश नाईक समर्थकांकडून करण्यात आला असून ही प्रभागरचना नियमाप्रमाणे नसल्याचेही नाईक समर्थकांचे म्हणणे आहे. या प्रभागरचनेवरून एका बैठकीत हा डाव आपल्याला माहिती असून मी तो उधळून लावणार , असा इशारा गणेश नाईकांनी दिला आहे. त्यामुळे प्रभागरचनेचा वाद टोकाला जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या, CBI ने दाखल केला फौजदारी खटला, कंपन्यांचे शेअर्स कोसळले
याशिवाय शिवसेना ठाकरे गटाकडूनदेखील या प्रभागरचनेवर आक्षेप घेण्यात आला आहे. एकसंध रहिवासी असलेले भाग तोडून चुकीच्या पद्धतीने प्रभागरचना करण्यात आल्याचा आऱोप ठाकरे गटाने केला आहे. तसेच, सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना याचा कसा फायदा होईल, हेही या वॉर्ड रचनेतून पाहण्यात आले आहे. यात सुधारणा न केल्यास आम्ही आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.
Indian Aroma London : आत नेमकं काय घडलं? लंडनमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावून… ‘हा’
नवी मुंबई महापालिकेत 2015 मध्ये झालेली निवडणूक ही एक प्रभाग –एक नगरसेवक या तत्त्वावर झाली होती. मात्र, नव्या प्रभागरचनेनुसार आता चार सदस्यांचा एक प्रभाग असा बदल करण्यात आला आहे. नव्या रचनेनुसार महापालिकेत 28 प्रभाग असतील आणि त्यांतून एकूण 111 नगरसेवकांची निवड होणार आहे. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात आला असला, तरी नगरसेवकांची संख्या वाढेल असा अंदाज फोल ठरला. 2015 प्रमाणे यंदाही नगरसेवकांची संख्या 111 इतकीच राहणार आहे.