Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: “कलिंगडमध्ये विष होतं का?”; एकाच कुटुंबाच्या मृत्यूनंतर अबु आझमींचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मोठा मागणी

मुंबईच्या पायधुनी भागात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आमदार अबु आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 28, 2026 | 07:46 PM
एकाच कुटुंबाच्या मृत्यूनंतर अबु आझमींचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली 'ही' मोठा मागणी (Photo Credit- X)

एकाच कुटुंबाच्या मृत्यूनंतर अबु आझमींचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली 'ही' मोठा मागणी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मुंबईत कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
  • अबु आझमींची मुख्यमंत्री फडणवीसांकडे सखोल चौकशीची मागणी
Mumbai Watermelon Food Poisoning: महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. अबू आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून, कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष आणि सखोल चौकशी केली जावी, अशी विनंती केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या कुटुंबाने कलिंगड खाल्ल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत भेसळ किंवा विषारी घटकांचा समावेश असण्याची शक्यता असल्याने, आझमी यांनी फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) तपास करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि पीडित कुटुंबाला न्याय तसेच शक्य ती सर्व मदतपुरवण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलच्या रात्री या कुटुंबाने आपल्या घरी काही नातेवाईकांना जेवणासाठी बोलावले होते. नऊ जणांनी एकत्र जेवण केले, त्यानंतर नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. त्याच रात्री उशिरा, पहाटे १:०० ते १:३० च्या सुमारास, अब्दुल्ला डोकडिया, त्यांची पत्नी नसरीन डोकडिया आणि त्यांच्या मुली आयेशा व झैनब यांनी कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच या चौघांची प्रकृती बिघडू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी २६ एप्रिल रोजी या चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला; परिणामी, कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

चिकन बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? तज्ज्ञांनी सांगितलं खरं सत्य

तेथून, त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने, त्यांना जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु एकामागून एक अशा प्रकारे त्या चौघांचाही मृत्यू झाला. सर्वात आधी मृत्यूमुखी पडणारी व्यक्ती म्हणजे त्यांची सर्वात धाकटी मुलगी, १३ वर्षीय झैनब, जिचा मृत्यू सकाळी १०:१५ च्या सुमारास झाला. त्यानंतर काही अंतराने, थोड्याच वेळात कुटुंबातील इतर तीन सदस्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात ‘अपघाती मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

उपायुक्त (DCP) प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी नातेवाईकांसोबत जेवण झाल्यानंतर, रात्री उशिरा या कुटुंबाने कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर कुटुंबातील चार सदस्यांची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्या चौघांचाही मृत्यू झाला. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, नमुने गोळा करून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

चिकन बिर्याणीनंतर कलिंगड खाणे ठरले घातक! मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम अहवालातून उलगडणार रहस्य

Web Title: Four of family died after eating watermelon in mumbai abu azmi demands inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • Abu Azmi
  • CM Devendra Fadanvis
  • crime
  • Mumbai
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
2

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती
3

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?
4

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.