Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather: उकाड्यानंतर पावसाची हजेरी; मुंबई उपनगरात रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक

Maharashtra Weather Update 22 May: मुंबई उपनगरातील काही भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने उकाडा आणि प्रचंड उमसाने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांना काहीसा आराम मिळाल्याचे चित्र आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 22, 2026 | 12:00 PM
उकाड्यानंतर पावसाची हजेरी; मुंबई उपनगरात रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक (फोटो सौजन्य-ChatGPT)

उकाड्यानंतर पावसाची हजेरी; मुंबई उपनगरात रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • मुंबई उपनगरात काही भागांत पावसाची रिमझिम सुरू
  • पावसाच्या सरींमुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा
  • मुंबई उपनगरात रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक
Maharashtra Weather Update 22 May News Marathi : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, मुंबई उपनगरातील काही भागांत शुक्रवारी (22 मे 2026) रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने उकाडा आणि वाढलेल्या उमसामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानासोबतच हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने नागरिक अक्षरशः घामाघूम होत होते. अशा परिस्थितीत अचानक पडलेल्या हलक्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

विशेषतः मुंबई उपनगरातील काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे उष्णता कमी झाली असून नागरिकांनीही काहीसा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली. कार्यालयातून घरी परतणाऱ्या नोकरदारांसह स्थानिक नागरिकांना या पावसामुळे उकाड्यापासून तात्पुरता आराम मिळाला.

देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस…

दरम्यान, हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्री-मान्सून हालचालींना वेग आल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, काही भागांत अजूनही उष्णता आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठी हा पाऊस उकाड्यातील दिलासा ठरला असला तरी आगामी मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे, विदर्भ प्रदेशात भट्टीप्रमाणे तप्त वातावरण असून, कमाल तापमानाचे सर्व विक्रम मोडले जात आहेत. दरम्यान, सक्रिय मान्सून वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, राज्यात हे आश्चर्यकारक मिश्र हवामान पुढील पाच दिवस सुरू राहील.

हवामान विभागाने २२ ते २४ मे दरम्यान उष्णता थोडी कमी होईल, परंतु ‘ऑरेंज अलर्ट’ कायम राहील. नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही पुढील चार ते पाच दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने लोकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.

कोकणात आज पावसाचा इशारा

विदर्भात आधीच प्रचंड उष्णता असताना, मान्सूनच्या वाऱ्यांच्या आगमनाने अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे. हवामान विभागाने ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे आणि विजांच्या कडकडाटाच्या इशाऱ्यासह ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. २१ मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहील.

Maharashtra Mansoon Coming Soon! २६ मेपर्यंत केरळमध्ये, महाराष्ट्रात कधी? मान्सून हवामान विभागाकडून गुड न्युज

Web Title: Light rain in mumbai suburbs relief from humidity and heat mumbai rain update news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Mumbai
  • Rain Update
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?
1

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद
2

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान
3

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान

मुसळधार पावसाचा देवगड तालुक्याला तडाखा; वादळी वाऱ्यामुळे कुणकेश्वर, मणचे, शिरवलीत घरांचे नुकसान
4

मुसळधार पावसाचा देवगड तालुक्याला तडाखा; वादळी वाऱ्यामुळे कुणकेश्वर, मणचे, शिरवलीत घरांचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.