Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaina NC WhatsApp Hacked: शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप हॅक; 3.92 लाखांची फसवणूक

Cyber Fraud: व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याचे लक्षात येताच शायना एन.सी. यांच्या टीमने गुरुवारी दुपारी 1.58 वाजता पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तसेच, ज्या गुगल पे च्या खात्यावर पैसे मागवले जात होते, ते तातडीने ब्लॉक करण्याची विनंतीही करण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 17, 2026 | 10:40 AM
Shaina NC, WhatsApp Hacked, Cyber Fraud, Shiv Sena Leader Shaina NC News,

Shaina NC, WhatsApp Hacked, Cyber Fraud, Shiv Sena Leader Shaina NC News,

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. यांचे अधिकृत व्हॉट्सॲप खाते हॅक
  • हॅकर्सनी शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक करून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना पैशांची मागणी केली
  • सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून, हॅकर्सचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती
Shaina NC WhatsApp Hacked: शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि फॅशन डिझायनर शायना एन.सी. यांचे अधिकृत व्हॉट्सॲप खाते हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हॅकर्सनी शायना एनसी यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांच्याच संपर्कातील काही लोकांना पैशांची मागणी करणारे संदेश पाठवले. या फसवणूक प्रकरणात आठ जाणांकडून तब्बल ३ लाख ९२ हजार रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे.

व्हॉट्सॲप हॅक करून पैशांची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी हॅकर्सनी शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक करून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना “मला तातडीने पैशांच्या मदतीची गरज आहे” अशा आशयाचे संदेश पाठवण्यात आले.

NCP Politics: पटेल-तटकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट वादात; सुनेत्रा पवारांनी विचारला जाब

हॅकरने प्रत्येक व्यक्तीकडे 49 हजार रुपये मागत दोन तासांत रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. या संदेशांवर विश्वास ठेवून आठ जणांनी संबंधित गुगल पे खात्यावर पैसे पाठवले. त्यामुळे अवघ्या काही तासांत 3.92 लाख रुपयांना गंडा घातल्याचे आढळून आले आहे.

पोलिसांवर कारवाईत दिरंगाईचा आरोप

व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याचे लक्षात येताच शायना एन.सी. यांच्या टीमने गुरुवारी दुपारी 1.58 वाजता पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तसेच, ज्या गुगल पे च्या खात्यावर पैसे मागवले जात होते, ते तातडीने ब्लॉक करण्याची विनंतीही करण्यात आली. पण पोलिसांनी वेळेत कारवाई केली नाही, असा आरोपही शायना एन.सी यांनी केला. त्यांच्या मते, तक्रार मिळताच त्वरित पावले उचलली असती, तर पुढील आर्थिक फसवणूक टाळता आली असती.

Haffkine: हाफकीन महामंडळ बनावट स्वाक्षरी प्रकरण, लाचलुचपत चाैकशीतील दाेषमुक्त प्रकरणातील अधिकाऱ्यां

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार

पोलिसांच्या कथित दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करत शायना एन.सी. यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे. “पोलीस केवळ तपास सुरू असल्याचे सांगत आहेत, मात्र अपेक्षित वेगाने कारवाई होत नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सायबर पोलिसांकडून तपास सुरू

दरम्यान, या प्रकरणाचा सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून, हॅकर्सचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच, नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीकडून सोशल मीडियावर किंवा मेसेजद्वारे पैशांची मागणी झाल्यास खातरजमा केल्याशिवाय पैसे पाठवू नयेत, असे आवाहनही करण्यात येत आहे.

 

 

Web Title: Mumbai news shiv sena leader shaina nc whatsapp account hacked cyber fraud lakhs rupees stolen police complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • cyber crime
  • Cyber Fraud

संबंधित बातम्या

Satara Politics: उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार
1

Satara Politics: उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार

Cyber Crime: ऑनलाइन लुटारूंना चाप बसणार! रत्नागिरी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, उदय सामंतांचे निर्देश काय?
2

Cyber Crime: ऑनलाइन लुटारूंना चाप बसणार! रत्नागिरी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, उदय सामंतांचे निर्देश काय?

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
3

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.