Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : राज्यातील चेकपोस्ट बंद होणार; पोलीस, आरटीओकडून अवैध वसुली

अनेक राज्यांनी आपल्या सीमांवरील चेकपोस्ट बंद केल्या. पण, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आजही चेकपोस्ट सुरू असून, तिथे पोलिस व आरटीओ खात्यातील काही घटक अवैध वसुली करत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 14, 2026 | 04:08 PM
राज्यातील चेकपोस्ट बंद होणार; पोलीस, आरटीओकडून अवैध वसुली (फोटो सौजन्य-Gemini)

राज्यातील चेकपोस्ट बंद होणार; पोलीस, आरटीओकडून अवैध वसुली (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याच्या सीमावर्ती भागातील चेकपोस्ट संदर्भात वारंवार येणाऱ्या तक्रारींची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत राज्यातील सर्व चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनानेही हा निर्णय पूर्णपणे अंमलात आणण्याचा निर्धार केला असून राज्यातील चेकपोस्ट बंद करण्यात येतील, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

भारतात वन नेशन, वन टॅक्स या संकल्पनेंतर्गत जीएसटी व्यवस्था लागू करण्यात आली. त्यानंतर अनेक राज्यांनी आपल्या सीमांवरील चेकपोस्ट बंद केल्या. पण, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आजही चेकपोस्ट सुरू असून, तिथे पोलीस व आरटीओ खात्यातील काही घटक अवैध वसुली करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.

पुण्यात वाहतूक व्यवस्थेला पुरेसा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांची माहिती

नुकसान थांबवण्याचा प्रयत्न

नाना पटोले लक्षवेधीच्या मुद्यावर म्हणाले, * देशपातळीवर कायदा लागू झाल्यानंतर महाराष्ट्रानेही त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात करचोरी रोखण्यासाठी आणि राज्य उत्पादन शुल्कासह इतर विभागांमध्ये होणारे मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार थांबवण्यासाठी राज्याच्या सीमांवर सर्वत्र चेकपोस्ट उभारण्यात आले. या चेकपोस्टच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीचे होणारे नुकसान थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

जीएसटीनंतर देशभरात चेकपोस्ट बंद

नंतर मात्र ‘वन नेशन, वन टॅक्स’ या संकल्पनेअंतर्गत जीएसटी व्यवस्था लागू करण्यात आली. जीएसटी लागू झाल्यानंतर देशातील अनेक राज्यांनी आपल्या सीमांवरील चेकपोस्ट बंद केल्या. परंतु, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आजही या चेकपोस्ट सुरू आहेत. प्रत्यक्षात या चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण असते. काही ठिकाणी दलालांचे जाळे तयार झाले असून तेथे अक्षरशः लूट सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत.

पोलिस, आरटीओकडून अवैध वसुली

पटोले यांनी आरोप केला की, पोलिस आणि परिवहन विभागातील काही घटकांकडून अवैध वसुली सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. मी विधानसभा अध्यक्ष असताना अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्या संदर्भात संबंधित आयुक्तांशी चर्चा केली असता त्यांनी ही व्यवस्था काही काळापुरतीच असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात सरकार या चेकपोस्टसाठी करार वाढवण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकारामुळे निर्माण झालेला सावळागोंधळ आणि सुरू असलेली वसुली थांबवण्यासाठी राज्य सरकार या चेकपोस्ट बंद करणार का, असा सवाल पटोलेंनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला.

MSRTC ST Bus : इलेक्ट्रिक बसमुळे एसटीच्या तोट्यात दिवसेंदिवस मोठी वाढ, प्रकल्प रद्द करण्याची संघटनेची मागणी

Web Title: Checkposts in the state will be closed illegal collection by police and rto

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • RTO

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.