Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

Eknath Shinde: मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा बोरिवली येथे गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चालकांना प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ‘मराठीवर सक्ती नव्हे, तर भक्ती करणाऱ्या चालकांचा हा गौरव आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 27, 2026 | 05:03 PM
मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

Follow Us
Follow Us:
  • ‘जन्मभूमी कुठलीही असो, कर्मभूमी महाराष्ट्र’
  • मराठी शिकणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे शिंदेंकडून कौतुक
  • बोरिवलीत 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव
Eknath Shinde: महाराष्ट्र सरकारकडून व्यावसायिक वाहन चालक (रिक्षा, टॅक्सी आणि अॅप- आधारित कॅब) आणि सर्व माध्यमाच्या शाळांसाठी राज्यभरात मराठी भाषेची सक्ती लागू केली आहे. याचदरम्यान “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोरिवली येथील कोरा केंद्र ग्राउंडवर २० हजार हिंदी भाषिक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षणाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

रस्त्यावर येताना मराठी शिकलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांची मोठी गर्दी पाहून आनंद झाल्याचे सांगत शिंदे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी साहित्यिक, भाषातज्ज्ञ, प्राचार्य, शिक्षक आणि मराठीप्रेमींना सोबत घेऊन कठीण काम सोपे केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली

“मराठी भाषा तोडणारी नाही, जोडणारी आहे. रिक्षा-टॅक्सीमध्ये प्रवाशाला ‘कुठे जायचे?’ एवढेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकाला ‘हळू उतरा’ असे प्रेमाने म्हणता आले पाहिजे. प्रवाशांनीही चालकांशी मराठीत संवाद साधावा. त्यामुळे मराठीचा प्रचार-प्रसार वाढेल आणि चालकांचा व्यवसायही वाढेल,” असे शिंदे म्हणाले.

रिक्षा-टॅक्सी सेवा ही सेवाच

आपणही सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवली असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी रिक्षा-टॅक्सी सेवा ही सेवाच असल्याचे सांगितले. कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, असे आवाहन करताना प्रवाशांचे पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर पोलिसांकडे जमा करणाऱ्या प्रामाणिक चालकांचे त्यांनी कौतुक केले. अशा चालकांचा समाजात आदर्श म्हणून गौरव होतो, असे त्यांनी नमूद केले.

मुंबईत राहणारा आणि मराठीवर प्रेम करणारा प्रत्येक मुंबईकर हा आपला नातेवाईक, मित्र आणि आपला माणूस आहे, अशी भावना ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेसह मराठी शिकविणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले.

आपण मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा निर्णय झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास मान्यता दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचाही उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ६० हजार जणांनी मराठी शिकली असून त्याचा अभिमान बाळगा, असे सांगत त्यांनी इतरांनीही मराठी शिकावी, तिचा प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन केले.

मुंबईचा विकास करण्याचे आवाहन

चांगल्या कामात विघ्न आणणाऱ्यांना बळी न पडता सर्वांना सोबत घेऊन मुंबईचा विकास करण्याचे आवाहन करत “मुंबई रोजीरोटी देणारी आहे; मुंबईवर आणि मराठीवर प्रेम करा,” असे शिंदे म्हणाले.

गोविंदा उत्सव आणि गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरे करून संस्कृती-परंपरा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मुरजी पटेल , आमदार प्रा. मनिषा कायंदे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्यासह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, रिक्षा-टॅक्सी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

Web Title: Eknath shinde felicitates 20000 auto taxi drivers marathi language training borivali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Marathi Language

संबंधित बातम्या

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
1

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
3

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
4

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.