Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election Result 2026: फडणवीसांची रणनीती यशस्वी! मानखुर्द वॉर्ड 135 मध्ये भाजपचा झेंडा, नवनाथ बन यांनी मारली बाजी

Municipal Election Result 2026: मानखुर्दमधून भाजपचे नवनाथ बन विजयी झाले आहे. त्यांच्या विजयाचा आनंद आता सर्वत्र साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीला मुंबईत पुन्हा यश आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 16, 2026 | 12:42 PM
BMC Election Result 2026: फडणवीसांची रणनीती यशस्वी! मानखुर्द वॉर्ड 135 मध्ये भाजपचा झेंडा, नवनाथ बन यांनी मारली बाजी

BMC Election Result 2026: फडणवीसांची रणनीती यशस्वी! मानखुर्द वॉर्ड 135 मध्ये भाजपचा झेंडा, नवनाथ बन यांनी मारली बाजी

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईत फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक!
  • मानखुर्द वॉर्ड 135 मध्ये भाजपचा झेंडा
  • मानखुर्दमधून भाजपचे नवनाथ बन विजयी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मानखुर्दमधून भाजपाचे नवनाथ बन विजयी झाले आहेत. मानखुर्द परिसरातील वॉर्ड 135 मधून नवनाथ बन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. नवनाथ बन यांच्याविरोधात रिंगणात ठाकरे गटाच्या समीक्षा सक्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय पवार तर काँग्रेसकडून वसंत कुंभार हे उमेदवार होते. मात्र या सर्व उमेदवारांना मागे टाकत नवनाथ बन यांनी बाजी मारली आहे.

विशेष म्हणजे नवनाथ बन पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक लढवत होते. महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांना यश मिळाले आहे. खरं तर नवनाथ बन यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तसेच नवनाथ बन पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक लढवत असल्याने त्यांच्या उमेदवारीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात होते. मात्र आता मानखुर्द परिसरातील वॉर्ड 135 मधून नवनाथ बन यांनी बाजी मारल्यानंतर सर्वत्र विजयाचा गुलाल उधळला जात आहे.

Municipal Election Result 2026: जळगावात मतमोजणीवेळी राडा! EVM मशीनचे सील फुटल्याचा उमेदवारांच्या प्रतिनिधींचा आरोप

कोण आहेत नवनाथ बन?

भाजपाचे विजयी उमेदवार नवनाथ बन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. खरं तर ठाकरे गटाच्या संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात नेहमीच आघाडीवर असणारे अशी नवनाथ बन यांची ओळख आहे. जेव्हा भाजपने मुंबईत नवनाथ बन यांची उमेदवारी जाहीर केली, त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या मानखुर्दमधील वॉर्ड क्रमांक 135 मधून नवनाथ बन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेचा विजय झाला होता. मात्र यंदा भाजपाने बाजी मारली आहे. (फोटो सौजन्य – X) 

मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी

वॉर्ड क्रमांक 214 मधून रिंगाणात असलेल्या भाजपाच्या अजय पाटील यांनी विजय मिळवला आहे. तर वॉर्ड क्रमांक 215 मधून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे संतोष ढाले विजयी झाले आहेत. वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. तर वॉर्ड क्रमांक 1 मधून रेखा यादव विजयी झाल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 193 मधून ठाकरे गटाच्या हेमांगी वरळीकर यांनी बाजी मारली आहे.

BMC Election Result 2026: मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच महायुतीचे मोठे यश! 67 उमेदवारांची बिनविरोध निवड, वाचा यादी

प्रभाग क्रमांक १३४ मध्ये एमआयएमचे मेहजबीन खान विजयी झाले आहेत. वॉर्ड क्रमांक ५१ मधून शिवसेनेच्या वर्षा टेंबवलकर यांनी विजय मिळवला आहे. वॉर्ड क्रमांक ५० मधून भाजपाचे राजपूत प्रतापसिंह विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 72 मधून भाजपाचे ममता यादव विजयी झाले आहेत. तसेच वॉर्ड क्रमांक 135 मधून भाजपाचे नवनाथ बन विजयी झाले आहेत.

Web Title: Bmc election result 2026 bjp candidate navnath ban won in mankhurd ward number 135

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • BJP
  • BMC Election 2026
  • CM Devendra Fadanvis
  • Municipal Election Result 2026

संबंधित बातम्या

Solapur Municipal Result : राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल! भाजपची महिला उमेदवार तुरुंगातून विजयी
1

Solapur Municipal Result : राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल! भाजपची महिला उमेदवार तुरुंगातून विजयी

कोल्हापुरात 81 पैकी 28 जागांचे निकाल जाहीर; काँग्रेसची आघाडी तर भाजप…
2

कोल्हापुरात 81 पैकी 28 जागांचे निकाल जाहीर; काँग्रेसची आघाडी तर भाजप…

Nashik Election 2026 : नाशिकमध्ये फिरलं वारं! भाजपला बसला मोठा धक्का, बडगुजर यांना उमेदवारी देणं फायद्यात की तोट्यात?
3

Nashik Election 2026 : नाशिकमध्ये फिरलं वारं! भाजपला बसला मोठा धक्का, बडगुजर यांना उमेदवारी देणं फायद्यात की तोट्यात?

Nagpur Election Results 2026: मुख्यमंत्र्यांनी गड राखला! नागपुरात भाजपला बहुमत; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
4

Nagpur Election Results 2026: मुख्यमंत्र्यांनी गड राखला! नागपुरात भाजपला बहुमत; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.