Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather Update : वादळ वारा अन् विजा…! महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट

कोकणात मान्सूनने दमदार हजेरी लावत रत्नागिरीसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील 25 ते 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2026 | 11:21 AM
वादळ वारा अन् विजा...! महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट

वादळ वारा अन् विजा...! महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Follow Us
Follow Us:
  • कोकणात पावसाची दमदार सलामी
  • मुंबईसह 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • मृग नक्षत्रासोबत पावसाची हजेरी
  • महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update News Marathi : कोकणातील अनेक भागांमध्ये मान्सूनने दमदार सुरुवात करत जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये काल (8 जून) दुपारनंतर सुरू झालेला पाऊस अद्यापही कायम असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसोबत काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गामध्येही समाधानाचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे, 8 जूनपासून मृग नक्षत्राची सुरुवात झाली आणि त्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या पावसाची सुरुवात वेळेवर झाल्याने आता शेतकरी शेतीच्या कामांना वेग देण्याच्या तयारीत आहेत. भात लागवड, नांगरणी आणि इतर शेतीपूर्व कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. कोकणात सक्रिय झालेला मान्सून आता मुंबईच्या दिशेने सरकत असून आज मुंबईतही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Success Story : राजुरीच्या लेकीची मोठी झेप! अवघ्या २० वर्षी अमेरिकेत कर्मशियल पायलट म्हणून भरारी

दरम्यान, महाराष्ट्रात आज (9 जून) वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास 25 ते 30 जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर भागात मान्सून अधिक सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच वादळी वाऱ्यांदरम्यान सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मान्सून या राज्यांमध्ये दाखल

पुढील तीन ते चार दिवसांत, मान्सून महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये, तसेच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांच्या अनेक भागांमध्ये दाखल होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या मते, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा आणि अरबी समुद्राच्या प्रदेशातील सक्रिय चक्रीवादळी स्थिती आणि विविध द्रोणी प्रणालींमुळे पावसाला चालना मिळत आहे. परिणामी, कोकण, किनारपट्टीचे प्रदेश आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो.

उष्णतेपासून दिलासा

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत मोसमी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात पुण्यातील लोकांनाही उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. विशेषतः संध्याकाळच्या पावसामुळे दिलासा मिळेल.

Mumbai News: पवई तलावाचे अस्तित्व आले धोक्यात! दररोज सोडले जाते १८ दशलक्ष लीटर मलजल; महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

Web Title: Kokan heavy rain monsoon mumbai yellow alert maharashtra weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • maharashtra
  • Rain Update
  • Weather Update

संबंधित बातम्या

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
1

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात
2

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील
3

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब
4

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.