Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू

ST Bus Service: दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या थेट एसटी बससेवेचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ही बस अटल सेतूमार्गे धावणार असल्याने मुंबईतील प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत थेट सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 07, 2026 | 04:29 PM
मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू

मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू

Follow Us
Follow Us:
  • दादर–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एसटी बससेवेचा शुभारंभ
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते सेवेला प्रारंभ;
  • अटलसेतू मार्गे प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी
ST Bus Service: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुंबईशी सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सुरू करण्यात आलेल्या दादर–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवेचा आज परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. अटलसेतू मार्गे धावणाऱ्या या बससेवेमुळे दादरहून विमानतळापर्यंत प्रवाशांना थेट, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

दादरहून थेट विमानतळापर्यंत सेवा सुरू

यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एसटीच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळ्याशी जोडण्याच्या दृष्टीने ही बससेवा महत्त्वाची आहे. मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या दादरहून थेट विमानतळापर्यंत सेवा सुरू झाल्याने विमानप्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होईल.”

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी एसटीकडून बोरिवली–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्वारगेट–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या बससेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांना विमानतळाशी जोडण्याच्या दृष्टीने या सेवांचा महत्त्वपूर्ण उपयोग होणार आहे. विमानतळापर्यंत सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाकडून आवश्यकतेनुसार आणखी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

प्रवाशांसाठी मोठी सुविधा

एसटीची ‘लालपरी’ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. या व्यापक जाळ्याचा उपयोग करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवाशांना सहज आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून टप्प्याटप्प्याने आवश्यक बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दादर हे मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र असल्याने येथून विमानतळासाठी सुरू होणारी थेट बससेवा प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची ई-शिवाई इलेक्ट्रॉनिक बस सेवा आजपासून म्हणजेच 7 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू झाली असूनया बसमुळे प्रवासी दादर पश्चिम, बोरिवली आणि पुण्याला जाण्याची सुविधा मिळेल. विमानतळावरून दादरला जाण्याचे तिकीट 170 रुपये असेल. तर बोरिवलीसाठी 210 रुपये आणि पुण्यासाठी 450 रुपये भाडे निश्चित करण्यात आलं आहे. दादरला जाणारी बस ही सायन आणि अटल सेतू मार्गे जाणार आहे. बोरिवलीची बस देखील अटल सेतूवरूनच जाईल.

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल

Web Title: Dadar navi mumbai international airport st bus service launched via atal setu pratap sarnaik sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • airport
  • Navi Mumbai
  • st bus

संबंधित बातम्या

Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार
1

Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार

JNPA Port: जेएनपीएतील वाहतूककोंडी दूर; २४ तास देखरेखीमुळे कंटेनर वाहतूक सुरळीत
2

JNPA Port: जेएनपीएतील वाहतूककोंडी दूर; २४ तास देखरेखीमुळे कंटेनर वाहतूक सुरळीत

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा
3

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका
4

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.