Mumbai Rain Updates: मुंबई पावसाचा जोर कायम! तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने; सखल भागांत पाणीच पाणी
Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई
सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची घाई असते. अशातच, पावसाची रिपरिप आणि वाहतूक उशीराने सुरु असल्याने नागरिकांचा खोळंबा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज आता सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईसह संपूर्ण शहरात आजही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईकरांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (फोटो सौजन्य: X)
सतत सुरु असलेल्या पावसामुळे आता वातावरणात देखील गारवा निर्माण झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तासांत मुंबईत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वााऱ्यासह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
मुंबईतील पावसाचा परिणाम आता रेल्वे वाहतूकीवर झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पश्चिम मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरु असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
हवामान विभागाने आज मुंबईतील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे आणि पालघरसह रायगडमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच हवामान विभागाने मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय, मुंबईतील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. पुढील 72 तास मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.






