मुंबई – मुंबई विद्यापीठातून (Mumbai University) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक (senate election) विद्यापीठाने पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. निवडणुकीचा (Election) कार्यक्रम जाहीर करुन निवडणुका रद्द केल्यामुळं विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त करत, मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर व प्रशासनावर सडकून टीका केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता पुढील महिन्यात १० सप्टेंबरला सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान होणार होते. (Mumbai University senate election adjourned; As defeat appeared…, protest from Thackeray group, MNS, NCP)
सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत या हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 18, 2023
ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादीकडून निषेध…
दरम्यान, ही निवडणूक स्थगिती केल्यामुळं ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला आहे. निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानं ही निवडणूक स्थगित करण्यात आली असल्याचा आरोप युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्टिव करत यांचा निषेध नोंदवला आहे. दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी देखील निषेध नोंदवत इशारा दिला आहे. “मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून अचानक त्याला स्थगिती देण्यात येते,हे आश्चर्यकारक आहे.सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्ती चा जाहीर निषेध…, मुंबई विद्यापीठावर नेमका कोणाचा दबाव आहे ? याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.येत्या सात दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा.अन्यथा कुलगुरूंना घेराव घालू असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी दिला.”
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली!
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे.
आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे.
निषेध !
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 17, 2023
आदित्य ठाकरे घेणार पत्रकार परिषद
दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर सर्व स्तरातून निषेध होत असताना, आता ठाकरे गटाचे आमदार व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदे घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळं आदित्य ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.