Maharashtra Clean Energy Mission (photo-social media)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजनको) आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) यांच्यात सामंजस्य करार संपन्न झाला. महाराष्ट्रात जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध झाला. त्यानंतरही काही प्रकल्प प्रस्तावित होते. पण, विरोधामुळे ते रखडले. अणुऊर्जेला पर्याय नसल्याने महाराष्ट्र आता देशात सर्वात मोठे अणुऊर्जा निर्मिती करणारे राज्य म्हणून पुढे येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” देश जलद गतीने विकसित होत आहे आणि विकासाचा मुख्य आधार म्हणजे स्वच्छ व विश्वासार्ह ऊर्जा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी स्वच्छ ऊर्जा-सक्षम राष्ट्र धोरणामुळे अणुऊर्जातून वीज निर्मितीसाठी राज्यांचा सहभाग वाढविला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आतापर्यंत अणुऊर्जा क्षेत्र हे केंद्र सरकारचे कार्यक्षेत्र होते. परंतु महाजनको प्रथमच एनपीसीआयएलसोबत या उपक्रमात सहभागी होत आहे. हा सामंजस्य करार अत्यंत योग्य वेळी झाला आहे.
डेटा सेंटरचे सर्वांत महत्त्वाचे इंधन म्हणजे स्वच्छ ऊर्जा आणि त्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र ही देशाची ‘डेटा सेंटर कॅपिटल’ बनत आहे. जवळपास ५० ते ६० टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात असून ती सातत्याने वाढत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा : ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?
२०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप तयार करण्यात येणार आहे. सध्याच्या वीज निर्मिती तंत्रज्ञानामध्ये पारंपारिक जीवाश्म इंधन आणि नैसर्गिक स्रोतांसह पर्यावरणीय परिणाम करणारे घटक आहेत. जीवाश्म इंधन (कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू) हे जागतिक विजेचे प्रमुख स्रोत राहिले आहेत, परंतु त्यांच्या वापरामुळे हवा आणि जल प्रदूषण, पॉवर प्लांट उत्सर्जनामुळे होणारे वातावरणातील परिणाम, संसाधनांचा हास व कचरा विल्हेवाट यातील धोके समोर आलेले आहेत.
भारताचे २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यासाठी त्याच्या ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल आवश्यक असून. वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि २०७० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी, कमी जीवनचक्र कार्बन उत्सर्जन होईल. २४ तास विद्युत निर्मितीमुळे अणुऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.






