Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! KEM हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील, ‘उबाठा’चा विरोध; तर मंगलप्रभात लोढा यांचा पलटवार

मुंबईतील केईएम रुग्णालयाचे नाव बदलून 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक' रुग्णालय होणार आहे. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 28, 2026 | 04:08 PM
मोठी बातमी! KEM हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील (Photo Credit- X)

मोठी बातमी! KEM हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मोठी बातमी! KEM हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील,
  • ‘उबाठा’चा विरोध
  • तर मंगलप्रभात लोढा यांचा पलटवार
KEM Hospital Mumbai News: केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे. केईएम ह़ॉस्पिटलचे जूने नाव बदलुन ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक’ रुग्णालय असे करण्याकरिता मंगलप्रभात लोढांनी महापौरांना पत्र दिले होते. आरोग्य समितीकडे हा प्रस्ताव आल्यानंतर तो मंजूर करुन आयुक्तांकडे अभिप्रायाकरता पाठवला गेला. आता आयुक्तांनीही या नामांतर प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे.

‘उबाठा’चा विरोध; तर मंगलप्रभात लोढा यांचा पलटवार

दरम्यान, मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या नामांतराच्या प्रश्नावरुन सुरु असलेल्या राजकारणाला मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी अखेर विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. किंग एडवर्ड सारख्या ब्रिटिशांनी आपल्या भारतीय शेतकऱ्यांसह अनेकांना मारले, त्यांच्या नावाची भक्ती तुम्ही करत आहात, याची तुम्हांला लाज वाटली पाहिजे, आज तुम्ही सोनिया गांधी यांच्या काँग्रेससोबत गेल्यामुळेच तुम्ही कौशल्य एकलव्याच्या नावाला विरोध करीत असल्याची जोरदार हल्लाबोल मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर चढविला.

#WATCH | Mumbai: Shivsena (UBT) leaders hold a protest against Maharashtra Minister Mangal Prabhat Lodha’s proposed renaming of the KEM (King Edward Memorial) Hospital to Kaushalyashreshtha Ekalavya Memorial. Shivsena leader Kishori Pednekar says, “The name of the KEM will not… pic.twitter.com/d9oHaXJsWL — ANI (@ANI) April 27, 2026


राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वीच केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबतची मागणी केली होती. त्यानंतर नुकत्याच मुंबई महानगरपालिकेच्या झालेल्या बैठकीत या नामांतरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. केईएम रुग्णालयाच्या या नामांतराला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून विरोध करण्यात आला आहे. तर मंगळवारी उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी मोहीम चालविण्यात आली होती. त्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी लोढा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार हल्लाबोल चढविला.

Mumbai News: पावसाळ्यापूर्वी २६ हजार झाडांची छाटणी! ७ जूनपर्यंत वृक्षछाटणी करण्याचे महापालिका प्रशासनाचे लक्ष्य

आमचा विरोध किंग एडवर्डच्या नावाला

यावेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुळात केईएमचे नामांतर करताना कुठेही त्याच्या मूळ नावाला धक्का पोहचविलेला नाही. आमचा विरोध किंग एडवर्डच्या नावाला आहे, त्यामुळे आम्ही कौशल्य एकलव्य मेमोरियल असे नामांतर करण्यासंदर्भात मागणी केली होती. ज्याचे नाव आता ही केईएम रुग्णालय असेच राहणार आहे. केवळ किंग एडवर्डच्या नाव न राहता आता त्याठिकाणी कौशल्य एकलव्य असे राहणार आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

काँग्रेसची साथ पकडली अन्…

तर यापूर्वी व्हीजेटीआयचे नामांतर करुन वीरमाता जीजाबाई टेक्निकल इन्सिट््युट ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर व्हीटी स्टेशनचे नामांतर करुन आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे केले. त्यावेळी उबाठाने विरोध केला नाही. त्यावेळी ते आमच्यासोबत होते. आता मात्र त्यांनी सोनियांच्या काँग्रेसची साथ पकडली आहे, त्यामुळे सोनिया गांधी यांना खूष करण्यासाठी उबाठाकडून केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.काँग्रेसला किंग एडवर्ड हे नाव आवडते, म्हणून उबाठाकडून हा विरोध केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तर या नामांतरला आदिवासी संघटनांनी विरोध केला असून याविरोधात राज्यभरातील आदिवासी उबाठाच्या विरोधात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Pratap Sarnaik : मोठी बातमी! “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी…”, मराठीसक्तीवरून परिवहन मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Web Title: Kem hospital mumbai renamed to kaushalyashreshtha eklavya memorial hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • KEM HOSPITAL
  • Mangalprabhat Lodha
  • Mumbai
  • Shiv Sena UBT

संबंधित बातम्या

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
1

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

Jaykumar Rawal : ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन
2

Jaykumar Rawal : ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा
3

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
4

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.