खरात बाबाच्या पायाचे तीर्थ प्यायला जाणारे ते ४० आमदार कोण"; संजय राऊतांचा खोचक सवाल
Sanjay Raut on Ashok Karat Case: अध्यात्मिक गुरुच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणारा भोंदू बाबा अशोक खरातवरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकरणात अनेक राजकीय व्यक्तींची नावे समोर आली आहेत. यात पहिले नाव म्हणजे रुपाली चाकणकर. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव समोर आल्याने त्यांच्यावरील दबाव वाढला होता. त्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल रात्री उशिरा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. पण रुपाली चाकणकर यांच्याबरोबरच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचेही नाव समोर आले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिका केली आहे.
Middle East Tension : होर्मुझवर आता राज करणार ट्रम्प? त्यांच्या ‘या’ एका विधानाने जगात खळबळ
दिपक केसरकर स्वत: म्हणत आहेत की, मीच का ? इतर 40 आमदारही अशोक खरातकडे जात होते. हे सत्ताधारी पक्षाचे नेतेच सांगत आहेत, मला एकट्यालाच टार्गेट करू नका. ४० आमदार खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते. ते ४० आमदार कोण आहेत. तिथे जाणारे मंत्री कोण होते. याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, खरात बाबाकडून पाणी आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करणारे सरकारमधील ते लोक कोण होते, हेही त्यांनी सांगाव. यासोबतच खरात बाबा दिल्लीत जाऊन कोणाला भेटत होता. काय करत होता, हे तपासात निष्पन्न झालं असेल तर तेही समोर आले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते?, कोणाला भेटत होते?, हे सुद्धा पोलीस तपासात निष्पन्न झालं असेल, तर ते समोर यायला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यातील ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर, खासदार संजय राऊत यांनी अशोक खरात प्रकरण आणि नरहरी झिरवळ यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सरकारवर बोचरी टीका केली आहे. “सरकारने खरातला जणू राजमान्यताच दिली होती,” असा टोला लगावत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. अशोक खरातच्या वावराबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ” खरातचा वावर कुठे नव्हता? तो सर्वत्र होता. बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा, इतका त्याचा वावर होता. जणू काही सरकारने त्याला अधिकृत राजमान्यताच दिली होती. ही राजमान्यता देणारे लोक आजही फडणवीसांच्या मंत्रिमंडळात बसलेले आहेत. फडणवीसांनी यावर मौन बाळगता सोडता स्पष्टपणे बोलावं.”
LPG Cylinder Rate: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘सत्यता पडताळली जाईल’ असे विधान केले होते. यावर प्रत्युत्तर देताना राऊत यांनी सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. “व्हिडिओची सत्यता कशी पडताळणार? ते किरीट सोमय्यांच्या व्हिडिओचीही सत्यता पडताळणार होते. प्रत्यक्षात अशा प्रकारचे व्हिडिओ आले की त्यांची सत्यता कधीच पडताळली जात नाही, फक्त ठराविक उत्तरं दिली जातात,” असे राऊत म्हणाले. “विरोधी पक्षाच्या बाबतीत अशा काही घटना घडल्या असत्या तर आधी फाशी आणि मग चौकशी, असा न्याय झाला असता. पण इथे सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत फाशीचं नावंच नाही; फक्त ‘करू चौकशी, करू चौकशी’ असंच सुरू आहे.” असा टोलाही त्यांनी लगावला.






