Success Story : राजुरीच्या लेकीची मोठी झेप! अवघ्या २० वर्षा घेतली अमेरिकेत कर्मशियल पायलट म्हणून भरारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ऐतिहासिक पुण्याची ‘हेरिटेज सफर’ जोरात! सांस्कृतिक पर्यटनाला पर्यटकांची वाढती पसंती; पण…
पण पायलट बनण्याचा तिचा हा प्रवास काही सोपा नव्हता. वडिलांचा विरोध असतानाही तिने आपल्या आई-मावशीच्या पाठिंब्याने आपले स्वप्न साकारले. सिद्धाला लहानपाणापासूनच पायलट होण्याची इच्छा होती. पण यासाठी शिक्षण अत्यंत खर्चिक असल्याने आणि घरची परिस्थिती पाहता तिने हे स्वप्न मनातच दाबून ठेवले होते. बारावीची परिक्षा झाल्यानंतर पुढे काय करायचे हा प्रश्न तिच्यासमोर उभा होता.
यावेळी तिच्या वडिलांनी तिने डॉक्टर किंवा अभियांता व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. पण सिद्धीच्या मनात आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न धगधगत होते. तिने धाडसाने वडिलांसमोर मला पायलट व्हायचंय असे सांगितले. सुरुवातील तिच्या वडिलांनी शिक्षण आवाक्याबाहेरचे असल्याचे सांगत याला विरोध केला. पण तिने खचून न जात आपल्या स्वप्नावर ठाम राहिली.
आई, मावशी, काका आणि चुलत्यांच्या पाठिंब्याने मुंबईच्या नामांकित अकॅडमीत ग्राउंड क्लासेस पूर्ण केले. यानंतर अमेरिकेत फ्लोरिडा येथील प्रतिष्ठित संस्थेत व्यावसायिक वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले. आपल्या कुटुंबापासून अडीच वर्ष दूर राहून कठोर परिश्रम घेतले. अथक मेहनत आणि जिद्द, चिकाटीच्या जोरावर २८ महिन्यांत तिने आपले पायलट बनण्याचे ध्येय गाठले.
सिद्धीने अंतिम पायलट परिक्षेत उत्तीर्ण होत तिने केवळ आपल्या कुटुंबीयांचीच नाही तर संपूर्ण जुन्नर तालुक्याची मान उंचावली. सिद्धीच्या या यशामुळे राजुरी गावासह संपूर्ण जुन्नर तालुक्यात अभिमानाचे वातावरण पसरले आहे. तिच्यावर सर्वांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तिच्या उज्ज्वल वैमानिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिच्या या यशाचे श्रेय वडिल अनंत तुकाराम हाडवळे, आई योगिता हाडवळे, चुलते संपत हाडवळे, चुलती वृषाली यांनाही जाते.
Weather Forecast: पिंपरी-चिंचवडसह मावळ पट्ट्यात जीवघेणा दमटपणा; उकाड्याने पिंपरीकर त्रस्त






