
Mumbai News: मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा! काम न झाल्यास दंडात्मक कारवाई; महापालिकेने दिला इशारा
Mumbai News: मुंबईच्या किनारपट्टीवरील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी वेसावे येथे उभारण्यात येत असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बृहन्मुंबई मनपाने दिले आहेत. ठरवून दिलेल्या काम पूर्ण न संबंधित कंत्राटदारावर कठोर दंडात्याक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिला आहे. कामाचा वेग वाढवण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मनुष्यबळ ५०० पर्यंत वाढवून ३ सत्रांमध्ये काम करण्याचे आदेशही दिले.(फोटो सौजन्य – AI)
अतिरिक्त पालिका आयुक्त बांगर यांनी नुकतीच प्रकल्पस्थळाला भेट देऊन स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पाची सुमारे ८० टक्के भौतिक प्रगती झाली आहे. मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली ‘द्रव प्रक्रिया व्यवस्था’ ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर संपूर्ण प्रकल्प ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
वेसावे येथील खारक्षेत्रात हे केंद्र उभारण्यात येत असून, त्याची क्षमता दररोज सुमारे १८० दशलक्ष लिटर इतकी आहे. सांडपाण्यातील घातक प्रदूषके नष्ट करण्यासाठी या केंद्रात आधुनिक ‘सिक्वेन्शियल बॅच रिअॅक्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या प्रकल्पातील संरचनाविषयक कामे पूर्ण झाली असून, प्रक्रिया टाक्या, इनलेट-आउटलेट व्यवस्था, पंप हाऊस, स्लज युनिट, पाइपलाइन तसेच एरेशन ब्लोअर्स व स्क्रीनिंग यंत्रणेच्या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
RTI : पश्चिम मुंबईत दोन वर्षांत एकाही शाळेची तपासणी नाही? शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
या प्रकल्पामुळे वेसावे, अंधेरी पूर्व व पश्चिम, जुहू आणि विलेपार्ले या भागातील नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी समुद्रात सोडले जाणार असल्याने वेसावेसह पश्चिम उपनगरांतील किनारपट्टीच्या पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.प्रकल्पस्थळी सध्या दररोज सुमारे ३४० मनुष्यबळ कार्यरत असून, ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ५०० पर्यंत वाढवण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत हे अतिरिक्त मनुष्यबळ कायम ठेवून तीन सत्रांमध्ये चोवीस तास काम सुरू ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.कामाचा वेग वाढवत असताना गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली. या पाहणी दौऱ्याप्रसंगी प्रमुख अभियंता (मुंबई मलनिःसारण प्रकल्प) राजेंद्र परब यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Ans: मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Ans: मलजल प्रक्रिया केंद्रात घरांमधून आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे पाण्यातील प्रदूषक आणि घातक घटक कमी करण्यास मदत होते.
Ans: शहरातील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करणे, जलप्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे यासाठी मलजल प्रक्रिया केंद्रे महत्त्वाची आहेत.