Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local: मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार! आता ठाणे-डोंबिवली मार्गावरून धावणार 15 डब्यांची लोकल

Mumbai Local News : लोकल प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. ठाणे आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 28, 2026 | 02:58 PM
मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार! आता ठाणे-डोंबिवली मार्गावरून धावणार 15 डब्यांची लोकल

मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार! आता ठाणे-डोंबिवली मार्गावरून धावणार 15 डब्यांची लोकल

Follow Us
Follow Us:

Mumbai Local News In Marathi : मध्य रेल्वेने मुंबईकरांना काहीसा दिलासा दिला असून मध्य रेल्वेने १० तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक लागू करून ठाणे आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांवर १५ डब्यांच्या लोकल ट्रेनसाठी महत्त्वाचे प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

मध्य रेल्वेने १० तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक लागू करून ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवर १५ डब्यांच्या लोकल ट्रेनसाठी महत्त्वाचे प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. हा ब्लॉक ठाण्यातील प्लॅटफॉर्म १, २ आणि ३ (सीएसएमटी टोकाकडील) आणि डोंबिवलीतील प्लॅटफॉर्म १ ए, १ आणि २ वर अप आणि डाउन लोकल मार्गांवर लागू करण्यात आला होता.

औद्योगिक विकास की अधोगतीची वाटचाल; शहरीकरणात घुसमटले पक्षी, ‘या’ दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

डोंबिवलीत १५० मीटर नवीन ट्रॅक

डोंबिवलीमध्ये ट्रॅक आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल करण्यात आले. यामध्ये पॉइंट क्रमांक १२५ डब्ल्यू काढून टाकणे आणि नवीन १२५ डब्ल्यू क्रॉसओव्हर बसवणे, तसेच अंदाजे १५० मीटर नवीन ट्रॅक टाकणे यांचा समावेश होता. डाउन लोकल लाईनवरील सात ओएचई मास्ट/पोर्टल्स काढण्यात आले आणि केबल स्थलांतरणाचे काम करण्यात आले. जागा मर्यादित असूनही, हे काम नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यात आले. याव्यतिरिक्त, अप लोकल लाईनवर दहा १३-मीटरचे पॅनेल खाली उतरवण्यात आले आणि ११ बीआरएन वॅगन व दोन डिझेल इंजिनांच्या मदतीने भंगार हटवण्यात आले.

ठाण्यातील प्लॅटफॉर्म ३ आणि ४ च्या विस्तारासाठी मार्ग मोकळा

ठाणे स्टेशनवर, डाउन लोकल लाईनवरील क्रॉसओव्हर क्रमांक १४८ए/बी सुमारे ६० मीटर हलवून बसवण्यात आला. यासाठी हायड्रा, जेसीबी आणि पोकलेन यांसारख्या अवजड यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. प्लॅटफॉर्म ३ आणि ४ च्या विस्ताराचा मार्ग मोकळा करण्यासाठी विविध टर्नआउट्स आणि क्रॉसओव्हर्सचे टॅम्पिंगदेखील करण्यात आले.

मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर

या मेगा ब्लॉक दरम्यान, ३८० कंत्राटी मजूर, १२० रेल्वे कर्मचारी आणि १४ अधिकाऱ्यांच्या टीमने काम केले. यासाठी सात जेसीबी, दोन पोकलेन आणि चार डम्पर यांसारखी यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. मध्य रेल्वेने सांगितले की, १५-डब्यांच्या लोकल ट्रेनच्या संचालनासाठी टप्प्याटप्प्याने असे आणखी ब्लॉक हाती घेतले जातील.

Sanjay Raut News: खरात बाबाच्या पायाचे तीर्थ प्यायला जाणारे ते ४० आमदार कोण? संजय राऊतांचा खोचक सवाल

Web Title: 15 coach locals soon on central railway platform extension work completed in thane dombivli news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • central railway
  • Mumbai Local
  • railway

संबंधित बातम्या

Mumbai: ठाणे-मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठ्या मागण्या; ४८ प्रवासी संघटनांची रविंद्र चव्हाणांसोबत बैठक
1

Mumbai: ठाणे-मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठ्या मागण्या; ४८ प्रवासी संघटनांची रविंद्र चव्हाणांसोबत बैठक

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य
2

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
3

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.