Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलांसाठी ‘प्रीमियम टॉयलेट’; स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांचा संगम

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेने कांजूरमार्ग स्थानकावर आधुनिक सुविधांनी सुसज्ज 'वुमेन्स प्रीमियम टॉयलेट' सुरू केले असून, यामुळे महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2026 | 10:30 AM
कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलांसाठी 'प्रीमियम टॉयलेट'; स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांचा संगम

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलांसाठी 'प्रीमियम टॉयलेट'; स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांचा संगम

Follow Us
Follow Us:
  • कांजूरमार्ग स्थानकावर महिलांसाठी आधुनिक ‘वुमेन्स प्रीमियम टॉयलेट’ सुरू.
  • स्वच्छतागृहासह ड्रेसिंग एरिया, सॅनिटरी नॅपकिन मशीन आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा.
  • लवकरच मध्य रेल्वेच्या इतर गर्दीच्या स्थानकांवरही अशी सुविधा उपलब्ध होणार.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत दररोज लाखो महिला प्रवास करतात. मात्र, अनेक स्थानकांवर स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज महिला स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर ‘वुमेन्स फॅसिलिटी सेंटर’ सुरू केले आहे. सीएसएमटी दिशेकडे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सुरू झालेल्या या केंद्रामुळे महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान स्वच्छ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Mumbai Rain Updates: मुंबई पावसाचा जोर कायम! तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने; सखल भागांत पाणीच पाणी

हे केवळ स्वच्छतागृह नसून, महिलांच्या गरजा लक्षात घेऊन उभारण्यात आलेले आधुनिक सुविधा केंद्र आहे. येथे स्वच्छ प्रसाधनगृह, प्रशस्त वॉश बेसिन, ड्रेसिंग एरिया, आरसे, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, वापरलेल्या नॅपकिनच्या विल्हेवाटीची यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि नियमित स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात या सुविधांचा वापर करता येणार आहे. मुंबईतील हजारो महिला दररोज नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि इतर कामांसाठी लोकलने प्रवास करतात.

प्रीमियम सुविधा केंद्र ठरणार मोठा दिलासा देणारे

दीर्घ प्रवासादरम्यान स्वच्छतागृहांची गरज भासल्यास त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत कांजूरमार्ग स्थानकावरील हे प्रीमियम सुविधा केंद्र मोठा दिलासा देणारे ठरणार आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने मुलुंड, घाटकोपर, चेंबूर आणि एलटीटी स्थानकांवर ‘वुमेन्स पावडर रूम’ ही संकल्पना राबविली होती. त्याला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता अधिक दर्जेदार आणि सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘वुमेन्स प्रीमियम टॉयलेट’ सुरू करण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या मते, प्रवार सुविधांचा दर्जा उंचावण्याबरोबरच महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षि आणि सन्मानजनक करणे हा उपक्रमामागील उद्देश आहे.

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

लवकरच अन्य स्थानकांवरही मिळणार सेवा

कांजूरमार्गनंतर प्रवाशांची संख्या अधिक असलेल्या इतर स्थानकांवरही अशा सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे. महिला प्रवाशांसाठी ही सुविधा निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.

 

Web Title: Kanjurmarg station womens premium toilet modern facility centre central railway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Indian Railway
  • NAVARASHTRA
  • women safety

संबंधित बातम्या

कल्याण-बदलापूर रेल्वेची क्षमता वाढणार; ३१ पूल पूर्ण, चिखलोली स्थानक अंतिम टप्प्यात
1

कल्याण-बदलापूर रेल्वेची क्षमता वाढणार; ३१ पूल पूर्ण, चिखलोली स्थानक अंतिम टप्प्यात

जेलमधील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय; जामीन, जेल कोर्ट आणि नव्या कारागृहांवर भर… सरकारचा नवा प्लॅन
2

जेलमधील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय; जामीन, जेल कोर्ट आणि नव्या कारागृहांवर भर… सरकारचा नवा प्लॅन

Raigad News: दिघी बंदर विस्ताराला स्थानिकांचा तीव्र विरोध; पर्यावरण, रोजगार आणि उपजीविकेवर प्रश्न
3

Raigad News: दिघी बंदर विस्ताराला स्थानिकांचा तीव्र विरोध; पर्यावरण, रोजगार आणि उपजीविकेवर प्रश्न

Chandrapur News: धाबा परिसरात मादी बिबट्या आणि पिल्लाचा वावर; 125 वनकर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू
4

Chandrapur News: धाबा परिसरात मादी बिबट्या आणि पिल्लाचा वावर; 125 वनकर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.