वाढत्या उष्णतेमुळे एकीकडे नागरिक हैराण असताना त्यातच आता मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ही ओढण्याची शक्यता निर्णाण झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये फक्त साडे 22 टक्केच पाणी साठी शिल्लक राहिला आहे. मुंबईला एकूण सात तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. या तलावांपैकी सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या भातला आणि अप्पर वैतरणा तलावाची आहे. या तलावांच्या पाणीपातळीत घसरण झाली आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेसह ठाणे भिवंडी महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये 22 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. पाऊस लांबल्याने मुंबईसह इतर महापालिकेंना 24 तास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पाण्याची पातळी खालावली आहे. धरणात फक्त 22 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला असून जर पुढील आठ दिवस पाऊस पडली नाही तर भातसा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा फोर्स कमी करण्यात येणाक आहे. एकंदरित काय तर… मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले जाणार आहे.
पाणीसाठ्याची स्थिती काय?
भातसामध्ये शून्य टक्के, अप्पर वैतरनात शून्य टक्के, तानसा तलावात 22 टक्के, तुलसी 24 टक्के, मोडकसागरमध्ये 15 टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची पाणीपातळी कमी होत आहे. मुंबईतील सात तलावांमध्ये एकूण ५.४२ टक्के पाणी शिल्लक आहे.
तसेच या तलावाची पाणी क्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून, विविध जलवाहिन्यांद्वारे दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईतील सात तलावांमधील उपलब्ध पाणीपुरवठा आणि अतिरिक्त पाणीपुरवठा यांचा आढावा या आठवड्याच्या अखेरीस घेतला जाईल.